ABC

इयत्ता - 10वी समाज विज्ञान - ब्रिटीश सत्तेला झालेला विरोध आणि सुधारणा चळवळ

इयत्ता - 10वी विषय - समाज विज्ञान पाठ 4. ब्रिटीश सत्तेला कर्नाटकातून झालेला विरोध

प्र. 1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. 'राजकीय समस्यांचे शतक' कोणत्या शतकाला संबोधले जाते ?

उत्तर : 18 वे शतक

2. पहिले अँग्लो-म्हैसूर युद्ध कोणाकोणात झाले ?

उत्तर : हैदर अली व ब्रिटिश

3. पहिल्या अँग्लो म्हैसूर युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला ?

उत्तर : मद्रासचा तह (इ.स. 1769)

4. दुसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला ?

उत्तर : मंगळूरचा तह (इ.स. 1784)

5. तिसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला ?

उत्तर : श्रीरंगपट्टणम. (इ.स. 1792)

6. तिसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धाचे मूळ कारण कोणते ?

उत्तर : त्रावणकोरचे राजकारण.

7. हैदर अलीचा मृत्यू केव्हा झाला ?

उत्तर : इ.स. 1782 मध्ये.

8. लॉर्ड वेलस्ली भारताचा गव्हर्नर जनरल केव्हा बनला ?

उत्तर : 1798

9. कोणत्या धोरणांतर्गत ब्रिटिशांनी कित्तुरचे संस्थान खालसा करण्याचा प्रयत्न केला ?

उत्तर : 'दत्तक वारसा नामंजूर' कायदा.

10. संगोळ्ळी रायण्णाला कोठे फाशी देण्यात आली ?

उत्तर : नंदगड

11. ब्रिटिशांनी सुरपूरचा केव्हा काबीज केले ?

उत्तर : 1858

12. हलगली हे गाव कोणत्या संस्थानाच्या अधिपत्याखाली होते ?

उत्तर : मुधोळ संस्थान.

13. कित्तूर राणी चन्नम्माने कोणाला दत्तक घेतले ?

उत्तर : शिवलिंगाप्पा.

14. अमरसुळ्याचे बंड हे प्रामुख्याने कोणाचे बंड होते ?

उत्तर : शेतकऱ्यांचे

15. धोंडिया वाघ कोण होता ?

उत्तर : 'लष्कर-प्रमुख'

16. कोणत्या युद्धादरम्यान हैदर अलीचा मृत्यू झाला ?

उत्तर : दुसरे अँग्लो म्हैसूर युद्ध.

प्र. 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. 18 वे शतक 'राजकीय समस्यांचे शतक' होते. कारणे लिहा.

उत्तर : 1707 मध्ये सम्राट औरंगजेबाचा मृत्यू झाला. हे याचे प्रमुख कारण आहे. त्याच्या मृत्युमुळे मोंगलांचे सार्वभौमत्व संपुष्टात आले. दक्षिण भारतातील त्यांचे वर्चस्व कमी झाले 'कार्नाटिक' प्रदेशात अधिकार मिळविण्यासाठी संघर्ष सुरू झाले. यापूर्वी 1704 मध्ये चिक्कदेवराज वडेयर यांच्या निधनाने म्हैसूरच्या राजकीय व्यवस्थेवर दुष्परिणाम झाला. चिक्कदेवराज यांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी कोण? याबद्दल समस्या निर्माण झाली व त्याबरोबरच शासनव्यवस्था ढासळली.

2. हैदर अली सत्तेवर कसा आला?

उत्तर : हैदर अली हा म्हैसूरच्या सैन्यामध्ये एक साधा शिपाई म्हणून रुजू झाला. परंतु अल्पावधीतच आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीविषयी तो सर्वपरिचित झाला. म्हैसूरच्या राजकीय विकासाचा तो बारकाईने अभ्यास करत होता निजामाविरुद्ध अर्काटच्या लष्करी कारवायामुळे आणि देवनहळ्ळीच्या वेढ्यामुळे तो प्रकाशझोतात आला. त्यांने सर्व सैनिकांची मने जिंकली. अल्पावधीतच तो 'नबाब हैदर अली' म्हणून प्रसिद्धीस आला. नवनवीन शस्त्रास्त्रांच्या वापराबद्दलही त्याची ख्याती होती. आपल्या चतुर चार्लीनी त्यांने दळवायांची ताकद कमी केली. तसेच कृष्णदेवराय वडेयर यांनाही मागे टाकून आपले प्रशासकीय वर्चस्व प्रस्थापित केले.

3. दुसऱ्या अँग्लो- म्हैसूर युद्धाची कारणे कोणती?

उत्तर : त्रावणकोर व तंजावर या राज्यातील राजकीय घडामोडीमुळे हे युद्ध झाले. मद्रासच्या तहामुळे दक्षिण भारतातील राजकीय विकास तात्पुरता खुंटला होता. ब्रिटीशांनी मद्रास तहातील अटींचे उल्लंघन केले. मराठ्यांनी माधवराव पेशर्वेच्या नेतृत्वाखाली श्रीरंगपट्टणकडेच केले. हैदरने ब्रिटीशांची मदत मागितली ब्रिटिशानी हैदर अलीला पाठिंबा देणे अपेक्षित होते. परंतु ब्रिटीशांनी हैदरअलीची विनंती झिडकारून मद्रासचा तह मोडला. '**माहे**' ही फ्रेंच वसाहत हैदर अलीच्या ताब्यात होती. ब्रिटीशांनी माहेवर हल्ला चढवून त्यावर आपला ताबा मिळविला आणि हेच दुसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धाचे प्रमुख कारण ठरले.

4. दुसऱ्या अँग्लो- म्हैसूर युद्धाचे परिणाम कोणते?

उत्तर : 1. हैदर अलीच्या मृत्यूचा फायदा घेत ब्रिटीशांनी मंगलोर व बिदनूर प्रांत काबीज करण्याचा प्रयत्न केला. 2. ब्रिटिशांनी टिपू सुलतानविरुद्ध कालिकत व मलबारच्या राज्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. 3. या सर्व बाबी लक्षात घेवून टिपूने मंगलोर व कोंकण किनारपट्टीचे संरक्षण करण्याचे ठरविले. त्यांने ब्रिटीशांचा पराभव केला. 4. 1784 मध्ये '**मंगलोरचा तह**' झाला आणि दुसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध संपुष्टात आले.

5. श्रीरंगपट्टणच्या तहातील अटी कोणत्या?

उत्तर : श्रीरंगपट्टणच्या तहातील अटी: 1. आपले अर्ध राज्य ब्रिटीशांना देणे. 2. युद्धाची नुकसानभरपाई म्हणून तीन कोटी रूपये देणे. 3. या पैशाच्या बदल्यात जामीन म्हणून आपले दोन पुत्र ब्रिटीशांकडे ओलीस ठेवणे. 4. आपल्या ताब्यात असणाऱ्या ब्रिटीश सैन्याची तुरूंगातून सुटका करणे इ.

6. चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धामुळे म्हैसूरमध्ये ब्रिटीशांची सत्ता बळकट कशी झाली?

उत्तर: ब्रिटिशांनी टिपूचा भक्कम असा किल्ला उध्वस्त केला. 1799 मध्ये या युद्धात लढता लढता टिपूचा मृत्यू झाला. टिपूच्या मृत्युळे जणू कांही सारा भारतच आपल्या अधिपत्याखाली आल्याचा आनंद ब्रिटीशांना झाला. टिपूच्या ताब्यातील बराचसा प्रदेश ब्रिटीशांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यातील कांही भाग मराठे व निजामांना वाटून दिला. एक छोटासा भाग म्हैसूरच्या प्रतिष्ठित वडेयर राजघराण्याला देण्यात आला. हाच भाग पुढे '**म्हैसूरचे संस्थान**' म्हणून ओळखला जाऊ लागला.

7. ब्रिटीश सत्तेला विरोध करण्याची धोंडिया वाघ यांने कोणती पद्धत अवलंबिली ?

उत्तर : चौथ्या अँग्लो- म्हैसूर युद्धानंतर ब्रिटीशांनी त्याची तुरुंगातून सुटका केली. त्याने आपली एक छोटीशी सैन्यतुकडी स्थापन केली आणि कारवाया सुरू केल्या. टिपूच्या सैन्यातील असंतुष्ट सैनिक आणि सत्ता नसलेले जहागीरदार यांना त्यांने आपल्या सैन्यात सामावून घेतले. त्यांने बिदनूर व शिवमोगाचे किल्ले काबीज करून चित्रदुर्गचा किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. धोंडियाने आपल्या नेतृत्वाखाली शिमोगा, होनाळ्ळी, हरिहर व आणखी कांही भागावर हल्ला चढविला. पण त्याचा पराभव झाला.

8. रायण्णा ब्रिटीशांविरुद्ध कशा पद्धतीने लढला सविस्तरपणे लिहा?

उत्तर : संगोळ्ळी रायण्णा एक शूर शिपाई होता. तो कित्तूरच्या स्वातंत्र्यासाठी लढला. मातृभूमिला मुक्त करणे हे आपले परम कर्तव्य आहे असे तो मानत असे. राणी चन्नम्माबरोबरच तोही ब्रिटीशांविरुद्ध शौर्याने लढला. सैन्याची जमवाजमव करीत त्याने त्यांच्या मनामध्ये राष्ट्रीयत्वाची भावनाही जागृत केली. कांही संवेदनशील ठिकाणी त्याने गुप्त सभा घेतल्या. त्याने ब्रिटीशांच्या तालुक्याच्या ठिकाणी असणारे खजीने लुटण्याची योजना आखली होती. त्याच्याकडे पाचशे सैनिकांची तुकडी होती. ब्रिटीशांना मदत करणाऱ्या गावकऱ्यांबद्दल त्याच्या मनात तीव्र संताप होता.

9. स्वातंत्र्य चळवळीत कोडगूच्या पुट्टबसप्पाचे योगदान कोणते ?

उत्तर : कोडगुचे बंड डोंगराळ भागात सुरू झाले. पुट्टबसप्पा बंडाचे आयोजन करीत असे आणि लोकांना शांत बसवित असे. जर बंडखोर सरकारच्या हाती सत्ता आली तर तंबाखू व मीठावर कर बसविला जाणार नाही. असे त्यांने जाहिर केले. श्रीमंत शेतकरी, जमीनदार व स्थानिक प्रमुखांना याबद्दलची खात्री पटली. वेल्लोरमधील सरकारी कचेरीवर ताबा मिळविणे ही या बंडाची पहिली चाल होती. क्रूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या एका अंमलदाराला ठार मारल्यांने पुट्टबसप्पाची ख्याती आणखीनच वाढली. या घटनेपासून या बंडाला जास्तच पाठिंबा व प्रसिद्धी मिळाली. त्यांनी बंटवाळच्या खजिन्याची व तुरुंगाची लुटालूट केली. हे बंड दडपून टाकण्यासाठी ब्रिटीशांनी तल्लिचेरी, कन्नानूर आणि बाँबेचे सैन्य वाढविले. ही बातमी कानावर पडल्यानंतर पुट्टबसप्पा आणि त्याचे सहकारी सुळ्ळ्याकडे वळले. कोडगूधील लोकांच्या सहाय्याने ब्रिटीशांनी त्यांना पकडले. पुट्टबसाप्पा, लक्ष्मप्पा, बंगारप्पा, केंदबाडी रामय्यागौडा आणि गुड्डेने अप्पय्या यांना फाशी देण्यात आली. जरी हे बंड अयशस्वी झाले; तरी ब्रिटीश विरोधी झालेल्या बंडामध्ये याला अनन्यसाधारण असे स्थान आहे.

10. सुरपूरच्या बंडाची थोडक्यात माहिती लिहा.

उत्तर : सुरपूरचे बंड 1857 मध्ये ब्रिटीश सुरपूरमधील विविध प्रकारच्या सुधारणांवर बारीक लक्ष ठेवून होते. नानासाहेबांचे प्रतिनिधी सुरपूरमध्ये आहेत. हे सरकारच्या लक्षात आले. यामुळे राज्यकर्त्यांच्या मनसुब्याबद्दल त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. राज्यकर्त्यांच्या हालचाली बद्दल माहिती देण्यासाठी त्यांनी कॅम्पबेल या अधिकाऱ्याची नेणूक केली. हैद्राबादच्या राजाचे प्रशासन चांगले नसल्याबद्दलचा अहवाल कॅम्पबेलने सरकारला दिला. वेंकटप्पा नायक हा 1857 च्या बंडातील एक प्रमुख नेता असे इतिहासकारांनी नमूद केले आहे. 1858 मध्ये ब्रिटीशांनी सुरपूर काबीज केले. तेथील राजा हैद्राबादच्या निजामाला आणि ब्रिटीश अधिकाऱ्याला शरण झाला. त्याला अटक करून सिकंदराबादच्या तुरुंगात ठेवण्यात आले. वेंकटप्पा नायकाचा मृत्यू कसा झाला याबद्दल मतभेद आहेत.

11. हलगलीच्या बेरडांच्या बंडाचा शेवट कसा झाला स्पष्ट करा.

उत्तर : हलगली हे बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यामधील एक छोटेसे खेडे. हे मुधोळ संस्थानाच्या अधिपत्याखाली होते. 1857 मध्ये ब्रिटीशांनी शस्त्रास्त्रांच्या वापरावर बंदी घातली. बेरड लोक त्यांच्या परंपरेनुसार आपल्याजवळ सतत बंदुका व काडतुसे बाळगत असत. ते उत्तम शिकारी होते. जेव्हा त्यांना शस्त्रास्त्रे सरकारकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले तेंव्हा त्यांनी ब्रिटीशांविरुद्ध बंड पुकारले. मंटूर, बोडणी, अलगुंडी आणि आसपासच्या ठिकाणाचे कांही बेरड लोक हलगलीच्या बेरडांना सामील झाले. हे बंड दडपून टाकण्यासाठी ब्रिटीशांनी हलगली गावात प्रवेश केला. त्यांनी तेथील बेरडांना अमानुषपणे चिरडून टाकले. तसेच बऱ्याच बंडखोरांना फासावर लटकावले व या बंडाचा शेवट झाला.

पाठ 5. सामाजिक व धार्मिक सुधारणांची चळवळ

प्र. 1. मोकळ्या जागा भरा.

1. भारताच्या इतिहासात 19 व्या शतकाला ..........चा काळ असे म्हटले जाते.

उत्तर : समाज सुधारणेचा काळ (पुनरुजीवनाचा कालखंड)

2. .........यांनी आपल्या मित्राबरोबर आत्मीय सभा कलकत्ता येथे स्थापन केली.

उत्तर : राजा राममोहन रॉय

3. 19 व्या शतकात ..........हे शहर नवीन विचारसरणीचे केंद्र बनले.

उत्तर : कलकत्ता.

4. राजा राममोहन रॉयना आधुनिक भारताचे जनक व भारतीय राष्ट्रीयतेचे प्रवर्तक असे ...........यांनी संबोधले आहे.

उत्तर : रवींद्रनाथ टागोर

5. तरूण बंगाली चळवळ ..........यांनी सुरू केली.

उत्तर : हेन्री विव्हियन डिरोजियो

6. प्रार्थना समाजाची स्थापना........... नी केली ?

उत्तर : आत्माराम पांडुरंग.

7. महात्मा फुलेंनी लिहिलेली महत्त्वाचा प्रसिद्ध ग्रंथ....

उत्तर : गुलामगिरी

8. महात्मा फुलेंच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेली व्यक्ती .......

उत्तर : डॉ. बी.आर. आंबेडकर.

9. अँग्लो ओरिएंटल स्कूलचे स्थापना ........यांनी केली.

उत्तर : सर सय्यद अहमद खान.

10. स्वामी विवेकानंदानी मध्ये कलकत्यामधील 'बेलूर' येथे रामकृष्ण आश्रमाची स्थापना केली

उत्तर : 1897

11. विवेकानंदांनी........ मध्ये शिकागो (अमेरिका) येथे भरलेल्या सर्व धर्म संमेलनात भाषण केले.

उत्तर : 1893

12. थिऑसॉफीकल सोसायटीची स्थापना .........यांनी केली.

उत्तर : अॅनी बेझंट

13. 1898 मध्ये सेंट्रल हिंदू कॉलेजची बनारसमध्ये ............यांनी केली.

उत्तर : अॅनी बेझंट

14. बदलत्या काळानुसार धर्म आणि राहणीमानात बदल केले पाहिजे असे ....... यांनी सांगितले.

उत्तर : सर सय्यद अहमदखान

15. जेस्टीन पार्टीच्या नावाने आत्मगौरव चळवळ............... मध्ये सुरू झाली.

उत्तर : 1925

16. आत्मगौरव चळवळीचे नेतृत्व केले..............यांनी

उत्तर : इ. व्ही. रामस्वामी नायर

17. गायीच्या रक्षणासाठी गोरक्षण संघाची स्थापना ..............यांनी केली.

उत्तर : दयानंद सरस्वती

18. आर्य समाजाच्या तत्त्वाने.............. हा नेता प्रभावित झाला.

उत्तर : लाला लजपत राय.

प्र. 2. एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण ?

उत्तर : राजा राममोहन रॉय

2. आत्मीय सभेचा प्रमुख आशय कोणता ?

उत्तर : धार्मिक आणि सामाजिक सुधारणा करणे.

3. सतीबंदीचा कायदा कोणी व केव्हा पास केला ?

उत्तर : गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी 1829 मध्ये पास केला.

4. हेन्री डिरेजियो यांनी स्थापन केलेले व्यासपीठ कोणते ?

उत्तर : 'अॅकेडमिक असोसिएशन' (1828) व्यासपीठाची स्थापना केली

5. प्रार्थना समाजाचा मुख्य उद्देश काय होता ?

उत्तर : पाश्चिमात्य आधुनिक विचारसरणीद्वारे हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करणे.

6. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना करण्यामागचा उद्देश कोणता ?

उत्तर : ब्राह्मणेतर वर्गास व स्त्रियांना समान हक्क मिळविण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

7. दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या शुद्धी चळवळीचे वर्णन करा.

उत्तर : या चळवळीद्वारे हिंदू धर्म सोडून मुस्लीम व ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या परत हिंदू धर्मात आणण्याचे कार्य केले.

8. स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण ?

उत्तर : रामकृष्ण परमहंस.

9. स्वामी विवेकानंदानी रामकृष्ण मिशनची स्थापना का केली ?

उत्तर : रामकृष्ण परमहंसाच्या आदर्श तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी.

10. अॅनी बेझंट यांना श्वेत सरस्वती म्हणण्याचे कारण काय ?

उत्तर : भगवत गीतेचा त्यांनी इंग्रजी भाषेत अनुवाद केला म्हणून त्यांना श्वेत सरस्वती म्हणतात.

11. ब्राम्हो समाजाची शिकवण सांगा.

उत्तर : 1. एकेश्वरवादाचे प्रतिपादन केले. 2. अर्थहीन चालीरितींना विरोध केला. 3. सर्वांनी प्रतिष्ठेचे जीवन जगावे व कोणतेही नियम व चालीरिती व्यक्ती प्रतिष्ठेला बाधक ठरू नयेत. 4. बहुपत्नीत्व पद्धतीचा निषेध केला व स्त्रियांच्या समानतेसाठी प्रयत्न केले. 5. बालविवाहाला विरोध दर्शविला. 6. चांगुलपणाचा स्वीकार केला पाहिजे.

12. 'वेदांकडे परत चला' या दयानंद सरस्वतीच्या विधानाचे विश्लेषण करा.

उत्तर : 1. वेदांमध्ये आधुनिक भारताच्या समस्यांवर उपाय आहे हे त्यांना वेदांच्या अध्ययनाने उमगले. त्यामुळे '**वेदांकडे परत चला**' अशी घोषणा केली. 2. वेद हे ज्ञानाचा मूलाधार आहेत. 3. वेदानाच प्रमाण मानावेत 4. वेदाभ्यासामुळे हिंदू धर्म आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन होईल असा विश्वास दयानंद सरस्वती यांना होता.

13. प्रार्थना समाजाच्या सुधारणा लिहा.

उत्तर : 1. स्त्री शिक्षणाला महत्त्व दिले 2. निराश्रितांना आश्रय देणे 3. बालविवाह पद्धतीला विरोध 4. विधवा पुनर्विवाहाला चालना 5. विधवांना जगण्याचा हक्क मिळवून देणे.

14. हेन्री डिरेजियो यांच्या सुधारणा कोणत्या ?

उत्तर : 1. वैज्ञानिक विचारसरणी बिंबवण्याचा प्रयत्न केला. 2. नवीन शिक्षणपद्धती अंमलात आणण्यासाठी, आवश्यक पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या हक्काचे संरक्षण 3. जातीविरहित समाजाला प्रोत्साहन दिले. 4. '**अॅकेडमिक असोसिएशन**' (1828) व्यासपीठाची स्थापना केली

प्र. 3. पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा

1. अलिगढ चळवळीच्या सुधारणा कोणत्या ? सर सय्यद अहमद खान यांचे योगदान कोणते ?

उत्तर : 1. मुस्लीम समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, सांप्रदायिकता, अवैज्ञानिक चालिरीतला विरोध केला. 2. मुस्लीम समाजातील पडदा पद्धतीचा विरोध केला. 3. मुस्लीम स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. 4. बहुपत्नीत्वाला विरोध 5. धार्मिक सहिष्णुता 6. हिंदू मुस्लीम ऐक्याला महत्त्व

2. स्वामी विवेकानंदांचे विचार स्पष्ट करा

उत्तर : 1. लोकांना साक्षर बनविणे. 2. शासकीय संस्था निर्माण करून त्यांच्यामार्फत समाज सुधारणा करणे. 3. अंधारात चाचपडणाऱ्या लोकांना प्रकाशात नेणे. 4. जातीयता व अस्पृश्यतेला विरोध करणे. 5. धर्माच्या नावाखाली होणारी पिळवणूक थांबविणे.

3. पेरियार चळवळीतील प्रमुख घटनांची यादी करा.

उत्तर : 1. वीसाव्या शतकातील प्रारंभीच्या काळात ब्राम्हणेतर चळवळ नावाची एक नवीन चळवळ दक्षिण भारतात सुरु झाली. 2. ब्राम्हणेतरांनी आपल्या लोकांना सरकारी क्षेत्रात लोकसंख्येवर आधारित संधी व प्रतिनिधित्व मिळावे यासाठी ही चळवळ सुरू केली. 3. 1916 मध्ये तामिळनाडू येथे सुरू झालेल्या '**जस्टीस पार्टी**'ने ही चळवळ पुढे चालू ठेवली. 4. इ.व्ही. रामस्वामी नायर यांच्या नेतृत्वाखाली '**आत्मगौरव चळवळ**' नावाची नवीन चळवळ आस्तित्वात आली. 5. जातिभेद व लिंगभेद यांना विरोध करून समानतेचा पुरस्कार केला. 6. '**द्राविड कळघम**' नावाची संघटना सुरू करून 'जस्टीस' नावाचे नियतकालिक सुरू केले.

4. 'श्री नारायणगुरु धर्मपरिपालन योगम्' या संघटनेचे योगदान कोणते?

उत्तर : 1. मागासलेल्या व पिळवणूकग्रस्त समाजाला सबल बनविणे, 2. सर्वांना प्रतिप्रेने जीवन जगता यावे हा या संघटनेचा उद्देश होता 3. सर्वांसाठी एकच जात, एकच धर्म व एकच परमेश्वर हे त्यांच्या चळवळीचे ब्रीदवाक्य होते. हे साध्य करण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे 4. मागासलेल्या जमातींना मंदिरात प्रवेश नव्हता म्हणून त्यांनी पर्यायी मंदिर बांधले. 5. 1924 मध्ये नारायण गुरु व त्यांच्या सहकाऱ्यांनी '**वैकम सत्याग्रह**' नावाची मंदिर प्रवेश चळवळ सुरु केली.

5. थिऑसॉफीकल सोसायटीने केलेले प्रयत्न म्हणजे हिंदू धर्माची पुनरुज्जीवन चळवळ असे का मानले जाते ?

उत्तर : 1. या सोसायटीने धार्मिक व तात्विक परंपरांचा अभ्यास करून त्या द्वारे तत्कालिन समस्यांवर उपाय योजना करण्याचा प्रयत्न केला. 2. थिऑसॉफिकल सोसायटीने हिंदू धर्मग्रंथाशी संबंधित वेद, उपनिषदे, सांख्ययोग व वेदांताचे तात्विक चिंतन यातील मूलतत्वे घेऊन त्यांचा प्रचार केला. 3. म्हणूनच या सोसायटीने केलेले प्रयत्न म्हणजे हिंदू धर्माची '**पुनरुज्जीवन चळवळ**' असे मानले जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने