/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

VIDYAPRAVESH DAILY ACTIVITY WEEK -3 DAY -14 (विद्याप्रवेश - दैनंदिन कृती)

 


       

  विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता कार्यक्रम खेळता खेळता शिक’ या तत्वावर आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे.उदाहरणार्थ बाहुल्या,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची कुतूहलजनक पुस्तके,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत.आपण निवडलेली साधने अथवा खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे.

    शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले 05 दिवस याप्रमाणे नियोजित केल्या आहेत.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम हाती घ्यावा.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी देण्यात आला आहे.या दिवशी आपण इतर पाच दिवस केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे.

विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच

विद्याप्रवेश - दैनंदिन कृती

आठवडा -3

दिवस - 14

तासिका

कृतींचे विवरण

अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज)

कृती :  1

प्रत्येक मुलाला तिच्या/त्याच्या नावाने बोलावून

 “Good morning, welcome”Have a Ting tong Tuesday” असे म्हणून मुलांचे स्वागत करणे. मुले  “Good morning Thank you. Same to you” असे प्रत्युत्तरादाखल म्हणतील व हस्तांदोलन करतील.

कृती: 2 आदल्या दिवशीप्रमाणे ‘कदमताल’ कृती करवून घेणे.

 

गुजगोष्टी

कृती : तुमचे तुम्हीच ऐका

पद्धत : 1.मुलांना वर्तुळाकार बसविणे.

2. आज कोणता वार असा प्रश्न विचारणे...मुले ‘मंगळवार’ असे उत्तर देतील

(What day is it today?       Today is Tuesday) असे इंग्रजीमध्ये देखील प्रश्न विचारून उत्तर मिळविण्यासहीत मार्गदर्शन करा.

3. शिक्षकांनी मुलांना डोळे बंद करण्यास सांगणे.

4. आता डोळे बंद केल्यानंतर कसे वाटते ते विचारणे.

5.कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी डोळे आवश्यक आहेत असे उत्तर येण्यासाठी प्रोत्साहित करणे.

6. कान, नाक, जीभ इत्यादीविषयी बोलण्यास प्रेरित करणे.  

( सूचना: शिक्षक आपल्या स्वताचे काही प्रश्न विचारू शकतात. आणि मुलांना आपल्या स्थानिक भाषेत बोलण्यास प्रेरित करणे.)

कृती: ऱ्हाईम (Rhyme)  Head, shoulders, knees and toes

पद्धत: तालबद्ध व योग्य अभिनयासहित  ऱ्हाईम (Rhyme)  मुलांना सादर करून दाखविणे.

              Head, shoulders, knees and toes

              Knees and toes, Knees and toes,

              Head, shoulders, knees and toes

              It’s my body. It’s my body.

              Eyes and ears and mouth and nose

  Mouth and nose, Mouth and nose,

              Eyes and ears and mouth and nose

              It’s my body. It’s my body.

 

माझा वेळ (Free Indore play)

*मूल सर्व अध्ययन कोपऱ्यातील कृतीमध्ये व्यस्त असल्याची तसेच योग्यरीत्या पूर्ण करत असल्याची खात्री करणे.

*अपूर्ण कृती पूर्ण करण्यासाठी मुलाला सहाय्य करणे.

*पुढील दिवसामध्ये कोणत्या मुलाकडे अधिक लक्ष द्यावे याची मानसिक तयारी करावी.

*दिवसाच्या शेवटी अध्ययन कोपऱ्यामध्ये पुढील टप्प्यातील कृती करण्यासाठी आवश्यक साहित्यांची तयारी करणे.

पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती)

सामर्थ्य : शब्दांची जाणीव/ओळख, स्मरण आणि पर्यावरणाची जागृती. कृती -2 ऐक आणि सांग(Listen and tell) ध्येय – 3 उद्देश : शब्द ऐकून ओळखणे.

आवश्यक साहित्य : ध्वनिवर्धक, मोबईल

पद्धत: मुलांना विविध गटामध्ये बसवून ध्वनिवर्धकाच्या सहाय्याने प्राण्यांचे आवाज ऐकविणे, आणि प्राण्याचे नाव ओळखण्यास सांगणे.सर्व मुलांना संधी मिळेपर्यंत कृती सुरु ठेवणे.

इयत्ता 2 री च्या मुलांना- 1) शिक्षकांनी प्राणी,पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करून त्यांची नावे ओळखण्यास सांगणे.

2) प्राणी,पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल  करण्यास  सांगणे.

इयत्ता 3 रीच्या मुलांना- 1)स्थानिक भागात उपलब्ध असलेल्या वाद्यांची नावे ओळखण्यास सांगणे.

2) त्या वाद्यांची यादी करणे.

3) वाद्याचा वापर करून एखादे बालगीत म्हणणे.

सृजनशीलता आणि सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये.

( मुलांच्या कृती)

सामर्थ्य :सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये व सृजनशीलता यांचा विकास.

कृती: 51 ठिपके जोडून चित्र बनव व रंग भर . ध्येय – 1

उद्देश:

·         सूक्ष्म स्नायूंची वाढ होते.

·         हात व डोळे यांच्यातील समन्वय विकसित करणे.

·         रंगाची कल्पना होणे.

आवश्यक साहित्य: क्रेयोन्स, कलर पेन्सील, खडू.

पद्धत: विविध आकारातील व आकृतिबंधातील ठीपकेयुक्त  चित्रे मुलांना देवून ठिपके जोडून चित्र पूर्ण करण्यास सांगणे.त्यानंतर चित्र क्रेयोन्स, कलर पेन्सील च्य सहाय्याने रंग भरण्यास सांगणे.

टीप: इयत्ता 2 री व  इयत्ता 3 रीच्या मुलांना त्यांचे आवडते चित्र रेखाटण्यास सांगून रंग भरण्यास सांगणे.

 

भाषा विकास आणि पायाभूत साक्षरता

श्रवण करणे व बोलणे

सामर्थ्य : ध्वनी शास्त्राची ओळख, शब्दभांडाराची वृद्धी, चालना कौशल्यांचा विकास होतो. कृती : 15 लयबद्ध शब्द ऐकणे ( ध्येय -2 ) ECL-4   ( 8 व्या दिवशीची या विभागातील कृती पुढे सुरु ठेवणे)

उद्देश:

·         ध्वनिशास्त्राची ओळख करून देणे.

·         लयबद्ध शब्दांच्या माध्यमातून शब्दभांडार वाढविणे.

·          स्थूल तसेच सूक्ष्म स्नायू चालना कौशल्य विकसित करणे.

पद्धत:

मुलांना 4 थ्या दिवशी म्हणून घेतलेली बालगीते पुन्हा म्हणून घेणे.

बालगीते गातेवेळी लयबद्ध शब्दावर थोडा जास्त जोर देणे.

बालगीताला साजेसा अभिनय करण्यास सांगणे.

जोर देवून म्हटलेले लयबद्ध शब्द वैयक्तिकरित्या म्हणून घेणे.

टीप: 2 री व 3 री च्या मुलांनी शिक्षकाचे अनुकरण करत बालगीते  तालबद्ध ,चालीमध्ये तसेच अभिनय करीत गायन करणे. गायिलेली गीते लिहुण्यास सांगणे.(26  व्या दिवशी पूर्ववत करणे.)

 

आकलानासहित वाचन

सामर्थ्य :शब्द ओळखणे, मुद्रित लेखनाची ओळख, अर्थग्रहण/आकलन, शब्दसंपतीची वृद्धी

कृती- 11-A- नामफलक (ध्येय-2)    

उद्देश: नामफलकातील नावे चित्राच्या सहाय्याने ओळखणे  व वाचणे

आवश्यक साहित्य: दृकपट्ट्या ( Flashcards), वही , चित्र तक्ता  

पद्धत:

-मुलाचे नाव लिहून बाजूला कोणत्याही प्राणी/पक्षी/वस्तू  यांचे चित्र चिकटविणे आणि नामफलक( Lable) तयार करणे.

-आपले नाव ओळखून वाचण्यास सांगणे. एखाद्या वेळेस आपले नाव ओळखण्यात यशस्वी न झाल्यास चित्राच्या मदतीने आपले नाव ओळखण्यास/वाचण्यास समर्थ करणे.

टीप: 2 री व 3 री च्या मुलांना आपल्या मित्राचे नाव ओळखण्याची कृती करवून घेणे.

उद्देशीत लेखन

सामर्थ्य : लेखन कौशल्य,सृजनशीलता यांचा विकास, डोळे व हात यांच्यामधील समन्वय.

कृती-2 मुक्त हस्त चित्र रेखाटने. ECW-6 (ध्येय -2 )

 उद्देश :

·         लेखनाचे प्रारंभिक कौशल्ये रुजविणे.

·         डोळे व हात या मधील समन्वय वृद्धिंगत करणे.

·         क्रियात्मक अभिव्यक्तीला वाव देणे.

आवश्यक साहित्य:पाटी, पेन्सील/खडू

पद्धत:पाटी वर मुक्तपणे लिहिण्यास,आपल्याला जे वाटते ,ते रेखाटण्याची संधी देणे.त्यांच्या लेखनाविषयी त्यांना बोलण्याची संधी देणे.प्रश्नांच्या द्वारे लेखनाबद्दल माहिती घेणे.

टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना त्यांनी स्वतः रेखाटलेल्या चित्राविषयी 4-5 वाक्ये बोलण्यास सांगणे

 

 

v  आदर्श लेखन  

·         शिक्षक मुलांच्या समोर फलकलेखन करणे.

·         लेखनाचा योग्य क्रम पाहण्याची संधी मुलांना उपलब्ध करून देणे.

·         मुलांची नावे, मुलांनी काढलेली चित्रांची नावे वैगेरे मुलांच्या समोर लिहिणे.

·         शिक्षक वर्गात जे कांही फलक लेखन करतील ते मुलांना व्यवस्थित दिसेल अश्यापद्धतीने करणे.

 

मैदानी खेळ

 

कृती: लगोरी ध्येय – 1

सामर्थ्य : हात, पाय यांची हालचाल, चपळता विकसित होते.

आवश्यक साहित्य: 7 चपटे दगड/ लगोरीच्या सोंगट्या , स्पंज चा चेंडू

पद्धत:

      मुलांना दोन गटामध्ये विभागणे.

      एका छोट्या वर्तुळामध्ये 7 चपटे दगड/लगोरीच्या सोंगट्या एकमेकावर रचून ठेवणे.

      वर्तुळापासून थोड्या अंतरावर रेषा ओढणे.

      त्या रेषेवरून गटातील सदस्यांनी रचलेल्या सोंगट्या चेंडूने पाडणे.सोंगट्या खाली पाडल्यास त्याच गटातील सदस्यांनी पुन्हा रचण्याचा प्रयत्न करणे.

      सोंगट्या रचत असताना विरोधी गटातील सदस्यांनी त्यांना चेंडूने मारण्याचा प्रयत्न करणे.चेंडूचा स्पर्श न होता खेळाडूंनी पडलेल्या सोंगट्या रचल्यास  1 गुण देवून पुन्हा त्याच गटाला संधी देणे. आणि चेंडूचा स्पर्श झाल्यास विरोधी गटाला संधी देणे.

      अशारितीने खेळ सुरु ठेवने व अधिक गुण मिळविणाऱ्या गटाला विजयी घोषित करणे.

      टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना देखील वरीलप्रमाणे खेळ खेळविणे.

रंजक कथा

 

 

पद्धत:

Ø  आदल्या दिवशीच्या उद्देशान्वये रंजक कथा हि तासिका पूर्ववत करणे.

Ø  शिक्षकांनी कथा सांगण्याबरोबरच विविध प्रश्नांच्या माध्यमातून कथा पूर्ण करणे.

Ø  उदा: वस्तूचा रंग कोणता?मुलाचे नाव काय?

 

पुन्हा भेटू

 

·        दिवसभरात केलेल्या कृती पुनरावर्तीत करणे.

·        दिवसभरात केलेल्या कृती पालकांशी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यास प्रोत्साहित करणे.

·        दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने शाळेत यावीत, यासाठी एक आनंददायी संदर्भ निर्माण करून मुलांना निरोप देणे.

‘तू करून बघ’ हि कृती करण्यासाठी योग्य योजना आखणे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा