CLASS - 7 

MEDIUM - MARATHI 

SUBJECT - Social Science 

SYLLABUS - KARNATAKA STATE 

QUESTION BANK OF  LESSON BASED ASSESSMENT

पाठ – 05: ब्रिटिश सत्तेचा विस्तार (1758 – 1856)

I. खालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा.

1. ईस्ट इंडिया कंपनीने बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून कोणाला नियुक्त केले? (मध्यम)

A) रॉबर्ट क्लाइव्ह

B) कॉर्नवॉलिस

C) वॉरेन हेस्टिंग्ज

D) वेलेस्ली

2.   ब्रिटिशांनी नवाब मीर जाफरला त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे पदच्युत केले आणि या व्यक्तीला बंगालचा नवाब म्हणून स्थापित केले. (मध्यम)

A) मीर कासिम

B) मीर सादिक

C) सालार जंग

D) मुझफ्फर जंग

3.   बक्सारचे युद्ध _____ AD मध्ये झाले. (मध्यम)

A) 1757 AD

B) 1764 AD

C) 1765 AD

D) 1799 AD

4.   बक्सारचे युद्ध कोणामध्ये लढले गेले? (मध्यम)

A) मीर कासिम आणि ब्रिटिश

B) मिरान आणि ब्रिटिश

C) मीर जाफर आणि ब्रिटिश

D) मीर कासिम आणि मीर जाफर

5.   ब्रिटिश व्यापाऱ्यांना कर न भरता व्यापार करण्याची विशेष परवानगी दिली जात असे त्यांना म्हणतात (मध्यम)

A) नोंदवही/हक्कपत्र

B) परवानगी पत्रे

C) दस्तक - व्यापार परवाने/पास

D) पास

6.   1765 AD मध्ये मुघल सम्राट शाह आलम II कडून ब्रिटिशांना मिळालेला अधिकार (मध्यम)

A) दिवानी हक्क

B) प्रशासनाचा अधिकार

C) व्यापाराचा अधिकार

D) किल्ले बांधण्याचा अधिकार

7.   दिवानी म्हणजे _____ गोळा करण्याचा अधिकार (मध्यम)

A) व्यापार कर

B) जमीन महसूल

C) प्रति व्यक्ती कर

D) व्यवसाय कर

8.   1765 च्या करारानुसार, कंपनीने मुघल सम्राटाला दरवर्षी द्यायची रक्कम (मध्यम)

A) 20 लाख

B) 22 लाख

C) 24 लाख

D) 26 लाख

9.   रेग्युलेटिंग अॅक्ट (नियंत्रक कायदा) पारित झालेले वर्ष (मध्यम)

A) 1771 AD

B) 1772 AD

C) 1773 AD

D) 1774 AD

10. वॉरेन हेस्टिंग्जला _____ कायद्यानुसार बंगालचा पहिला गव्हर्नर-जनरल म्हणून नियुक्त केले होते. (मध्यम)

A) रेग्युलेटिंग अॅक्ट

B) पिट्स इंडिया अॅक्ट

C) इंडियन कौन्सिल अॅक्ट

D) ईस्ट इंडिया अॅक्ट

11.  रेग्युलेटिंग अॅक्टमधील दोष सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारने पारित केलेला कायदा आहे (मध्यम)

A) रेग्युलेटिंग अॅक्ट

B) पिट्स इंडिया अॅक्ट

C) इंडियन कौन्सिल्स अॅक्ट

D) रॉलेट अॅक्ट

12. पिट्स इंडिया अॅक्ट ब्रिटिश सरकारने या वर्षी पारित केला (मध्यम)

A) 1773 AD

B) 1774 AD

C) 1783 AD

D) 1784 AD

13. टिपू सुलतान आणि हैदर अली यांनी ब्रिटिशांशी लढलेली युद्धे म्हणून ओळखली जातात (मध्यम)

A) अँग्लो-म्हैसूर युद्धे

B) अँग्लो-शीख युद्धे

C) अँग्लो-मराठा युद्धे

D) कर्नाटक युद्धे

14. 1775 ते 1818 दरम्यान लढल्या गेलेल्या अँग्लो-मराठा युद्धांची संख्या (मध्यम)

A) 2

C) 4

B) 3

D) 5

15. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात, शीख संघटित गट या नावाने ओळखले जात होते (मध्यम)

A) पंथ

B) प्रांत

C) मिसल

D) प्रजासत्ताक

16. शिखांना एकत्र करून त्यांना एक शक्तिशाली राजकीय शक्तीमध्ये रूपांतरित करण्याचे श्रेय कोणाला जाते? (मध्यम)

A) गुरू गोविंद सिंग

B) रणजीत सिंग

C) तेग बहादूर

D) रणवीर सिंग

17. पंजाब राज्य ब्रिटिश राजवटीखाली या वर्षी आले (मध्यम)

A) 1757 AD

B) 1849 AD

C) 1857 AD

D) 1784 AD

18. अफगाण शासकाने कोहिनूर हिरा कोणाला भेट दिला? (मध्यम)

A) रणजीत सिंग

B) गुरू गोविंद सिंग

C) रणवीर सिंग

D) तेग बहादूर

19. सहाय्यक सैन्य पद्धत प्रणाली सुरू करणारा गव्हर्नर-जनरल कोण आहे? (मध्यम)

A) लॉर्ड कॉर्नवॉलिस

B) लॉर्ड डलहौसी

C) लॉर्ड वेलेस्ली

D) लॉर्ड कॅनिंग

20.     दत्तक घेतलेल्या मुलांना वारसा हक्क नाकारणारे 'दत्तक वारस नामंजूर(Doctrine of Lapse)' धोरण सुरू करणारा गव्हर्नर-जनरल ओळखा. (मध्यम)

A) लॉर्ड कॉर्नवॉलिस

B) लॉर्ड डलहौसी

C) लॉर्ड वेलेस्ली

D) लॉर्ड कॅनिंग

21. भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध या साली झाले (मध्यम)

A) 1757 AD

B) 1764 AD

C) 1857 AD

D) 1947 AD

II. खालील प्रश्नांची एका शब्दात, किंवा एका वाक्यात उत्तरे द्या.

22.     ब्रिटिश इतिहासकार भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळाला काय संबोधतात? (सोपे)

23.     दिवानी हक्कांचा अर्थ काय आहे? (सोपे)

24.     ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमध्ये सार्वभौम हक्क कसे मिळवले? (सोपे)

25.     रेग्युलेटिंग अॅक्टचे मुख्य उद्दिष्ट काय होते? (सोपे)

26.     ब्रिटिशांनी कोणत्या प्रदेशाला आपले प्रशासकीय मुख्यालय बनवले? (सोपे)

27.      चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धानंतर ब्रिटिशांनी म्हैसूर राज्याचे किती भागांमध्ये विभाजन केले? (सोपे)

28.     रणजीत सिंग आधुनिक भारताचा एक अविस्मरणीय महाराजा कसा बनला? (मध्यम)

29.     शीख राज्य काय होते? (सोपे)

30.     प्राचीन भारतीय दत्तक प्रथेविरुद्ध असलेले ब्रिटिश धोरण कोणते होते? (सोपे)

31. ब्रिटिशांनी सुरू केलेली कोणती दोन धोरणे भारतीय शासकांसाठी हानिकारक होती? (सोपे)

III. जुळवा जुळवा: (मध्यम)

32.                                            

1.    सहायक आघाडी   - डलहौसी

2.   दत्तक वारस नामंजूर      - 1764

3.   दुसरे कर्नाटक युद्ध - 1857

4.   बक्सारचे युद्ध       - दिवानी हक्क

5.   भारतीय स्वातंत्र्य युद्ध - लॉर्ड वेलेस्ली

IV. खालील प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे द्या.

33.     सहाय्यक सैन्य पद्धतीने ब्रिटिश साम्राज्याच्या विस्तारात कशी मदत केली? सहाय्यक सैन्य पद्धतीचे परिणाम काय झाले? (मध्यम)

34.     दत्तक वारस नामंजूर(Doctrine of Lapse) धोरणाने भारतीय संस्थानांना ब्रिटिश साम्राज्यात जोडण्यास कशी मदत केली? न्यायोचित करा. (मध्यम)

35.     दिवानी हक्कांचे परिणाम काय होते? (कठीण)

36.     दत्तक वारस नामंजूर अन्यायकारक का होते? (कठीण)

37.      बक्सारच्या युद्धाची कारणे काय होती? (मध्यम)

38.     बक्सारच्या युद्धाचे परिणाम काय होते? (मध्यम)

39.     बक्सारच्या युद्धाने ब्रिटिशांना भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास कशी मदत केली? स्पष्ट करा. (मध्यम)

40.     मुघल सम्राट शाह आलम II कडून ब्रिटिशांनी कोणत्या प्रांतांचे दिवानी हक्क मिळवले? (सोपे)

V. खालील प्रश्नांची पाच किंवा सहा वाक्यात उत्तरे द्या (3 गुण).

41. रेग्युलेटिंग अॅक्ट (नियंत्रक कायदा) द्वारे ब्रिटिशांनी भारतातील सत्ता कशी ताब्यात घेतली? (मध्यम)

42.     दक्षिण भारतात ब्रिटिशांची सत्ता कशी हळूहळू वाढली, स्पष्ट करा. (मध्यम)

43.     अँग्लो-मराठा युद्धांच्या परिणामांबद्दल लिहा. (कठीण)

44.     अँग्लो-शीख युद्धांवर एक टीप लिहा. (मध्यम)

VI. खालील प्रश्नांची सात ते आठ वाक्यात उत्तरे द्या.

45.     मीर कासिमला सत्तेवरून हटवण्यासाठी ब्रिटिशांना प्रवृत्त करणारी मुख्य कारणे कोणती होती? ती सूचीबद्ध करा. (मध्यम)

46.     भारतात ब्रिटिश वर्चस्वाच्या वाढीस कारणीभूत ठरलेल्या प्रमुख घटकांवर चर्चा करा. (कठीण)


 


Post a Comment

أحدث أقدم