/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

NAVAVI MARATHI 3. SUSHLOK VAMANACHA (सुश्लोक वामनाचा)

     

                                                                          ३. सुश्लोक वामनाचा

                                                                                                       -वामन पंडित


परिचय :

वामन पंडित (1608-1695)
पूर्ण नाव - वामन नरहर शेषे
पंडिती संप्रदायाचे प्रातिनिधीक कवी होते. त्यांचे संस्कृत व फारसी भाषेवर प्रभुत्व होते. 'यथार्थदीपिका' ही गीतेवरील टीका प्रसिद्ध आहे. 'निगम सार', 'श्रुतिसार', 'गीतार्णवसुधा' हे अध्यात्मपर ग्रंथ, 'भरतभाव', 'वालक्रीडा', 'पंचसुधा' अशी सरस आख्यानकाव्ये व भर्तृहरीच्या 'नीतिशतकाचे' सरस भाषांतर केलेले त्यांचे श्लोक प्रसिद्ध आहेत.

भाषाप्रभुत्व, रचनाकौशल्य, विविध वृत्तात्मक श्लोकरचना करून 'सुश्लोक वामनाचा' ही गौरवोक्ती त्यांनी सार्थ केली आहे.यमक अलंकाराचा त्यांनी विपुल वापर केला आहे म्हणून वामन पंडिताना 'यमक्या वामन' असे संबोधले जाते.

नवीन शब्दार्थ

बळाने - सामर्थ्यानिशी, ताकद लावून

  मकर मगर

दाढेत-दातातं

सिंधु - समुद्र,रत्नाकर
महासिंधु - महासागर

महासर्प - मोठा साप

भुजबळ बाहुसामर्थ्याने

सुम- फूल, सुमन

सम - सारखे

निज स्वतःच्या

शिरीं – मस्तकावर

  क्षुद्र - मूर्ख माणूस

  हृदय धरवेना - मनधरणी करणे, मनाची समजूत घालणे

वृक्ष - झाड

लवती - खाली वाकतात

फलभारे - फळांच्या ओझ्याने

भार -ओझे फल - फळ 

लोंबति - खाली लोंबतात, जमिनीच्या दिशेने खाली येतात

  जलद-मेघ, ढग

तें - तोच पाण्याचा थेंब नलिनी - कमळ

दल - पाकळी

परी - प्रमाणे

सन्मौक्तिक-चांगल्या सुंदर मोत्याप्रमाणे

नीर- पाणी, जल

विभव - संपत्ती

उपकारपरांचा - दुसऱ्यांवर उपकार करणाऱ्यांचा
तोय - पाणी
संतप्त - अतिशय तापलेला
लोह - लोखंड
लोहांतरी - लोखंडावर
न उरते - शिल्लक राहत नाही
स्वातीस्तव - स्वाती नक्षत्रामध्ये
अब्धि - समुद्र
शुक्ती पुट - शिंपला
दुर्मंत्रे - दुष्ट, स्वार्थी, लाचखाऊ मंत्र्यामुळे
नृप - राजा
यती - साधु, संन्यासी
लालने - अति लाड
द्विजाती -ब्राह्मण जात
दुष्पुत्रे - दुराचारी पुत्रामुळे
खल - दुष्ट
आराधने - सहवासाने
शुक्तीपुटकीं - शिंपल्यात
यथावकाश-समयानुसार
गमनमार्ग - (पैसा) जाण्याचा मार्ग
दान-दान करणे
द्रव्य - पैसा, धन
भोग-उपभोग घेणे
करी - हाताने
पात्र - सत्पात्री
वेदानध्ययने - वेदांचा अभ्यास न केल्याने, आत्मसात केलेले ज्ञान इतरांना न दिल्याने ।
कृषि -शेती
मद्ये - मद्यपानाने
शाठ्यें - लबाडीने वागल्यास
मा - लक्ष्मी
मद - अति
गर्व = रुका पैसा
प्रमादे-चुकीच्या मार्गाने पैशाचा विनियोग केल्यास


स्वाध्याय :
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ) वामन पंडित या परंपरेतील अग्रगण्य होत.
(अ) संत परंपरा
(
ब) पंडिती परंपरा
(
क) शाहिरी
(
ड) अर्वाचीन काव्य
उत्तर -(ब) पंडिती परंपरा

(
आ) 'यमक्या वामन' असे यांना म्हणतात.
(अ) मोरोपंत
(
ब) मुक्तेश्वर.
(
क) वामन पंडित
(
ड) नरहरी

उत्तर -क) वामन पंडित


(
इ) 'सुश्लोक वामनाचा' या कवितेतील श्लोक या पुस्तकातून घेतले आहेत.
(अ) नीतिशतक
(
ब) वैराग्य शतक
(
क) शृंगार शतक
(
ड) केकावली

उत्तर -(अ) नीतिशतक


(
इ) दुसऱ्यावर उपकार करणाऱ्यांचा स्वभाव हा आहे.
(अ) दान करणे
(
ब) नम्र होणे
(
क) कष्ट करणे
(
ड) दया करणे

उत्तर –(ब) नम्र होणे

(उ) जल देणारा तो..........
(अ) जलदाई
(
ब) जलद
(
क)जलदाता
(
ड) नभ

उत्तर –(क)जलदाता


(
ऊ) अतिलाड केल्याने.......
(अ) मुलगा आनंदीत होतो
(
ब) सुसंस्कार होतो
(
क) मुलगा बिघडतो
(
ड) मुलगा हट्टी होतो.

उत्तर –(क) मुलगा बिघडतो

(
ए) राजा व राज्य यामुळे लयाला जाते.
(अ) दृष्ट, स्वार्थी, लाचखाऊ मंत्र्यांमुळे
(
ब) ऐषारामामुळे
(
क) पैसा उधळल्याने
(
ड) आळसामुळे

उत्तर –(अ) दृष्टस्वार्थीलाचखाऊ मंत्र्यांमुळे


प्र. 2 (रा) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(अ) वामन पंडितांनी आपल्या काव्यात कोणत्या अलंकाराचा विपुल प्रमाण वापर केला आहे ?
उत्तर -वामन पंडितांनी आपल्या काव्यात एमक्या वामन या अलंकाराचा विपुल प्रमाणात वापर केला आहे.
(
आ) झाडे कशाच्या ओझ्याने खाली वाकतात ?
उत्तर - झाडे फळाच्या ओझाने खाली वाकतात.
(
इ) थोर माणसे कशाचा गर्व करीत नाहीत?
उत्तर -थोर माणसे संपत्तीचा गर्व करीत नाहीत.
(
ई) पाण्याचा थेंब केव्हा मोत्याप्रमाणे चमकतो?
उत्तर - पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातील शिंपल्यात पडल्यावर मोत्यासारखे चमकते.
(
उ) लोखंडाच्या उदाहरणातून कवीने कोणता विचार मांडला आहे?
उत्तर - लोखंडाच्या उदाहरणातून कवीने अधम,मध्यम व उत्तम स्वभावाच्या माणसांचा विचार मांडला आहे.
ऊ) धनाच्या तीन अवस्था कोणत्या?
उत्तर - दान करणे.
उपभोग घेणे.
द्रव्याचा नाश करणे.
(
ए) ब्राह्मणजात कशामुळे नष्ट होत आहे असे वामनपंडितांना वाटते ?
उत्तर - वेदाचा अभ्यास न केल्याने व आत्मसात केलेला ज्ञान इतरांना न दिल्यामुळे ब्राह्मण जात नष्ट होत आहे.असे वामन पंडितांना वाटते.
(
ऐ) शेती कोणत्या कारणाने नापीक बनते ?
उत्तर - शेतीची नीट देखभाल न केल्यामुळे शेती नापीक बनते.
(
ओ) लक्ष्मी कोणत्या कारणाने नष्ट होते?
उत्तर - उणमत्तपणाने वागण्यामुळे लक्ष्मी नष्ट होते.

 

प्र. 3 (रा) खालील प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) मूर्खाचे लक्षण सांगा ?
उत्तर - आपण मूर्ख व्यक्तीला कधीच समजावू शकत नाही.एखाद्या वेळी आम्ही मगरीच्या दाढेत अडकलेला मणी काढू शकतो. महासागर पोहून पार करू शकतो.एखाद्या सापाला मस्तकावर ठेवू शकतो.पण मूर्खासोबत एक क्षणही राहणे धोक्याचे ठरू शकते.
(
आ) 'परोपकारी व्यक्तीचा स्वभाव संपत्तीकाळातही नम्र असतो' यासाठी कोणती उदाहरणे दिली आहेत?
उत्तर - फळझाडे त्यांच्या फळांच्या ओझाने खाली वाकतात.काळे ढग पाणी घेऊन खाली वाकतात.त्याचप्रमाणे परोपकारी व्यक्तीचा स्वभाव असतो.परोपकारी व्यक्तीजवळ संपत्ती असली तरीही संपत्तीचा गर्व न करता अत्यंत नम्रपणानेच दुसऱ्याशी वागतात नम्र असतात त्यामध्ये बदल होत नाही.
(
इ) सज्जनांच्या संगतीने उत्तम अवस्था प्राप्त होते हे पटवून देण्यास कोणते उदाहरण दिले आहे ?
उत्तर -सज्जनाच्या संगतीने आपल्यामध्ये अनेक बदल होऊ शकतात.जसे की,एक पाण्याचा थेंब लोखंडावर पडला तर तो नाहीसा होतो.जर तोच थेंब कमळाच्या पाकळीवर पडला तर तो सुंदर मोत्याप्रमाणे चमकतो व तो स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला तर मोती बनतो.थेंब तोच पण संगत वेगळी आहे.
(
ई) संगतीने माणसाला अधम, मध्यम अवस्था प्राप्त होते हे सांगण्यासाठी कोणती उदाहरणे दिली आहेत.
उत्तर - माणसाला लोखंडासारख्या तप्त माणसाची संगत लाभली असेल तर तो लोखंडासारखा तप्त रागीट बनून अधम होतो. तोच कमळासारख्या मृदू स्वभावाच्या माणसांच्या संगतीत असेल तर तो मध्यम स्थितीची अवस्था प्राप्त करतो आणि तोच माणूस स्वाती नक्षत्रातील शिंपल्यात मिळणाऱ्या मोठ्या सारखा माणसाच्या संगतीत असेल तर त्याला उत्तम अवस्था प्राप्त होते हा संगतीचा परिणाम आहे.
प्र.4 (था) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
(अ) परंतु क्षुद्राचे हृदय धरवेना क्षणभरी ।।
संदर्भ - वरील ओळ 'सुश्लोक वामनाचा' या कवितेतील असून या कवितेची कवी वामन पंडित हे आहेत.
स्पष्टीकरण - एखाद्यावेळी आपण मगरीच्या दाढेतील मनी काढू शकतो.महासागर पोहून पार करू शकतो.सापाला आपल्या मस्तकावर घेवू शकतो.पण आपण क्षणभरही मूर्ख माणसाच्या मनाची समजूत घालू शकत नाही. असे वरील ओळीतून कवी सांगत आहेत.
(
आ) हा स्वभाव उपकार-पराचा ।।
संदर्भ - वरील ओळ 'सुश्लोक वामनाचा' या कवितेतील असून या कवितेची कवी वामन पंडित हे आहेत.
स्पष्टीकरण- कवी वरील ओळीतून म्हणत आहेत की,झाडे फळांच्या ओझाने नम्रपणे खाली वाकतात.काळे ढग जमिनीच्या दिशेने दुसऱ्यांना पाऊस देण्यासाठी झुकतात.त्याचप्रमाणे थोर मनाच्या व्यक्ती आपल्या जवळील संपत्तीचा गर्व करीत नाहीत.दुसऱ्यांवर उपकार करणाऱ्या माणसांचा वैभव काळ जवळ असतो.
(
इ) ते स्वातीस्तव अब्धिशुक्ती- पुटकीं मोती घडे नेटकें ।
संदर्भ - वरील ओळ 'सुश्लोक वामनाचा' या कवितेतील असून या कवितेची कवी वामन पंडित हे आहेत.
स्पष्टीकरण- कवी वामन पंडितांनी स्वाती नक्षत्रात समुद्रातील शिंपल्यात पडणारे पाण्याचे थेंब जसे सुंदर मोत्याचे रूप धारण करतात.त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती चांगल्या स्वभावाच्या माणसांच्या संगतीत राहतात.त्या उत्तम अवस्था प्राप्त करून घेतात.असे आपल्या तिसऱ्या श्लोकात माणसाच्या संगतीच्या होणारे परिणामाबद्दल म्हटले आहे.

 
प्र.5 (वा) खालील प्रश्नांची पाच ते सहा ओळीत उत्तरे लिहा.
(अ) द्रव्याच्या तीन अवस्थांचे वर्णन करा.
उत्तर –

दान करणे -जेव्हा आपल्याकडे जास्त संपत्ती असते.तेव्हा त्या संपत्तीचा गर्व न करता आपण गरजू लोकांना दान केले पाहिजे.
पैशाचा उपभोग घेणे - जेव्हा आपल्याकडे जास्त संपत्ती असते.तेव्हा ती संपत्ती तशीच साठवून न ठेवता त्याचा उपभोग घेतला पाहिजे.
पैशाचा नाश होणे- संपत्तीवर गर्व करून त्याचा उपयोग न होता किंवा दुसऱ्याला दान न करता आपण पैशाचा संग्रह केला तर पैशाचा नाश होतो.
(
आ) मूर्खाची समजूत घालणे कठीण आहे यासाठी कोणती उदाहरणे दिली आहेत.
उत्तर - मूर्ख माणसाची समजूत घालणे कठीण असल्याचे सांगताना कवी वामन पंडितांनी मगरीसारख्या रागीट प्राण्याच्या तोंडातील दाढेत सापडलेला मणी - दगड आपण तिचा जबडा ताकदीने उघडून एक वेळ काढू शकू किंवा आपल्या पोहोण्याच्या बहु सामर्थ्याच्या जोरावर महासागराच्या उत्तुंग लाटूनही पोहून जाऊन पैलतीर गाठू शकू अथवा भयानक मोठ्या अशा सापालाही फुलासारखे डोक्यावर ठेवून घेऊ शकतो.परंतु एखाद्या मूर्ख माणसाची समजत घालणे मात्र अत्यंत कठीण अवघड असल्याचे कवीने म्हटले आहे.
प्र. 6 (वा) खालील प्रश्नांची आठ ते दहा ओळीत उत्तरे लिहा.
(अ) परोपकारी व्यक्तींचा नाव कसा असतो? हे सांगण कोणती उदाहरणे दिली आहेत?
उत्तर - परोपकारी व्यक्तीचा स्वभाव अत्यंत नम्रतेचा असतो.हे पटवून देण्यासाठी कवी वामन पंडितांनी झाडे,ढग आणि ज्याच्याजवळ अमाप संपत्ती आहे किंवा त्यांना मिळाली असून जर ते दुसऱ्यावर उपकार करण्याच्या वृत्तीचे असतील तर त्यांच्यात नम्रताच आढळून येते.फळभाराने झाडे ओथंबलेली असताना ते वाकतात.त्यांच्या फांद्या वाकतात नम्र होतात.त्याचप्रमाणे दुसऱ्यावर उपकार करणाऱ्या माणसांचा वैभव काय जवळ असताना नम्रपणाने वागणे हाच त्यांचा मूळ स्वभाव असतो अशी उदाहरणे कवीने दिली आहेत.
(
आ) जीवनातील कोणत्या गोष्टी हातातून निघून जीवन वाया जाते असे कवीला वाटते?
उत्तर -वामन पंडितांनी आपल्या जीवनातून जाणाऱ्या बारा गोष्टींद्वारे आपले जीवन वाया जाते असे आपल्या श्लोकाद्वारे सांगितले आहे.त्यामध्ये दुष्टता,स्वार्थ, लाचखाऊपणा असलेल्या मंत्र्यांमुळे राज्य व राजा नष्ट होतात,संन्यासांनी प्रापंचिक माणसाशी केलेली संगत.मुलाचे प्रमाणबाहेर लाड.वेदांचा अभ्यास न केल्याने व आत्मसात केलेले ज्ञान इतरांना न दिल्याने ब्राह्मण जात वाया जाते,दुराचारी पत्रामुळे स्वकुळाचा नाश,दुष्टाच्या संगतीने शील बिघडते,शेतीकडे दुर्लक्ष केल्याने शेती नष्ट होते.म्हणून मतपणे वागण्याने लक्ष्मी निघून जाते लबाडीने वागल्याने मैत्री नष्ट होते सतत प्रवास अतिपरिचय यामुळे स्नेह नष्ट होते आणि चुकीच्या मार्गाने पैसा खर्च केल्यास धन नष्ट होते अशा गोष्टी कवीने सांगितले आहेत.

 

भाषाभ्यास
अ) समानार्थी शब्द लिहा.
मकर - मगर
सिंधू - सागर
वृक्ष - झाड
मेघ - जलद
पाणी - जल
कमल - नलिनी
पैसा - द्रव्य
कर - हस्त
नृप - राजा
आ) विरुद्धार्थी शब्द लिहा.

उपकार × उपकार
नम्र ×उद्धट
×आगमन
तप्त ×शितल
दृष्ट × चांगला
अध्ययन × अध्यापन
बलवान × दुर्बल
पात्र × अपात्र
इ) खालील शब्दांचा विग्रह करून समास ओळखा
1. महासर्प - मोठा असा साप
समास - कर्मधारय समास

2.महासिंधू - मोठा असा समुद्र
समास - कर्मधारय समास

3.जलद - धारण करणारा असा मेघ
समास - कर्मधारय समास

4.फलभार – फळांचा भार

समास - षष्ठी तत्पुरुष समास

5.गमनमार्ग – जाण्याचा मार्ग

समास – षष्ठी तत्पुरुष समास

6.दुष्पुत्र – दुष्ट असा पुत्र

समास - कर्मधारय समास

7.दुर्मंत्रे – दुष्ट असा मंत्री

समास - कर्मधारय समास

(ई)अलंकार ओळखा.
वृक्ष फार लवती फलभारे ।।
लोंबती जल-द घेऊनी नीरें ।
थोर गर्व न धरी वि-भवाचा ।।
हा स्वभाव उपकार पराचा ।
उत्तर – यमक अलंकार 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा