/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

DAHAVI VIDNYAN 7.VIDYUT PRAVAHACHA CHUMBAKIY PARINAM

 

इयत्ता - दहावी 

विषय - विज्ञान 

घटक 7 - विद्युत प्रवाहाचा चुंबकीय परिणाम


महत्वाचे मुद्दे व ऑनलाईन सराव टेस्ट 

चुंबकसूची हा लहान चुंबक आहे. याचे एक टोक उत्तर दिशेला असते त्याला उत्तर ध्रुव म्हणतात अणि दुसरे टोक दक्षिण दिशेला असते त्याला दक्षिण ध्रुव म्हणतात.

■ चुंबकाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ज्याद्वारे आपण चुंबकाचे बल (जोर) ओळखू शकतो.

■ चुंबकिय क्षेत्र दर्शविण्यासाठी चुंबकीय विकर्ष रेषांचा उपयोग करतात. उत्तर ध्रुव हा गृहीतात्मक माध्यमामध्ये मोकळा ज्या मार्गाने फिरतो त्यांना विकर्ष रेषा म्हणतात. दिलेल्या बिंदूवरील चुंबकीय क्षेत्राची दिशा ही उत्तर ध्रुवाच्या दिशेने असते. चुंबकीय क्षेत्र असलेल्या ठिकाणी चुंबकीय विकर्ष रेषा जवळजवळ असतात.

■ विद्युत प्रवाह वाहुन नेत असलेल्या धातू तारेत संलग्नित चुंबकीय क्षेत्र असते. तारेमध्ये विकर्ष रेषांचा समकेंद्रिय वर्तुळांचा संच असतो ज्यांची दिशा उजव्या हाताच्या नियमानुसार असते.

■ वाहकातील विद्युत प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची रचना ही वाहकाच्या आकारावर अवलंबून असते. सॉलेनॉईडमधील चुंबकीय क्षेत्र हे चुंबक पट्टीभोवती असणाऱ्या चुंबकीय क्षेत्राशी जवळ-जवळ समान असते.

■ लोखंडाच्या मऊ तुकड्यावर तांब्याच्या तारेचे दुर्वाहक पदार्थानी गुंडाळलेले वेटोळे ठेवले तर तो विद्युत चुंबक असतो.

■ विद्युत प्रवाह वाहुन नेत असलेला वाहक चुंबकीय क्षेत्रात ठेवल्यास त्यावर बल प्रयुक्त होते. विद्युत प्रवाहाची आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा एकमेकांना लंब असतील तर प्रयुक्त होणारे बल दोन्हीना लंब असते व त्याची दिशा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार समजू शकते. हाच विद्युत मोटरचा पाया आहे. विद्युत मोटर हे असे उपकरण आहे ज्यामध्ये विद्युत उर्जेचे यांत्रीक ऊर्जेत रूपांतर होते.

■कॉईलमध्ये एकक काळात चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर प्रवर्तीत विद्युत प्रवाह निर्माण होतो. त्याला विद्युत चुंबकीय प्रवर्तन असे म्हणतात. कॉईल व कॉईलजवळ ठेवलेला चुंबक यांच्या संबंधीत हालचालीवर चुंबकीय क्षेत्र बदलते. जर विद्युत प्रवाह वाहणाऱ्या वाहकाजवळ कॉईल ठेवली तर वाहकातील विद्युत प्रवाह किंवा कॉईल आणि वाहक यांच्यातील संबंधीत हालचाल यामुळे चुंबकीय क्षेत्र बदलू शकते. प्रवर्तीत विद्युत प्रवाहाची दिशा ही फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार समजु शकते.

■विद्युत जनित्र हे यांत्रीक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते. हे विद्युत चुंबकीय प्रवर्तनावर कार्य करते.

50Hz वारंवारता व 220 v विभवांतर असलेला भिन्न दिक् विद्युत प्रवाह आपल्या घरांना मिळतो. लाल रंगाच्या दुर्वाहक पदार्थाने गुंडाळलेली पुरविलेली एक तार असते तिला भारीत तार म्हणतात. दुसरी काळ्या रंगाच्या दुर्वाहक पदार्थाने गुंडाळलेली तार असते. ती उदासीन तार असते. दोन्ही तारेमधील विभवांतर 220 v असते. तिसरी तार म्हणजे भूसंपर्क तार जी हिरव्या रंगाच्या दुर्वाहक पदार्थानी लपेटलेली असून ती जमीनीच्या खोलवर धातूच्या पट्टीस जोडलेली असते. सुरक्षिततेचा उपाय म्हणून या तारेचा उपयोग करतात. धातूच्या उपकरणामध्ये विद्युत प्रवाह असेल तर उपकरणापासून लागणाऱ्या जबरदस्त विद्युत धक्क्यापासून बचाव करते.

■ फ्युज हे एक महत्वाचे सुरक्षिततेंचे उपकरण आहे जी शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोडींग मुळे निर्माण होणाऱ्या बिघाडामुळे विद्युत मंडलाचे संरक्षण करते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा