CLASS - 8 

    MEDIUM - MARATHI 

SUBJECT -Social Science 

SYLLABUS - KARNATAKA STATE 

QUESTION BANK OF  LESSON BASED ASSESSMENT

सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.

पाठ 5 आणि 6: सनातन धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्म

अध्ययन निष्पत्ती:

  • सनातन धर्माचा अर्थ आणि व्याप्ती समजून घेणे.
  • भारतीय संस्कृतीची महानता समजून घेणे आणि विविधतेतील एकतेची भावना वाढवणे.

I. खालील प्रश्नांसाठी दिलेल्या चार उत्तरांमधून योग्य पर्याय निवडा.

1.    बुद्धांच्या शिकवणी प्रसिद्ध होण्याचे कारण काय होते? (E)

A) चार आर्य सत्ये

B) प्राकृत भाषा

C) साधी वेशभूषा

D) अष्टांग मार्ग

2.   यांना सनातन धर्माचे पाया मानले जाते. (E)

A) परंपरा

B) पुराणे

C) वेद

D) दर्शने

3.   हिंदू धर्माला सनातन धर्म का म्हटले जाते? (E)

A) कारण त्यात वैदिक प्रथांचा समावेश आहे.

B) कारण तो पुराणे आणि दर्शनांवर आधारित आहे.

C) कारण त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

D) कारण तो प्राचीन काळापासून पाळला जात आहे.

II. एका शब्दात किंवा वाक्यात उत्तरे द्या.

4.   एका सहलीत तुम्ही श्रावणबेळगोळला भेट दिली आणि तेथे पांढऱ्या कपड्यातील जैन भिक्षू पाहिले. हे भिक्षू जैन धर्माच्या कोणत्या पंथाचे आहेत? (E)

5.   'स्मृती' म्हणजे काय? (E)

III. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यांत उत्तरे द्या.

6.   पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक काळात रचलेल्या वेदांची नावे सांगा. (E)

IV. खालील प्रश्नांची पाच ते सहा वाक्यांत उत्तरे द्या.

7.   खालील यादीतून बौद्ध धर्म पाळणाऱ्या राष्ट्रांची निवड करा (बांगलादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, रशिया, चीन, अमेरिका, नेपाळ, भूतान, जावा, तिबेट, ऑस्ट्रेलिया, जपान, कंबोडिया, मलेशिया). (D)

8.   'तुम्ही बुद्धाच्या अष्टांग मार्गाचे पालन करून आनंदी जीवन जगता.' हे सिद्ध करा. (D)

9.   वैदिक काळातील सामाजिक व्यवस्था आणि सध्याच्या काळातील सामाजिक व्यवस्थेमधील फरक विश्लेषण करा. (D)

10. सनातन धर्माची वैशिष्ट्ये सूचीबद्ध करा. (D)

11.  महावीर आणि बुद्धांच्या शिकवणी स्वीकारून कोणती मूल्ये रुजतात? (D)

V. खालील प्रश्नांची सात ते आठ वाक्यांत उत्तरे द्या.

12. जैन धर्म आणि बौद्ध धर्माच्या शिकवणींमध्ये दिसणारी सध्याची मूल्ये सूचीबद्ध करा. (E)

13. शिक्षकांच्या मदतीने, सनातन धर्माशी संबंधित वेदांमध्ये उपलब्ध असलेल्या सूक्तांना (hymns) समजून घ्या आणि लिहा. (D)

Post a Comment

أحدث أقدم