/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

Swatantrya Din Bhashan 5


            

स्वातंत्र्य दिन मराठी भाषण क्र. 5  

आज देशात 77वा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा केला जात आहे मात्र भारताची आणि शान आणि भारताचा मानबिंदू असलेला आपला राष्ट्रध्वज तिरंगी झेंडा याच्या विषयी माहिती असावी दीर्घकाळ स्वातंत्र्याचा लढा दिल्यानंतर आणि लक्षावधी हुतात्म्यानी देशासाठी प्राणांची आहुती दिल्यानंतर स्वतंत्र भारतासाठी राष्ट्रध्वज ठरवला गेला तो दिवस 22 जुलै 1947. केशरी,पांढरा,हिरवा आणि मधोमध निळ्या रंगाचे अशोक चक्र असलेला हा ध्वज फार विचार करून बनविला गेला आहे.केशरी रंग त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे .पांढरा रंग प्रकाश शांती आणि सत्याची भावना व्यक्त करणारा तर हिरवा रंग सुख-समृद्धी आणि निसर्गाचे असलेले नाते व्यक्त करणारा आहे.मधले निळे अशोक चक्र प्रगती दर्शविते. या अशोक चक्रामध्ये 24 आरे आहेत हा तिरंगी ध्वज हे आपले राष्ट्रीय प्रतिक असून त्याचा सर्वांनी मान राखला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा