/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

9. RASHTRASANT TUKADOJI MAHARAJ (9. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज)

 इयत्ता - सहावी 

विषय - मराठी 

पाठ - 9 

प्रश्नोत्तरे 

9. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

नवीन शब्दार्थ

उन्नत - श्रेष्ठ, उच्च

प्रवृत्त - तयार, उद्युक्त 9

स्वयंपूर्ण - परिपूर्ण

संदेश – निरोप

स्वावलंबन स्वःताचे काम स्वतः करणे

निरखणे - पाहणे

पुरस्कार - पारितोषिक, बक्षीस

आ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.

1) तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव काय ?

उत्तर : माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट हे तुकडोची महाराजांचे पूर्ण नाव होय.

2) माणिकला लोक कोणत्या नावाने बोलवू लागले?

उत्तर: माणिकला लोक 'देवबाबा' या नावाने बोलवू लागले.

3) धर्म सेवाश्रमाची स्थापना का केली?

उत्तर :धर्म सेवाश्रमाची स्थापना तरुण कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केली

4) देशाचा खरा आधार कोण आहे?

उत्तर : छोटी छोटी खेडी हा देशाचा खरा आधार आहेत.

5) कर्नाटक शासनाने कोणते अभियान सुरु केले आहे?

उत्तर: कर्नाटक शासनाने खेडी सुधारावी या हेतूने 'निर्मल ग्राम स्वच्छता अभियान' सुरू केले आहे.

6) स्वच्छतेची सुरुवात कोठून केली पाहिजे?

उत्तर : स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून, शाळेपासून, परिसरापासून झाली पाहिजे.

आ. खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिही.

1) तुकडोजी महाराजांचा जन्म केव्हा व कोठे झाला?

उत्तर : तुकडोजी महाराजांचा जन्म 29 एप्रिल 1909 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला.

2) गावकरी स्वच्छतेचा वेगळा आनंद केव्हा अनुभवत?

 उत्तर : तुकडोजी महाराजांच्या संघटनेचे काही कार्यकर्ते झाडू, खराटे,पाट्या आणून सफाईला सुरुवात करत. कचरा काढून गोळा करीत असत. लहान लहान खड्डे भरून घेत.सांडपाण्याला वाट करून देत.कचरा गावाबाहेर नेत. आणि तिथे मोठी चर खणून त्यात टाकत.असं स्वच्छतेच काम होई. त्या स्वच्छ रस्त्यावर, घराभोवतीच्या स्वच्छ जागेत शेणसडा टाकून सारवून घेत. रांगोळी काढत. गावाचं हे बदललेलं रूप सारे निरखत. स्वच्छतेचा एक वेगळा आनंद अनुभवत.

3) तुकडोजीनी गावोगावी कोणता संदेश पोहचविला?

उत्तर: स्वच्छता करून न थांबता कचऱ्याचा योग्य वापर कसा करावा हेही तुकडोजी महाराजांनी शिकवलं. “खतातून अन्न व अन्नातून खत" हा संदेश त्यांनी गावोगावी पोहचविला.

4) संघटनेचे कार्यकर्ते स्वच्छता कशी करत असत?

उत्तर: तुकडोजी महाराजांच्या संघटनेचे काही कार्यकर्ते झाडू, खराटे,पाट्या आणून सफाईला सुरुवात करत. कचरा काढून गोळा करीत असत. लहान लहान खड्डे भरून घेत.सांडपाण्याला वाट करून देत.कचरा गावाबाहेर नेत. आणि तिथे मोठी चर खणून त्यात टाकत.असं स्वच्छतेच काम होई व शेवटी स्वच्छ जागेत शेणसडा टाकून सारवून घेत व त्यावर रांगोळी काढत.

5) तुकडोजीना 'राष्ट्रसंत' म्हणून का ओळखले जाते?

उत्तर : गावं सक्षम झाली पाहिजेत, स्वावलंबी बनली पाहिजेत यासाठी तुकडोजी सतत काम करत राहिले.लेखन करत राहिले. भजनं व भाषणं करत राहिले. लोक शिक्षणाचं हे थोर काम केल्यामुळेच त्यांना “राष्ट्रसंत" म्हणून ओळखले जाते.

6) तुकडोजींचे विचार काय होते?

उत्तर : गावं सक्षम झाली पाहिजेत, स्वावलंबी बनली पाहिजेत.कारण गावं सुधारली की देशाचा विकास होईल असा तुकडोजींचा विचार होता.महिला सबलीकरण झाले पाहिजे.अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे असेही त्यांचे मत होते.

इ. कंसातील योग्य शब्द शोधून रिकाम्या जागा भर.

(स्वच्छ, मंजुळादेव, पुरस्काराची, सक्षम, माणिक)

1) तुकडोजी महाराजांचे लहानपणीचे नाव माणिक होते.

2) तुकडोजीच्या आईचे नाव मंजुळादेवी होते.

3) गाव सक्षम झाली पाहिजेत.

4) कर्नाटक शासनाने आर्थिक सहकार्य व पुरस्काराची घोषणा केली आहे.

5) आपण दररोज अंगण स्वच्छ केले पाहिजे.

ई. विरुध्दार्थी शब्द लिही.

1) प्रगती x उन्नती

2) आळशी x उद्योगी

3) विकसित x अविकसित

4) स्वच्छ X अस्वच्छ

5) आनंद x दुःख

6) देशभक्त x देशद्रोही

उ. समानार्थी शब्द लिही.

1) देव - ईश्वर

2) आई – जननी , माता

3) शहर - नगर

4) लोक - जन

5) सफाई - स्वच्छ

6) झाडू – केरसुणी

ऊ.खालील शब्द नमुन्याप्रमाणे लिही.

नमुना : आई-वडील

1) हवा-पाणी

2) केर-कचरा

4) अन्न-पाणी

3) साफ-सफाई

6 ) रोगराई

7) साधू-संत

ऋ.खालील शब्दांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर.

1) सहकार्य - मदत करणे

आम्ही सर्व मुलांनी वयस्कर लोकांना बसमध्ये चढण्यास सहकार्य केले.

2) पुरस्कार - बक्षीस

रोहनच्या गावाला 'निर्मल ग्राम' पुरस्कार मिळाला.

3) साफ – स्वच्छ

आपण सर्वांनी आपले घर साफ ठेवले पाहिजे.

4) जागृत - जागरूक

मी स्वच्छतेविषयी गावात जागृती करणार आहे.

 5) स्वावलंबी – स्वत:वर अवलंबून असलेला

आपला भारत देश अन्नधान्यामध्ये स्वावलंबी बनला आहे.

6) अभियान - मोहीम

आमच्या गावात साक्षरतेचे अभियान चालू आहे. काम, कार्य

7) उद्योग –व्यवसाय  

माझ्या वडिलांनी कापड उद्योग करण्याचे ठरवले आहे.

8) प्रशिक्षण – सराव,शिक्षण

आम्हाला शिक्षकानी कबड्डी चे प्रशिक्षण दिले.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा