पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता - 7वी विषय - मराठी गुण - 20

पाठ 7 - आठवणींचे गाव

पाठ 8 - परोपकाराचे फळ

प्रश्नपत्रिकेचा आराखडा

ज्ञान पातळी (Cognitive Level) गुण काठिण्य पातळी (Difficulty Level) गुण
ज्ञान (Knowledge) 13 (65%) सोपे (Easy) 13 (65%)
आकलन (Understanding) 5 (25%) साधारण (Average) 5 (25%)
अभिव्यक्ती (Expression) 2 (10%) कठीण (Difficult) 2 (10%)
एकूण (Total) 20 एकूण (Total) 20

I. एका वाक्यात उत्तरे द्या. (प्रत्येकी 1 गुण)

1. आठवणीचे गाव या कवितेचे कवी कोण आहेत?

2. कवितेत आलेल्या रंगांची नावे लिहा?

3. वैद्याच्या पत्नीचे नाव काय होते?

4. परोपकार म्हणजे काय?

5. आजारी कोण होते?

6. आरोग्य म्हणजे सर्वश्रेष्ठ काय?

II. रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी 1 गुण)

7. भाषेला ज्याच्या-ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना ........ असे म्हणतात.

8. कृष्ण पक्षातील ........ रात्र होती.

9. वैद्यकीय ज्ञान हे ........ सेवेसाठी आहे.

10. परोपकारचे फळ या पाठाचे मूळ लेखक ........ हे होय.

III. जोड्या जुळवा. (4 गुण)

11. योग्य जोड्या जुळवा:

अ गट ब गट
A) आमराई 1) नारळाचे झाड
B) अथांग 2) आंब्याच्या झाडांची बाग
C) माड 3) अतिशय खोल
D) पार 4) झाडाच्या भोवतीचा कट्टा

IV. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे द्या. (प्रत्येकी 2 गुण)

12. आठवणीच्या गावात काय काय असावे?

13. वैद्यांची पत्नी वैद्यावर का रागावली होती?

V. खालील प्रश्नाचे उत्तर चार ते पाच वाक्यात लिहा. (2 गुण)

14. परोपकाराचे फळ या कथेतून आपण काय शिकलो? तुमच्या शब्दात लिहा.

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने