/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

NAVAVI MARATHI 7.POYA (POLA) (7. पोया (पोळा))

 

   




 

इयत्ता - नववी 

विषय - मराठी 

राज्य - कर्नाटक

7.     पोया

कवयित्री – बहिणाबाई चौधरी

 


कवयित्री परिचय –


           बहिणाबाई चौधरी ( 1880 – 1951 ) या एक अशिक्षित कवयित्री असून त्यांनी आपल्या जीवनातील अनेक अनुभव कवितेतून व्यक्त केले आहेत. त्यांच्या कवितेत खानदेशी व वऱ्हाडी भाषेचा वापर झाला आहे. ‘बहिणाबाईंची गाणी’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.

शब्दार्थ :
शेंदूर - हा एक केशरी रंग
घोटा - घोटणे,ढवळणे
शेंब्या-शिंगाच्या टोकाला पितळी टोपणाचा अलंकार असतो
अंगावन्हे - अंगावर
बानाई - बहिणाई (बहीण)
चुल्हे - चूल,चुलवण
पुरनाच्या पोया - पुरणाच्या पोळ्या
वखर - शेतीचे अवजार
गणती - मोजणी
कामदार बंदा - काम करणारा एकमेव असा
हेंडालू - झोंबाझोंबी,मगदूल खाऊन सुस्त होणे.
बागूल - मुलांना भय - दाखवण्याकरता केलेला एक पुतळा
खुराक - खाद्य

 


स्वाध्याय :
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ) शेतकऱ्याचा मोठा सण कोणता ?
(अ) पोया
(
ब) पुरन पोया
(
क) बैलांचा
(
ड) शेतीचा
उत्तर - (अ) पोया
(
आ) 'पोळा' सणाला घरदार कसे सजवावयास सांगितले आहे ?
(अ) शेंदूर लाऊन
(
ब) तोरण बांधून
(
क) पोळ्या करून
(
ड) नैवद्य दाखवून
उत्तर -(ब) तोरण बांधून
(
इ) बैलांच्या गळ्यामध्ये बांधलेल्या शेंब्या कशाच्या आहेत ?
(अ) घंट्या घुंगरू
(
ब) कवड्या
(
क) रेशमाचे गोंडे
(
ड) पैंजण्या
उत्तर -(अ) घंट्या घुंगरू
(
ई) बैलांना कशाचा नैवेद्य ठेवावयास सांगितले आहे ?
(अ) पुरणाच्या पोळ्या
(
ब) दहीभात
(
क) कडबू
(
ड)आंबील
उत्तर -(अ) पुरणाच्या पोळ्या
प्र. 2 (रा) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(अ) शेंदूर घोटण्यास का सांगितले आहे?
उत्तर - बैलांना सणानिमित्त सजविण्यासाठी त्यांच्या शिंगाना केशरी लावावा म्हणून शेंदूर घोटण्यास सांगितले आहे.

 

(आ) कवयित्रीने घरदार का व कशाप्रकारे सजवावयास सांगितले आहे?
उत्तर - पोया (पोळा) या बैलांच्या सणानिमित्त घराची सजावट करावी ते स्वच्छ चांगले दिसावे म्हणून दरवाजाला तोरण बांधण्यास बैलांच्या शिंगाना शेंदूर लावून त्यांच्या टोकांना पितळी टोपणांचा अलंकार खालून व रेशमी गोंडे आणि त्यांच्या अंगावर झूल घालून सजविण्यासाठी सांगितले आहे.
(
इ) कोणाच्या कष्टाला गणती नाही, असे कवयित्रीला वाटते ?
उत्तर - बैलांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कष्टांची गणती मोजतात केला जात नाही असे कवयित्रीला वाटते.
(
ई) शेतकरी कोणाच्या जीवावर शेती पिकवितो?
उत्तर - शेतकरी बैलाच्या जीवावर शेती पिकवतो.
(
उ) 'बैल कामदार बंदा' असे का म्हटले आहे?
उत्तर - बैल कंटाळा न करता एखाद्या कष्टकरी गुलामाप्रमाणे शेतकऱ्यांबरोबर रात्रंदिवस राबतो शेतात कष्ट करतो नांगरतो म्हणून त्याला कामदार बंदा असे म्हटले आहे.
(
ऊ) पोळा या सणादिवशी बैलांना खुराक कशाचा दिला आहे?
उत्तर - पोळा या सणादिवशी बैलांना पुरणाच्या पोळ्याचा नैवेद्य व उत्तम दाणाचाऱ्याचा खुराक दिला जातो.
प्र. 3 ( रा ) खालील प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) पोळा या सणादिवशी बैलांना सजविण्याचे वर्णन कसे केले आहे ?
उत्तर - पोळा या सणा दिवशी वाटीमध्ये केशरी रंगाचा शेंदूर घेऊन घोटून त्याचा लेप बैलांच्या शिंगांना द्यावा.त्यांच्या शिंगांच्या टोकांना पितळी टोपणांचा अलंकार घालून त्याला रेशमी गोंडे बांधावेत.गळ्यामध्ये घंटा घुंगरू असलेल्या व कवड्या जडविलेल्या माळा,पायात पैंजण आणि अंगावर उत्तम वस्त्रांची झुल घालून त्यांना सजवावे.
(
आ) बैलाच्या कष्टाचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर - शेतकऱ्याचा बैल शेतात नांगर ओढून नांगरटीस मदत करतो.कष्ट करताना तो मागे पुढे पाहत नाही.अंगचोरपणा करीत नाही.त्याच्या कष्टाची मोजदाद करता येत नाही.या बैलांच्या जीवावरच शेतकऱ्याची शेती होत असते.शेतकऱ्याचे इमाने इतबारे काम करणे हेच त्याचे मोठे काम आहे.

 
प्र.4 (था) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
(अ) 'उभे कामाचे ढिगारे, बैल कामदार बंदा याला कहीनाथे झूल, दानचाऱ्याचाज मिधा "
संदर्भ - वरील काव्यपंक्ती कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पोया (पोळा) या काव्यातील आहेत.
स्पष्टीकरण - बैल हा शेतकऱ्याचा अत्यंत विश्वासाचा कामगार असून तो त्याच्यासाठी त्याच्या शेतातील मोठ-मोठी कष्टाची कामे करून मदत करतो.या कामाबद्दल त्या बैलाला केवळ चारा खायला मिळतो.त्यामुळे या खाण्याचा बैल मिंदा,गुलाम होऊन राहिला आहे.त्या बैलाला असा मिंदेपणा वाटू नये म्हणून त्याच्या अंगावर उत्तम वस्त्राची झूल घालून त्याला आनंदी होऊ द्या.सुखी होऊ द्या. असे कवयित्री म्हणतात.
(
आ) 'नका डालू बैलाले, माझं ऐका रे जरासं व्हते आपली हाऊस, आन बैलाला तरास"
संदर्भ - वरील काव्यपंक्ती कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पोया (पोळा) या काव्यातील आहेत.
स्पष्टीकरण - आया बायांनो सणाचा दिवस आहे.बैलांना त्रास होईल असे काही करू नका.त्यांना निवांतपणा लाभू दे.अशी झोंबाझोंबी ओढाओढी करून आपला क्षणभर खेळ होतो,आपल्याला मौज वाटते,परंतु त्याचा बैलांना त्रास होतो.तसे करू नका असे बहिणाबाई आपल्या घरच्या माणसांना सांगत आहेत.
प्र.5 (वा) खालील प्रश्नांची पाच ते सहा ओळीत उत्तरे लिहा.
(अ) पोळा सणादिवशी कवयित्री कोणती विनंती करते?
उत्तर - पोळा या सणाच्या दिवशी व सणाच्या निमित्ताने घरच्यांना सर्व घर स्वच्छ करा.घराच्या दरवाजाला तोरण लावून घर सजवा.त्याचप्रमाणे एका वाटीत केशरी रंगाचा शेंदूर घेऊन तो चांगला घोटून त्याचा लेप शेंगांना लावून त्याच्या शिंगांच्या टोकावर पितळेच्या टोपणांचे अलंकार घाला व रेशमी गोंडे बांधा.शेंगांना बाशिंगही बांधा आणि बैलांच्या पाठीवर उत्तम वस्त्रांची झूल घाला.गळ्यात घंट्याचे घुंगरू व चारी पायात पैंजण घालून त्यांना सजवा पुरणपोळीचा नैवेद्य द्या.अशी कवयित्रीने विनंती केली आहे.

 
(
आ) बैलाच्या उपकारांच देणं कसं फेडावयास सांगतात ?
उत्तर - बैल खूप मोठे काबाडकष्ट करून नांगरट करून घरात पीक आणतात.शेतकऱ्याला आबादी देतात.त्यांना नटवून सजवून त्यांच्याबरोबर खेळा.त्यांचे आपल्यावरील उपकार जाणून घेऊन त्याबद्दल त्यांच्याशी कृतज्ञतेने वागा. आज सणानिमित्त बैलदेखील आज घरचे पाहुणे समजून त्यांच्याबरोबर प्रेमाने वागून कवयित्री त्या बैलांच्या कष्टाचं उपकाराचं देणं फेडण्यास सांगत आहेत.
प्र. 6 (वा) पुढील प्रश्नाचे सात ते आठ ओळीत उत्तर लिहा.
( अ ) पोळा सणाचे वर्णन कवयित्रीने कसे केले आहे,याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर - पोया हा बैलांचा (जनावरांच) सण आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी या सणादिवाशी आपल्या घरच्या लोकांना लवकर उठून घर स्वच्छ करण्यास आणि घराच्या दरवाजाला तोरण बांधण्यास सांगितले.कारण त्यादिवशी जनावरांचा पोळा हा सणाचा दिवस असून बैलांना आंघोळ घालण्यास सांगितले.तसेच केशरी रंगाचा शेंदूर घेऊन तो एका वाटीत घोटून त्याचा लेप बैलांच्या शिंगास लावण्यास कवयित्रीने सांगितले.शिंगाच्या टोकावर पितळी टोपणांचे अलंकार घालून त्यांना रेशमी गोंडे बांधण्यास सांगितले आहे.बाशिंग बांधून गळ्यात घंटांच्या घुंगरांच्या कवड्या जोडलेल्या माळा व चारी पायात घुंगरू बांधण्यास सांगितले.त्यांचे उपकार स्मरून आजच्या दिवशी त्यांना पुरणपोळीचे जेवण देण्यास कवयित्री सांगते.
भाषाभ्यास :
(
अ) वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. उपकारांच देणं - केलेल्या मदतीची आठवण ठेवणे.
शेतकऱ्यावर बैलाचे उपकाराचे देणे असते.
तो कामदार बंदा - हक्काच्या कामगाराप्रमाणे
बैल हा एक कामदार बंद आहे.
नाही कष्टाला गणती - कष्टाची मोजणी न करणे.
बैलाच्या कष्टाला मोजणी नाही.
तोरण बांधणे - प्रवेशद्वाराला सूशोभित वस्तू बांधणे
तोरणा गड जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले.
शेंदूर लावणे - सजविणे
पैकुनी बैलांना शेंदूर लावला.
 
(
आ) समानार्थी शब्द लिहा.
शेंदूर - केशरी रंग
चुल्हे - चुली
बंदा - हक्काचा नोकर
खुराक - खाद्य, पौष्टीक अन्न

(इ) समास ओळखा.
1.घंट्या घुंगरू - घंट्या,घुंगरू यांचा समूह 

समाहार द्वंद्व समास

2.पुरणपोळ्या - पुरण घालून केलेली पोळी
मध्यमपदलोपी समास
3.आयाबाया - आया,बाया इत्यादी.
समाहार द्वंद्व समास
4.घरदार घर आणि दार व इतर
समाहार द्वंद्व समास
5.नांगर वखर - नांगरणे भरणे इत्यादी.
समाहार द्वंद्व समास
6.दाणा चारा - दाणा आणि चारा इत्यादी
समाहार द्वंद्व समास


 

 

वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये

👇👇👇👇👇👇👇👇👇

वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा 

 

          💠💠🏆🏆💠💠💠🏆

इयत्ता - नववी

मराठी प्रश्नोत्तरे

Click the below link

https://bit.ly/3IuNXV1

✡️e Samved व्हिडिओ✡️

Click the below link

https://www.smartguruji.in/2021/07/blog-post_16.html

मराठी व्याकरण सराव टेस्ट

      Click the below link

MARATHI VYAKARAN SARAV TEST (मराठी व्याकरण सराव टेस्ट) - www.smartguruji.in 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा