/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

10.MASA (pachavi मराठी - 10. मासा)

 

पाठ  - 10 मासा (कविता)

अ. नवीन शब्दांचे अर्थ.

विहरणे - आनंदाने फिरणे

अगणित - न मोजता येण्याइतके

गणती करणे - मोजणे.

सदोदित  - नेहमी, सतत

जल  - पाणी

आ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

1. जलातला मासा कसा फिरत आहे?

उत्तर - जलातला मासा सळकन,सुळकन असा फिरत आहे.

2. माशांचे रंग कुणासारखे असतात?

उत्तर – माशाचे रंग इंद्रधनुसारखे असतात.

3.माशांचे प्रकार किती आहेत?

उत्तर – माशांचे प्रकार अगणित आहेत.

4.जलात राहूनही माशाला काय होत नाही?,

उत्तर - जलात राहूनही माशाला सर्दी किंवा खोकला होत नाही.

5. मासा पाण्याच्या वर मधेच एकदा का येतो?

उत्तर – मासा मौज पाहण्यासाठी पाण्याच्या वर मधेच एकदा येतो.

6. मासा पाण्यातून बाहेर काढल्यास काय होईल?

उत्तर - मासा पाण्यातून बाहेर काढल्यास मरेल.

इ.खालील कवितेच्या ओळी पूर्ण कर,

1. तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनूसम रंग कसे असती

अमुच्यापैकी कांही मासे प्रकाशही देती

2. पोहत राही सदोदीत मी जलात हो वसती

मधे एकदा मौज पाहण्या येतो मी वरती

ई.कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा.

टिकली इतक्या कांही जाती कांही प्रचंडही असती आकारांचे प्रकार अगणित नसे तया गणती.

उत्तर – वरील ओळी मासा या कवितेतील असून कवी कृ.वि.दातार माशाचे वर्णना करताना म्हणत आहेत कि,कांही मासे हे टिकली इतके असतात तर कांही प्रचंड आकाराचे असतात.आणि माशांचे प्रकार इतके आहेत कि ते आपण मोजू शकत नाही.

उ. खाली दिल्याप्रमाणे कवितेतील तालबध्द शब्द लिही.

जसा – मासा

असती – गणती

भिजला – खोकला

वसती – वरती

तुझ्या वहीत माशाचे चित्र काढून ते रंगव.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा