/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

VIDYAPRAVESH DAILY ACTIVITY WEEK -3 DAY -13 (विद्याप्रवेश - दैनंदिन कृती)

                          

       

  विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता कार्यक्रम खेळता खेळता शिक’ या तत्वावर आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे.उदाहरणार्थ बाहुल्या,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची कुतूहलजनक पुस्तके,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत.आपण निवडलेली साधने अथवा खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे.

    शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले 05 दिवस याप्रमाणे नियोजित केल्या आहेत.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम हाती घ्यावा.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी देण्यात आला आहे.या दिवशी आपण इतर पाच दिवस केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे.

विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच

विद्याप्रवेश - दैनंदिन कृती

आठवडा -3

दिवस - 13

तासिका

कृतींचे विवरण

अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज)

कृती: कदमताल

आवश्यक साहित्य: ड्रम/ढोल .

1.तीन वेळा टाळ्या वाजवून मुलांना वर्गात प्रवेश करण्यास सांगून  Hi teacher ( हाय टीचर) असे म्हणण्यास सांगणे.


शिक्षकांनी “hello..............”(विद्यार्थ्याचे नाव) घेवून स्वागत करणे.

आदल्या दिवशी प्रमाणे कदमताल कृती करणे.

2.प्रत्येक विद्यार्थ्याना त्यांच्या नावानिशी बोलावून

  “Good morning, welcome”Have a magical Mondayअसे म्हणून मुलांचे स्वागत करणे.

मुलांना  Thank you. Same to you” असे हस्तांदोलनासाहित प्रत्युत्तर देण्यास प्रेरित करणे.

गुजगोष्टी

कृती – 1 – माझ्याविषयी थोडेसे..............

सामर्थ्य : स्वत्वाची जाणीव, सकारात्मक वैयक्तिक कल्पनांची अभिवृद्धी,श्रवण आणि बोलण्याचे कौशल्य विकसित होते.

उद्देश: विशिष्ट /ठराविक विषयावर बोलणे.

आवश्यक साहित्य :पिशवी( Bag), पेपर, बॉल, बॉक्स, कंगवा, पेन्सिल, खडे, गोट्या, कापूस, खेळणी, काठी, वाळलेले पान, साबण  इत्यादी.

पद्धत : 1. मुलांना वर्तुळाकार उभे करणे.

        2.  दोन वेळा टाळ्या वाजवून एकदा उडी मारणे. (Clap twice, jump once)

      दोन वेळा लंगडी घालून हवेत हात हलवणे. (Hop twice, Wave your hands) हि कृती घेणे

        3. मुलांना वर्तुळाकार बसवून शिक्षकांनी वस्तूंनी भरलेली पिशवी घेवून वर्तुळामध्ये बसने.

        4. मुलांना चेंडू देवून  क्रमवार हस्तांतरित( Pass) करण्यास सांगणे.मध्येच शिक्षकांनी ‘STOP’ असे उच्चारले             असता, ज्या मुलाच्या हातात चेंडू असेल त्याने पुढे येवून पिशवीतील एक वस्तू निवडून ती काय/कोणती  वस्तू  आहे ते ओळखणे.

5. त्यानंतर मुलाने ती वस्तू कशी ओळखली असे विचारून मुलाला वस्तूचा आकार, रंग, इत्यादी विषयी बोलण्यास प्रेरित करणे.

6. कृती पुनरावार्तीत करून प्रत्येक मुलाला संधी मिळेल या प्रमाणे पहा.

( शिक्षकांनी स्वताचे काही प्रश्न विचारून आणि मुलांना स्वताच्या स्थानिक भाषेत बोलण्याची संधी देणे.)

माझा वेळ (Free Indore play)

मुले आपल्या आवडत्या अध्ययन कोपऱ्यात जावून कृती करणे.

 शिक्षकाने नियमावलीप्रमाणे / मार्गदर्शकाप्रमाणे कार्य करणे.

पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती)

सामर्थ्य :कमी-ज्यास्त संकल्पना, निरीक्षण, ओळखणे, पर्यावरणाविषयी जागृती.

कृती:33 –कमी-जास्त-समान ( ध्येय-3) 

उद्देश - कमी-जास्त-समान हि संकल्पना समजून घेणे.

आवश्यक साहित्य : भिन्न प्रमाणात धान्ये, खेळण्यातील नोटा व नाणी,

पद्धत :तांदूळ/डाळी/नाचना/मसूर इत्यादी धान्याच्या  भिन्न प्रमाणातील राशी बनवणे.मुलांना निरीक्षण करण्यास सांगून कोणती राशी कमी/जास्त/समान असे ओळखण्यास सांगणे.

 इयत्ता 2 री च्या मुलांना : 1. वरीलप्रमाणे विविध आहार धान्य वापरून कमी- ज्यास्त  असा फरक ओळखण्यास सांगणे.

2. 10 रुपयाची नोट व 20 रुपयाची नोट दाखवून त्यामधील  कमी- ज्यास्त  असा फरक ओळखण्यास सांगण.

इयत्ता-3 री-  विविध किमतीच्या खेळणी वापरून कमी-जास्त-समान ओळखण्यास सांगणे.

वापरावयाची अध्ययन पत्रिका- I.L- 12  ( इयत्ता- 1 ली , 2 री, 3 री )

सृजनशीलता आणि सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये.

(मुलांच्या कृती)

सामर्थ्य : समाजाभिमुख वर्तणुकीचा विकास, इतरांच्या भावना आणि हक्क यांचा आदर, सृजनशीलतेचा विकास,निरीक्षण व कल्पना शक्तीचा विकास, शब्दासंपतीची वृद्धी होते.

कृती- 10 आपले सण (ध्येय-1)

उद्देश :

·         मुलांना आपल्या संस्कृती परंपरांची जाणीव होणे.

·         सौंदर्याचा आस्वाद घेण्याची वृत्ती वाढविणे.

·         राष्ट्रीय सण साजरे करून देशप्रेम जोपासणे.

आवश्यक साहित्य : सण/उत्सव यांची चित्रे/दृकपट्ट्या( Flashcards)

पद्धत :

 मुलांना प्रमुख सण ( राष्ट्रीय व सांस्कृतिक) व ते साजरे करण्याची पद्धत यांची माहिती देणे.स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, मकर संक्रांत/पोंगल/बिहू, लोहरी, दिवाळी, दसरा, होळी, ईद, ख्रिसमस,गुरुपौर्णिमा इत्यादी.सणांचे महत्व समजून सांगणे.त्याचबरोबर ते सण साजरे करताना सुरक्षतेची काळजी घेण्यासंदर्भातहि मार्गदर्शन करणे.भारतात सण कसे व केंव्हा साजरे करावेत याची माहिती मुलांना देणे.

इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना सण साजरे करताना वापरण्यासाठी तोरण बनविन्यास सांगणे.

वापरावयाची अध्ययन पत्रिका- H.W.-3 ( इयत्ता- 1 ली , 2 री, 3 री )

भाषा विकास आणि पायाभूत साक्षरता

श्रवण करणे व बोलणे

सामर्थ्य :श्रवण कौशल्याचा विकास,क्रियात्मक स्व-अभिव्यक्ती, औपचारिक संभाषण, रंगाची कल्पना.

कृती-8 – पहा आणि सांगा ( ध्येय-2) ECL-8

उद्देश –

·         निवडलेल्या विषयावर अस्खलितपणे बोलणे.

·         औपचारिक संभाषणाचे कौशल्य विकसित करणे.

·         श्रवण केलेल्या/ऐकलेल्या मुद्यावर आपला अभिप्राय देणे.

·         सृजनशील अभिव्यक्तीला वाव देणे.

 आवश्यक साहित्य: प्राणी, पक्षी, वाहने इत्यादींची चित्रे/खेळणी.

पद्धत :

प्राणी, पक्षी, वाहने इत्यादींची चित्रे/खेळणी एका पिशवीमध्ये भरणे. एकेका मुलाला पुढे बोलावून पिशवीतून एक खेळणे/चित्र बाहेर काढण्यास सांगणे.निवडलेल्या वस्तूविषयीचा आकार, रंग,उपयोग,लक्षणे,इत्यादीविषयी बोलण्यास सांगणे.

 इयत्ता 2 री च्या मुलांना त्यांनी निवडलेल्या विषयावर 2-3 मिनिटे बोलण्यास प्रेरित करणे.

इयत्ता 3 रीच्या मुलांना त्यांनी निवडलेल्या विषयासंबधी दैनंदिन वापर वैगेरे बाबत बोलण्यास सांगणे.

आकलानासहित वाचन

सामर्थ्य : शब्दासंपतीची वृद्धी ,स्व-अभिव्यक्ती,

कृती: 1 B : पाहून वाच

उद्देश : वस्तूच्या कवर ( wrappers) वरील चित्र किंव्हा छापील  मजकूर पाहून वाचणे.

 आवश्यक साहित्य: विविध टाकावू वस्तूंचे कवर्स ( wrppers), बस तिकिट्स, पावत्या इत्यादी.

पद्धत :

एका रिकाम्या बॉक्स मध्ये लिखित मजकूर असलेल्या वस्तूंचे कवर्स ( Wrappers) ठेवणे.मुलांनी पुढे येवून बॉक्स मधील कवर बाहेर काढून त्यावरील चित्र/लिखित मजकूर ओळखून वाचणे.

इयत्ता 2 री व  इयत्ता 3 रीच्या मुलांना वस्तूवरील कवर ओळखण्या बरोबरच त्यावरील इतर सूचना तसेच दिनांक वैगेरे बाबी वाचण्यास सांगणे.

उद्देशीत लेखन

सामर्थ्य:हेतुपूर्वक लेखन, एकाग्रता आणि श्रवण कौशल्य, सृजनात्मक विचार, शब्दासंपतीची वृद्धी.

कृती:32 अनुभवात्मक लेखन (ध्येय – 2 ) ECW-8

उद्देश :

·         अनुभवात्मक लेखन ( shared Writing) परिचय करून देणे.

·         हेतुपूर्वक लेखन करण्याचा क्रम समजून घेणे.

·         लेखनामध्ये सृजनात्मक विचार व्यक्त करणे.

·         शब्दसंपत्ती वाढविणे.

आवश्यक साहित्य: फळा, पेपर इत्यादी.

पद्धत:

पूर्ण वर्गाच्या मदतीने एक लिखित लेख रचणे. हि कृती महिन्यातून दोन किंवा तीन वेळा करू शकतो.मुलांनी एकमेकांशी एखाद्या विषयावरचे आपले अनुभवांची चर्चा करणे किंवा एकत्रितपणे वाचलेल्या एखाद्या पुस्तकाचे विश्लेषण यासारख्या बाबींवर कथा रचणे.

 कांही सुचविलेले विषय: घर, चहा कसा तयार करावा,बागेला दिलेली भेट.

 लक्षात ठेवा:

·         प्रत्येक विषयाची सुरुवात करता येण्यासाठी  कांही पर्याय( clues) देणे.व लेखनाचे प्रात्यक्षिक देणे.

·          प्रथम शिक्षकाने सुरुवातीचे वाक्य सांगून  फळ्यावर लिहिणे.त्यानंतर मुलांना आपले स्वताचे वाक्य सांगण्यास सांगा व ते फळ्यावर एकाखाली एक  लिहा.

·         मुलांना आपल्या मातृभाषेत प्रतिसाद देण्याची संधी देणे.

टीप: इयत्ता 2 री व  इयत्ता 3 रीच्या मुलांना वरील सांगितलेली कृती लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्यास सांगणे.

 

v  आदर्श लेखन  

·         शिक्षक मुलांच्या समोर फलकलेखन करणे.

·         लेखनाचा योग्य क्रम पाहण्याची संधी मुलांना उपलब्ध करून देणे.

·         मुलांची नावे, मुलांनी काढलेली चित्रांची नावे वैगेरे मुलांच्या समोर लिहिणे.

·         शिक्षक वर्गात जे कांही फलक लेखन करतील ते मुलांना व्यवस्थित दिसेल अश्यापद्धतीने करणे.

 

मैदानी खेळ

कृती : आंधळी कोशिंबीर

सामर्थ्य : तर्क/ अंदाज बांधण्याचे कौशल्य विकसित होते.

पद्धत:

§  एका मुलाचे डोळे बांधून इतर मुलांना लपून बसण्यास सांगणे.

§  ठराविक वेळेत लपलेल्या मुलांना शोधण्यास सांगणे.

§   ज्या मुलाला प्रथम शोधून काढतो त्या मुलाचे डोळे बांधून खेळ पुढे सुरु ठेवणे.

रंजक कथा

Ø  शीर्षक : सोनी आणि टोमॅटो

Ø  आवश्यक साहित्य : वस्तू/चित्रे.

Ø  उद्देश :

Ø  श्रवण कौशल्य विकसित करणे.

Ø  बोलण्याचे कौशल्य वृद्धिंगत करणे.  

Ø  पद्धत : शिक्षकांनी कथा योग्य शैलीमध्ये वाचणे.

Ø  कथेतील पात्रे/वस्तू मुलांना समजून सांगणे.

Ø  प्रथमता कथा मराठीमध्येच सांगणे.

Ø  त्यानंतर कथा मराठीत सांगता सांगता मध्ये मध्ये कथेतील पात्रे / वस्तू इंग्रजी मध्ये परिचित करून देणे.

Ø  त्यांनतर त्या शब्दांचे पुनरुच्चार करून घेणे.

कथा:

पुन्हा भेटू

 

·        दिवसभरात केलेल्या कृती पुनरावर्तीत करणे.

·        दिवसभरात केलेल्या कृती पालकांशी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यास प्रोत्साहित करणे.

·        दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने शाळेत यावीत, यासाठी एक आनंददायी संदर्भ निर्माण करून मुलांना निरोप देणे.

·        ‘तू करून बघ’ हि कृती करण्यासाठी योग्य योजना आखणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा