ABC
इयत्ता - 10वी विषय - समाज विज्ञान पाठ 7. स्वातंत्र्याची चळवळ
प्र. 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. वृत्तपत्रावर बंधने घालणारा कायदा कोणता ? तो कोणी अंमलात आणला ?
उत्तर : व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट. लॉर्ड लिटनने अंमलात आणला.
2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी व केव्हा केली ?
उत्तर : ए.ओ. ह्यूम यांनी 1885 मध्ये केली.
3. ब्रिटिशांनी भारतीयांविरुद्ध कोणती नीती वापरली ?
उत्तर : फोडा आणि राज्य करा.
4. मवाळयुग म्हणजे काय ?
उत्तर : काँग्रेसच्या स्थापनेनंतरचा पहिल्या वीस वर्षांचा काळ म्हणजे मवाळयुग होय.
5. आर्थिक निःस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला?
उत्तर : दादाभाई नौरोजी.
6. मवाळांचा काळ कोणता काळ म्हणून ओळखला जातो ?
उत्तर : उदार राष्ट्रवादाचा काळ.
7. मवाळवाद्यांना काय म्हणतात ?
उत्तर : राजकीय दास
8. बंगालची फाळणी केव्हा करण्यात आली ?
उत्तर : इ.स. 1905
9. बंगालची फाळणी कोणी केली ?
उत्तर : लॉर्ड कर्झन
10. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक आहे आणि तो मी मिळविणारच" ही घोषणा कोणी दिली ?
उत्तर : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
11. टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली ?
उत्तर : मराठी भाषेत 'केसरी' व इंग्रजीमध्ये 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू केली.
12. मुस्लीम लीगची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर : इ.स. 1906 साली.
13. 'अभिनव भारत' संघटना कोठे कार्यरत आहे ?
उत्तर : भारत.
प्र. 2. खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. मवाळमतवादी नेते कोण ?
उत्तर : मवाळ नेत्यांमध्ये म.गो. रानडे, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी आणि गोपाळकृष्ण गोखले हे प्रमुख होते.
2. जहालवादी नेते कोणते ?
उत्तर : अरविंदो घोष, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक हे जहाल नेते होते.
3. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख क्रांतिकारकांची नावे लिहा.
उत्तर : विनायक दामोदर सावरकर, अरविंदो घोष, अश्विनी कुमार दत्त, राजनारायण बोस, राजगुरु, चाफेकर बंधू, शामाजी कृष्णवर्मा, रासबिहारी बोस, मादाम कामा, खुदिराम बोस, रामप्रसाद बिस्मिल, अशपाक उल्लाखान, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, जतीनदास हे प्रमुख क्रांतीकारक होते.
4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोणकोणत्या संघटना अस्तित्वात होत्या?
उत्तर : द हिंदू मेळा, द ईस्ट इंडियन असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा व द इंडियन असोसिएशन इ. संघटना होत्या.
5. मवाळ मतवाद्यांनी ब्रिटीशांसमोर कोणकोणत्या मागण्या मांडल्या?
उत्तर : 1. उद्योगधंद्यांची वाढ करणे 2. संरक्षण खात्यावरील खर्च कमी करणे 3. शैक्षणिक क्षेत्रात विकास साधणे अशा मागण्या सरकारपुढे मांडल्या.
6. आर्थिक निःसारणाचा सिद्धांत स्पष्ट करा.
उत्तर : भारतीय संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे चालला आहे ही आकडेवारी आणि वस्तुस्थिती दादाभाई नौरोजींनी लोकांच्यासमोर मांडली. त्याला आर्थिक 'निःसारणाचा सिद्धांत' म्हणतात.
7. बंगालची फाळणी रद्द होण्याची कारणे कोणती?
उत्तर : 1. भारतीय राष्ट्रीय कांग्रेसने बंगालच्या फाळणीला विरोध दर्शवून हिंदू मुस्लीमांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला 2. हिंदू व मुस्लीम समुदायात एकात्मता निर्माण करण्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आखला. 3. संपूर्ण देशभरातून विरोध होत असताना जहालांनी स्वदेशी चळवळ सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले. 4. स्वदेशी चळवळीने विदेशी वस्तूवर बहिष्कार घातला. 5. स्फोटक परिस्थितीमुळे 1911 मध्ये ब्रिटीश सरकाने बंगालची फाळणी रद्द केली.
8. स्वातंत्र्य चळवळीमध्ये बाळ गंगाधर टिळक यांचे योगदान कोणते?
उत्तर : 1. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" या टिळकांच्या घोषणेने भारतीयांच्या मनातील विचारांना वाट मिळाली. 2. संपूर्ण स्वराज्य मिळविणे; हे जहाल मतवाद्यांचे ध्येय होते. 3. त्यांनी सामान्य लोकांचीही मने स्वातंत्र्य चळवळीसाठी तयार केली या पार्श्वभूीवर धार्मिक आचरणाद्वारे लोकांना संघटित करून ब्रिटीशांविरुद्ध लढण्यास त्यांना उद्युक्त केले. 4. गणेश चतुर्थी, शिवजयंती, दुर्गापूजा इ. उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करून लोकांना प्रेरणा दिली. 5. टिळकांनी मराठीत 'केसरी' व इंग्रजीत 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू करून ब्रिटीशांविरुद्ध चळवळीचे अस्त्र म्हणून त्यांचा वापर केला. 6. सर्वसामान्य माणसांना ब्रिटीशांविरुद्ध लढा देण्यास प्रेरित केले. त्यांच्या प्रक्षोभक विचारांचे अग्रलेख वाचून लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. 7. टिळकांनी 'गीतारहस्य' लिहून स्वातंत्र्य चळवळीस आक्रमक रूप दिले.
टिप्पणी पोस्ट करा