/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

AZADI KA AMRIT MAHOTSAVA - HAR GHAR TIRANGA

 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत 'हर घर तिरंगा' अभियान...
 

 


 

    भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील असंख्य नेते,क्रांतिकारक,देशभक्त तसेच स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण करावे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.स्वातंत्र्य लढ्यातील सर्व देशभक्तांना स्मरण करून त्यांनी स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने 'आजादी का अमृत महोत्सव' अर्थात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

   या अंतर्गत केंद्र सरकारच्या उल्लेख (1) पत्रामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत.या उपक्रमा अंतर्गत सर्व शासकीय/खाजगी आस्थापना/ स्व सहाय्य संघ/सहकारी संस्था/शैक्षणिक संस्था/शाळा/कॉलेजची मुले/इतर सर्व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या इमारतींवर/स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंप्रेरणेने करण्यासाठी सकारात्मक प्रभावी प्रसिद्धी मोहीम राबविण्यात यावी.

         यावर्षी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत याची औचित्य साधुन दिनांक 12 मार्च 2021 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन केंद्र शासनामार्फत करण्यात येत आहे.या अंतर्गत खालील नियम व सूचनांचे पालन करून 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 पर्यंत हर घर तिरंगा अभियान परिणामकारकपणे राबविण्यात यावे.

 

👉केंद्रीय गृह विभाग यांच्या The Flag Code of India 2002 (as amended in 2021) च्या दुरुस्तीनुसार हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत,पॉलिस्टर,लोकर,सिल्क,खादीपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर करता येईल.राष्ट्रध्वजाचा आकार 20" × 30" अथवा याच्या अर्ध्या आकाराचे असावे.



👉दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यासाठी नियोजन करणे.प्रत्येक शासकीय खाजगी आस्थापनावर तसेच ग्रामीण भागातील सर्व गटांना/सहकारी संस्थाना/शाळा/कॉलेजचे मुले यांना घरावर किंवा इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे.

 

  👉हर घर तिरंगा अभियान उपक्रमाशी संबंधित प्रादेशिक भाषेतील भित्तीपत्रके, पोस्टर इत्यादींच्या माध्यमातून बस स्थानके, रेल्वे स्थानक,उद्यान,हॉटेल तसेच प्रत्येक गावातील सार्वजनिक ठिकाणी प्रचार करण्यास प्रयत्न करणे.

👉हर घर तिरंगा अभियानासाठी दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 पर्यंत आपापल्या घरावरती घराच्या अंगणामध्ये कुटुंब संवेद राष्ट्रध्वजारोहण करण्यासाठी पालकांना प्रोत्साहन देणे.सर्व सरकारी अनुदानित व अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मध्ये याविषयी जागृती करणे प्रत्येक दिवशी सकाळी प्रार्थनेच्या वेळी शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी योग्य योजना राबवणे.

👉हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत 11 ते 17 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येक घराघरावरती राष्ट्रध्वज उभारण्यासाठी स्थळी नागरिकांना प्रोत्साहन देणे.

 

👉ग्रामीण भागातील स्थानिक संस्था,पंचायत राज संस्था,मंडळ,अंगणवाडी केंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र,सहकारी संघ,पोस्ट कचेरी,आशा कार्यकर्ते अंगणवाडी कार्यकर्त्या,ग्रामसेवक,शिक्षकांनी उत्तेजन देऊन सक्रियपणे या उपक्रमात भाग घेण्यासाठी The Flag Code of India 2002 (as amended in 2021) च्या दुरुस्तीनुसार राष्ट्रध्वज उभारण्यासाठी जनजागृती करणे.

 👉त्याचबरोबर ग्रामीण भागातील संस्थांनी ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना समुदायांना विविध योजना,पथसंचलन सेमिनार गटचर्चा पोस्टर यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये 'घराघरात राष्ट्रध्वज' कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहन देणे.

👉ग्रामपंचायत मार्फत उत्तम गुणवत्तेचे राष्ट्रध्वज विक्री किंवा वितरण केंद्राची निश्चिती करावी.

तिरंगासोबत आपलं सेल्फी अपलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा... 

 

See the below circular for more details...

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

CLICK HERE TO DOWNLOAD THE CIRCULAR 

भारताची राष्ट्रीय प्रतिके - click here

शालेय प्रार्थना व गीते - Click here 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा