ABC
इयत्ता - 10वी विषय - समाज विज्ञान पाठ 6. भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध (इ.स. 1857)
प्र. 1. बहुपर्यायी प्रश्नोत्तरे
1. भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध यावर्षी लढले गेले ?
उत्तर: इ.स. 1857
2. हे ब्रिटिशांचे शक्तीशाली केंद्र होते.
उत्तर : मीरत
3. दत्तक वारस नामंजूर कायद्यानुसार ही राज्ये खालसा करण्यात आली.
उत्तर : सातारा, झाँशी
4. दत्तक वारस कायदा यांनी लागू केला.
उत्तर : लॉर्ड डलहौसी
5. भारताचा बादशाह म्हणून हा घोषित केला.
उत्तर : दुसरा बहादुरशहा
6. बराकपूर या ठिकाणी या भारतीय शिपायाने एका ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार मारले.
उत्तर : मंगल पांडे
7. कानपूरच्या बंडाचे नेतृत्व यांनी केले.
उत्तर : नानासाहेब
8. झाशीच्या राणीने ताब्यात घेतले.
उत्तर : ग्वाल्हेर
9. औद्योगिक क्रांती येथे घडून आली.
उत्तर : ब्रिटन
10. इंग्लंडच्या राणीने जाहीरनामा यावर्षी प्रसिद्ध केला.
उत्तर : इ.स. 1858
प्र. 2. एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धाला ब्रिटिश इतिहासकार काय म्हणतात ?
उत्तर : शिपायांचे बंड
2. लॉर्ड डलहौसीने कोणाची राज्यपदे काढून घेतली ?
उत्तर : तंजावरचा व कर्नाटकाचा नवाबाची राज्यपदे काढून घेतली.
3. भारतातील लघु व कुटीर उद्योग का संकटात सापडले ?
उत्तर : इंग्लंडमध्ये झालेल्या 18 व्या शतकातील औद्योगिक क्रांतीमुळे संकटात सापडले.
4. इंग्रजांनी भारतीय शिपायांना दिलेल्या बंदुकीचे नाव काय ?
उत्तर : रॉयल एन्फिल्ड
5. ब्रिटिशांनी पदच्युत केलेल्या पहिल्या राजाचे नाव काय ?
उत्तर : औंधचा नवाब
6. तात्या टोपे यांनी कुणाला सहाय्य केले ?
उत्तर : नानासाहेबांना मदत केली.
प्र. 3. सविस्तर उत्तरे लिहा.
1. 1857 च्या युद्धाची राजकीय कारणे सविस्तर लिहा.
उत्तर : 1. लॉर्ड डलहौसीचो दत्तक वारसा नामंजूर कायदा. 2. सातारा, झांशी, जयपूर, उदयपूर अशी विविध संस्थाने खालसा केली. 3. तंजावरचा नवाब आणि कर्नाटकच्या नवाबांची पदे काढून घेतली. 4. दिल्लीचा मोंगल बादशहा, अवधचा नवाबाला सत्तेवरून काढून टाकले. 5. अधिकार गमावलेले राजे असमाधानी बनले. राजावर अवलंबून असलेले सैनिक बेकार झाले.
2. 1857 च्या युद्धाला आर्थिक कारणे कशी जबाबदार ठरली कोणती होती.
उत्तर : 1. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती. 2. भारतीय कुटिरोद्योगाचा नाश झाला. 3. लाखो कारागीर व विणकर बेकार झाले. 4. जमीन महसूलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला 5. इनाम जमिनी सरकारने वापस घेतल्या.
3. 1857 च्या बंडाची लष्करी कारणे सांगा.
उत्तर : 1. इंग्रजी सैन्यामध्ये भारतीय शिपायांची अवस्था अत्यंत हलाखीची होती. 2. सैन्यातील अधिकाराच्या जागा, दाम दुप्पट पगार आणि संधी फक्त इंग्रजांना होत्या. 3. भारतीय सैनिकांना योग्यता असूनही संधी नाकारल्या गेल्या. 4. भारतीय शिपायांना समुद्र ओलांडून जाण्याची केलेली सक्त आज्ञा.
4. 1857 च्या उठावाची शासकीय कारणे सांगा.
उत्तर : 1. ब्रिटिशांनी दिवाणी व फौजदारी न्यायालये स्थापन केली. 2. न्यायदान पद्धतीत भेदभाव केला जायचा. 3. न्यायालयाची भाषा इंग्रजी होती. 4. बहुतेक करून इंग्रजांच्या बाजुनेच न्याय दिला जात असे. 5. सर्व पद्धती सामान्य भारतीयांच्या आकलनाबाहेरच्या होत्या.
5. 1857 च्या बंडाच्या अपयशाची कारणे लिहा.
उत्तर : 1. ही चळवळ काही ठराविक लोकांच्या हितापुरतीच मर्यादित राहिली. 2. एकत्रितपणे उठाव होण्याऐवजी काही अनपेक्षित कारणांचा तो स्फोट होता. 3. इंग्रज सैन्यात एकी व भारतीय सैन्यात असंघटितपणा होता 4. अयोग्य युद्ध नीती,अकुशलता, नेतृत्वाचा अभाव, बेशिस्तपणा व दिशाहीनता ही सर्व अपयशाची कारणे आहेत.
6. 1858 मध्ये राणीने जाहीर केलेली आश्वासने कोणती?
उत्तर : 1. ईस्ट इंडिया कंपनीने स्थानिक लोकांशी केलेला करार स्वीकारण्यात आला. 2. महत्त्वाकांक्षी प्रादेशिक योजनांना आळा बसला. 3. भारतीयांना स्थिर सरकार देण्याचे आश्वासन देण्यात आले. 4. कायद्यामध्ये समानता ठेवली 5. भारतीयांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप केला जाणार नाही असे आश्वासन देण्यात आले.
7. 1857 च्या बंडाचे परिणाम काय झाले ?
उत्तर : 1. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात येऊन इंग्लंडमधील राणीने भारतातील कारभार आपल्या हाती घेतला. 2. भारतातील राज्यकारभार राज्य सचिवाकडे सोपविण्यात आला आणि तो ब्रिटिश पार्लेटला जबाबदार मानला गेला. 3. भारतीय लोकांमध्ये देशप्रेम जागे झाले.
टिप्पणी पोस्ट करा