18.संतवाणी - इयत्ता 4 थी
🌸 संत तुकारामांचे अभंग
(इयत्ता 4 थी – मराठी प्रथम भाषा)

✨ महत्त्वाचे मुद्दे

  1. हा अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिला आहे.
  2. या अभंगात कृतज्ञता (उपकाराची जाणीव) शिकवली आहे.
  3. ज्यांनी आपल्यावर उपकार केले, त्यांच्याशी कधीही कठोर वागू नये.
  4. अन्न देणाऱ्याचे मन दुखवू नये.
  5. ज्यांनी आपले रक्षण केले, त्यांना विसरू नये.
  6. आईचा कधीही अपमान करू नये.
  7. प्रेम आणि कृतज्ञता हे जीवनातील महत्त्वाचे गुण आहेत.

📖 नवीन शब्दांचे अर्थ

  • निष्ठूर – कठोर, कडक
  • निर्वाणी – कठीण प्रसंगी
  • हेलू नये – तिरस्कार करू नये
  • भंगू नये – विसरू नये

📝 प्रश्नोत्तरे

✏️ अ) एका वाक्यात उत्तरे (पान क्र. 82)

1) कोणाशी निष्ठूरपणे वागू नये?

ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्याशी निष्ठूरपणे वागू नये.

2) ज्याने अन्न दिले त्याचे काय मोडू नये?

ज्याने अन्न दिले त्याचे मन मोडू नये.

3) कोणाला विसरू नये?

ज्यांनी आपले रक्षण केले त्यांना विसरू नये.

4) कोणाला धिक्कारू नये?

आईला धिक्कारू नये.

✏️ आ) वाचा आणि लिहा (पान क्र. 82)

  1. ज्याने केला उपकार – त्याच्याशी कधीही कठोर वागू नये.
  2. ज्याने राखिला जीव – त्याच्याशी वाईट भावना ठेवू नये.
  3. तुका म्हणे आता – आईचा कधीही तिरस्कार करू नये.

✏️ इ) नादमय शब्द (पान क्र. 82)

  1. अन्न – मन
  2. जीव – भाव
  3. कामा – प्रेम
  4. आता – माता
  5. नये – भंगू नये

✏️ ई) परिच्छेद पूर्ण करा (पान क्र. 83)

वृक्षांचे महत्त्व काय वर्णावे? आपल्या भोवतालचे बहुतांश सौंदर्य हिरव्या झाडांनी दिले आहे. कल्पना करा सर्व झाडे या पृथ्वीवरून काढून टाकली तर पृथ्वी किती भकास दिसेल. आपल्या जीवनाची प्रत्येक शाखा झाडांनी व्यापलेली आहे. शेतीची अवजारे झाडेच देतात. झाडांमुळेच पाऊस पडतो. वातावरण शुद्ध होते, म्हणून आपल्या जीवनात झाडांना फार महत्त्व आहे.

✏️ उ) फरक समजून घ्या (पान क्र. 83)

  1. आंब्याची – आमराई
  2. केळीची – बाग
  3. द्राक्षाची – मळा
  4. करवंदाची – जाळी
  5. भाताचे – शेत
  6. वेताचे – बन
  7. गवताचे – रान
  8. फुलांचे – बगीचा

✏️ ऊ) व्यवसाय ओळखा (पान क्र. 84)

  1. दागिने घडवितो तो – सोनार
  2. चप्पल शिवतो तो – चांभार
  3. ऐरणीवर घण मारतो तो – लोहार
  4. कपडे शिवतो तो – शिंपी
  5. रोज बागेला पाणी घालतो तो – माळी
  6. चरख्यावर बसून तेल गाळतो तो – तेली
  7. पूजा सांगतो तो – पुजारी
  8. दुकानातील माल विकतो तो – दुकानदार
  9. मुलांना शिकवतो तो – शिक्षक
  10. कापड विणतो तो – विणकर

✏️ ए) म्हणी आणि अर्थ (पान क्र. 84)

  1. गवयाचे पोर सुरात रडते – गुण घराण्यातून येतात.
  2. गरज सरो आणि वैद्य मरो – काम झाल्यावर उपकार विसरतात.
  3. सोनारानेच कान टोचावे – काम तज्ञ व्यक्तीनेच करावे.
  4. कसाईला गाय धाडणी – क्रूर माणसाकडे चांगली वस्तू देऊ नये.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने