📘 पाठाधारित मूल्यमापन (LBA) – महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरांची माहिती

 दिनांक: २८ जुलै २०२५
स्रोत: DSERT कर्नाटक


    2025-26 या शैक्षणिक वर्षापासून, कर्नाटकातील 1 ली ते 10 वीच्या राज्य अभ्यासक्रमाच्या शाळांमध्ये ‘पाठ आधारित मूल्यमापन’ (Lesson Based Assessment - LBA) राबवले जाणार आहे. या मूल्यमापन पद्धतीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पाठानंतरच्या शिकण्याची खात्री करणे, परीक्षेचा ताण कमी करणे व समावेशक शिक्षण प्रक्रियेची अंमलबजावणी करणे आहे.

 LBA चे मुख्य उद्दिष्टे

  1. प्रत्येक पाठानंतर मुलांचे शिक्षण समजले का हे निश्चित करणे.
  2. परीक्षेवरील ताण कमी करून विद्यार्थ्यांच्या शिकण्याची क्षमता वाढवणे.
  3. शिक्षकांची मूल्यमापन कौशल्ये (मौखिक, प्रकल्प, पोर्टफोलिओ आदी) विकसित करणे.
  4. CCE प्रणालीस पूरक ठरणारी नियमित, समावेशक व व्यापक मूल्यमापन प्रक्रिया.
  5. पालकांना मुलांच्या शिकण्याच्या प्रगतीबाबत नियमित माहिती देणे.
  6. मंदगतीने शिकणाऱ्या मुलांसाठी उपचारात्मक शिक्षण पुरवणे.


कर्नाटक राज्यातील शाळांमध्ये पाठाधारित मूल्यमापन (Lesson Based Assessment - LBA) ही मूल्यमापन पद्धत राबवली जात आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, व पालक यांच्यासाठी यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित होतात. खाली दिलेली माहिती DSERT द्वारे अधिकृतपणे जारी करण्यात आली आहे.


 LBA संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

  1. LBA प्रश्नसंच DSERT वेबसाइटवरून कसा डाउनलोड करावा?
     DSERT अधिकृत वेबसाइट
    थेट लिंक:
    Lesson Based Assessment Material
  2. आधीच पूर्ण झालेले पाठ LBA मध्ये नोंदवावेत का?
    होय, त्यांचे गुण SATS प्रणालीमध्ये नोंदवावेत.
  3. तृतीय भाषेसाठी LBA तयार केले आहे का?
    होय, सध्या फक्त हिंदी तृतीय भाषा म्हणून तयार केले आहे.
  4. Bilingual वर्गांनाही LBA लागू आहे का?
    होय, इयत्ता 1 ते 3 साठी प्रश्नसंच तयार आहे. 4 ते 7 साठी तयार करण्याचे काम सुरू आहे.
  5. सर्व प्रश्न फक्त LBA प्रश्नसंचातून घ्यावेत का?
    होय, शिकवण्यापासून मूल्यमापनापर्यंत LBA प्रश्नांचा उपयोग करावा. प्रश्नपत्रिका स्वतः तयार करता येते.
  6. FLN विद्यार्थ्यांसाठी LBA कसे करावे?
    इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच LBA घ्यावे व गुण SATS मध्ये नोंदवावेत.
  7. उर्दू माध्यमासाठी LBA प्रश्नसंच मिळेल का?
    होय, त्याचे भाषांतर व रचना सुरू असून लवकरच उपलब्ध होईल.
  8. प्रत्येक पाठासाठी ब्लूप्रिंटनुसार प्रश्नपत्रिका तयार करावी का?
    होय,
    • इयत्ता 1 ते 5: 10 लेखी + 5 तोंडी = 15 गुण
    • इयत्ता 6 ते 10: 20 लेखी
    • पुनः सिंचन (Marusinchan) असलेल्या जिल्ह्यांसाठी: LBA 15 + पुनः सिंचन 5 = 20 गुण
    • इतर जिल्हे: LBA 20 गुण
  9. आकारिक (FA) व संकलनात्मक (SA) मूल्यमापन घ्यावे का?
    होय, नेहमीप्रमाणे दोन्ही घ्यावे.
  10. SSLC अंतर्गत LBA गुण अंतर्गत मूल्यमापनात धरले जातील का?
    नाही, गतवर्षाप्रमाणेच कार्य सुरू राहील.
  11. गैरहजर विद्यार्थ्यांचे नोंद LBA मध्ये कसे करायचे?
    "AB" (Absent) म्हणून नमूद करावे.
  12. खाजगी शाळांनाही LBA लागू आहे का?
    होय, सर्व राज्य अभ्यासक्रमातील शाळांसाठी LBA लागू आहे.
  13. सर्व स्तरांसाठी LBA प्रश्नसंच वापरावाच लागतो का?
    होय
  14. LBA, Lesson Plan SATS नोंद शिक्षकांसाठी भारदायक आहे का?
    नाही, पूर्वीप्रमाणेच सुलभ व डिजिटल पद्धतीने याचे व्यवस्थापन करता येते. यामुळे विश्लेषणात मदत होते.
  15. SATS मध्ये विभागानुसार LBA गुण नोंदवता येतात का?
    होय
  16. LBA प्रश्नपत्रिकेचे नमुने कधी मिळतील?
    DSERT वेबसाइटवर आधीच उपलब्ध आहेत.
  17. LBA ला लेखी व तोंडी गुण विभागून घेता येतात का?
    होय
    • इयत्ता 1-5: 10 लेखी + 5 तोंडी
    • इयत्ता 6-10: 20 लेखी
    • पुनः सिंचन जिल्हे: LBA 15 + पुनः सिंचन 5 = 20 गुण
  18. भाषा विषयात एक पाठ व एक कविता धरून LBA करता येईल का?
    नाही
  19. समाजशास्त्र विषयात अनेक पाठ एकत्र करून LBA करता येईल का?
    नाही

🖥️ SATS संबंधित समस्या व उपाय:

  • OTP टाकून लॉगिन होत नाही?
    माहिती EEDS/SATS मध्ये अपडेट असावी.
  • अनुदानित शिक्षकांचे SATS लॉगिन आयडी कोणते?
    HRMS लॉगिन आयडी
  • Mobile वर LBA Lesson Plan भरता येईल का?
    होय
  • विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव दिसत नाही?
    उपाययोजना केली गेली आहे.

📌 टीप: शिक्षकांनी DSERT वेबसाइट वेळोवेळी तपासावी. नवीन बदल आणि सूचनांसाठी नियमितपणे अद्ययावत माहिती पहा.


🔗 अधिकृत संदर्भ:
DSERT
आदेश क्र.: E-29933/DSERT/EVG/1-10/2025-26
दिनांक: 17-07-2025


लेखक: शैक्षणिक माहिती प्रभाग
LBA,
मूल्यमापन, DSERT, SATS, शिक्षण सुधारणा, शिक्षक मार्गदर्शन





🛑इयत्ता - 5वी

⭕विषय - गणित

📋पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली

➖➖➖➖➖➖➖➖➖

🔰पाठ 1. 5 अंकी संख्या


🔰पाठ 2.बेरीज


🔰पाठ 3- वजाबाकी


🔰पाठ 4- संख्यांचे अवयव आणि पटी

➖➖➖➖➖➖➖➖

🛑इयत्ता - 5वी

⭕विषय - गणित

📋पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली


🌀Learning Based Assessment

🛑7वी - विज्ञान

🔰 पाठावर आधारित प्रश्न व उत्तरे

🌴1.वनस्पतींचे पोषण


🐶2.प्राण्यांचे पोषण


🛑3.उष्णता (प्रश्नपेढी)


🛑3. उष्णता (उत्तरसूची)


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने