ABC
इयत्ता - 10वी विषय - समाज विज्ञान पाठ 9. स्वातंत्र्योत्तर भारत
प्र. 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा
1. ब्रिटिश भारतातील शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते ?
उत्तर : लॉर्ड माऊंट बॅटन.
2. निधर्मी व समाजवादी हे शब्द घटनेत कितव्या दुरुस्तीनुसार सामील करण्यात आले ?
उत्तर : 42 व्या घटना दुरुस्तीनुसार.
3. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात किती संस्थाने होती ?
उत्तर : 562 संस्थाने.
4. कोणत्या संस्थानांनी विलीनीकरणाच्या प्रक्रियेस विरोध केला ?
उत्तर : जुनागड, हैद्राबाद, जम्मू आणि काश्मीर.
5. भारतीय संस्थानांचे भारतीय संघराज्यात यशस्वीरीतीने कोणी विलीनीकरण केले ?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल.
6. भारताने सैनिकी कारवाई करून मिळविलेले संस्थान कोणते ?
उत्तर : जुनागड
7. पाँडिचेरीवर कोणत्या युरोपियनांची वसाहत होती?
उत्तर : फ्रेंचांची वसाहत होती.
8. स्वातंत्र्यानंतरही गोवा कोणाच्या ताब्यात होता?
उत्तर : पोर्तुगीज
9. गोवा केव्हा स्वतंत्र झाला ?
उत्तर : इ.स. 1961 साली.
10. भाषावार प्रांतरचनेनुसार निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर : आंध्र प्रदेश.
11. राज्य पुनर्रचना कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ?
उत्तर : इ.स. 1956 साली.
12. विशाल म्हैसूर राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
उत्तर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी
13. विशाल म्हैसूर राज्याचे कोणत्या वर्षी कर्नाटक असे नामकरण करण्यात आले ?
उत्तर : इ.स. 1973
14. सध्या भारतात किती राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?
उत्तर : 29 राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश.
15. अखंड भारताचे दोन राष्ट्रामध्ये विभाजन होण्याचे कारण कोणते ?
उत्तर : ब्रिटिशांचे फोडा व राज्य करा हे धोरण
16. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल
17. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद
18. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
उत्तर : पं. जवाहरलाल नेहरू
19. भारताचे 'पोलादी पुरूष' असे कोणाला म्हणतात ?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल
20. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे 'पोलादी पुरुष' का म्हणतात?
उत्तर : भारतातील 562 संस्थानांचे यशस्वीरितीने विलीनीकरण केल्यामुळे.
21. जुनागड संस्थानातील लोकांनी नवाबाविरुद्ध बंड का पुकारले ?
उत्तर : 1) जुनागडचा नवाब हा संस्थानाचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्याच्या तयारीत होता म्हणून लोकांनी नवाबाविरुद्ध बंड पुकारले.
22. हैद्राबादच्या निजामाने भारतात विलीन होण्यास का विरोध केला?
उत्तर : हैद्राबादच्या निजामाला आपले संस्थान स्वतंत्र ठेवायचे होते.
23. संस्थाने विलीनीकरणावेळी जम्मू काश्मीरचा राजा कोण होता ?
उत्तर : राजा हरिसिंग.
24. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचा नेता कोण होता?
उत्तर : शेख अब्दुल्ला.
25. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरला काय म्हणतात ?
उत्तर : पाकव्याप्त काश्मीर. (पीओके),
26. स्वातंत्र्यानंतरही फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या वसाहती कोणत्या ?
उत्तर : पाँडिचेरी, करैकल, माहे, चंद्रनगर.
27. पाँडिचेरीला केंद्रशासित प्रदेश केव्हा घोषित करण्यात आले ?
उत्तर : इ.स. 1963.
28. भारतात जास्त दिवस टिकून राहिलेले युरोपियन कोण होते ?
उत्तर : पोर्तुगीज
29. आंध्र प्रदेशाच्या निर्मितीसाठी उपवास सत्याग्रह यांनी केला?
उत्तर : पोट्टी श्रीरामलू.
30. 1956 मध्ये 'राज्य पुनर्रचना कायद्यानुसार' भारतात किती राज्ये व केंद्रशासित प्रदेश होते ?
उत्तर : 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश
प्र. 2. थोडक्यात उत्तरे लिहा
1. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतापुढे कोणकोणत्या समस्या होत्या?
उत्तर : 1. निर्वासितांची समस्या 2. सरकारची स्थापना 3. जातीय दंगे 4. संस्थानांचे विलीनीकरण 5. सामाजिक असमानता 6. मागासलेली अर्थव्यवस्था
2. निर्वासितांची समस्या कशा पद्धतीने सोडविण्यात आली?
उत्तर : 1. भारताच्या फाळणीनंतर लाखोंच्या संख्येने पाकिस्तानातून निर्वासित भारतात आले. त्यांना उत्तर भारतातील विविध राज्यात आश्रय देण्यात आला. 2. 1971 मध्ये बांगला देशाच्या निर्मितीनंतर लाखो बांगला देशी भारतात आले त्यांना भारत सरकारने प. बंगाल, आसाम, मेघालय व त्रिपुरा या राज्यात आश्रय देऊन आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आल्या, 3. कर्नाटकात आलेल्या तिबेटियन लोकांची कर्नाटकातील म्हैसूर तसेच बैलकुप्पे येथे सोय करण्यात आली.
3. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कशारितीने भारतीय संस्थानांचे विलीनीकरण केले?
उत्तर : 1. 1947 च्या विलीनीकरण कायद्यानुसार सर्व देशीय संस्थानाना भारतात विलीन होण्याचे आव्हान केले. 2. ज्या संस्थानिकांनी भारतीय संघ राज्यात सामील होण्याची तयारी दर्शविली. त्यांना वार्षिक तनखा (पेन्शन) देण्याचे मान्य केले. तसेच त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे राहणीमान देण्याचे मान्य केले. 3. जुनागड, हैद्राबाद व जम्मू काश्मीर ही संस्थाने सोडून इतर सर्व संस्थांने विना तक्रार भारतीय संघ राज्यात सामील झाली.
4. जुनागड संस्थान कशारितीने भारतात विलीन झाले ?
उत्तर : 1. जुनागडचा संस्थानिक पाकिस्तानात सामील होण्याचा विचार करीत होता 2. परंतु तेथील प्रजेने याला विरोध करून बंड पुकारले. 3. बंडाला तोंड न देवू शकल्यामुळे नवाब पाकिस्तानात पळून गेला. 4. अखेर 1949 मध्ये जुनागड भारतीय संघराज्यात सामील करण्यात आले.
5. हैद्राबाद संस्थान भारतीय संघ राज्यात कसे विलीन करण्यात आले?
उत्तर : 1. स्वतंत्र राहण्याच्या उद्देशाने हैद्राबादचा निजामाने भारतीय संघराज्यात सामील होण्यास नकार दिला. 2. साम्यवादी नेत्याच्या नेतृत्वाखाली तेलंगणाच्या शेतकऱ्यांनी सशस्त्र हल्ला चढविला. 3. निजामाच्या क्रूर सैन्याबद्दल प्रजेच्या मनात तीव्र संताप होता. 4. भारत सरकारने लष्कराला पाचारण करून निजामाचा पूर्ण पराभव केला व हैद्राबादचा भारतीय संघराज्यात सामील व्हायचा मार्ग खुला झाला.
6. जम्मू काश्मीर भारतीय संघराज्यात कसे विलीन झाले ?
उत्तर : 1. जम्मू काश्मीरचे राजे हरीसिंग स्वतंत्र राहण्याचा विचार करीत होता. 2. पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यातील काही जमातींच्या सहाय्याने काश्मीरवर हल्ला केला. 3. त्यावेळी सहाय्य मिळविण्यासाठी हरिसिंग भारतात आला 4. भारत सरकारने अट घालून जम्मू काश्मीर भारतात विलीन करून घेतले.
7. पाँडिचेरीला फ्रेंचांच्या तावडीतून कसे सोडविण्यात आले?
उत्तर : 1. स्वातंत्र्यानंतर पाँडिचेरी, करैकल, माहे आणि चंद्रनगर येथे फ्रेंचांच्या वसाहती होत्या. 2. काँग्रेसच्या धडपडीनंतर साम्यवादी आणि इतर संघटनांनी भारतात विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली. 3. 1954 मध्ये ही संस्थाने भारतात विलीन करण्यात आली.
8. 'गोवामुक्ती' आंदोलनाचे वर्णन करा ?
उत्तर : 1. गोव्याचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण करण्यासाठी जोरदार चळवळ चालू होती. 2. पोर्तुगीजांनी आफ्रिका व युरोप येथून जादा सैन्याच्या तुकड्या मागवून स्वतःचे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला. 3. इ.स. 1955 मध्ये भारतीयां पोर्तुगीजांविरूद्ध 'गोवा मुक्ती आंदोलन' सुरू केले. 4. 1961 मध्ये भारत सरकारने गोवामुक्तीसाठी सैन्यबलाचा वापर केला आणि गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला.
9. भाषावार प्रांत रचनेची आवश्यकता का निर्माण झाली ?
उत्तर : 1. राज्यकारभार सुरळीतपणे चालविण्यासाठी भाषावार प्रांतरचनेची मागणी करण्यात आली. 2. ब्रिटिशांच्या काळात राज्यकारभार व्यवस्थित नव्हता. कारण संस्थानांद्वारे राज्यकारभार चालविण्यासाठी वापरली जाणारी भाषा ही सामान्यांची भाषा नव्हती. 3. अशा परिस्थितीत भाषावार प्रांतरचना करण्याची अत्यंत गरज होती. 4. आंध्र महासभेमार्फत पोट्टी श्रीरामुलू यांनी 58 दिवस उपोषण करून 1952 मध्ये प्राणत्याग केला. त्यांनी विशालांधाची मागणी केली होती. 5. 1953 मध्ये आंध्र प्रदेश हे भाषावार प्रांतरचनेतील पहिले राज्य उदयास आले.
10. फाजल अली आयोगाविषयी थोडक्यात माहिती लिहा
उत्तर : 1. केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचनेसाठी 1953 मध्ये 'फाजल अली आयोगाची' रचना केली. 2. फाजल अली हे आयोगाचे अध्यक्ष होते. के. एम. पणिकर आणि एच.एन. कुंजू हे समितीचे सदस्य होते. 3. इ.स. 1953 मध्ये 'आंध्रप्रदेश' हे भाषावार प्रांतरचनेतील पहिले राज्य उदयास आले. 4. या आयोगाच्या शिफारसीनुसार इ.स. 1956 मध्ये 'राज्य पुनर्रचना कायदा' संसदेने संमत केला.
11. कर्नाटक एकीकरण चळवळीविषयी टिपा लिहा.
उत्तर : 1. भारताच्या विविध प्रांतात कन्नड भाषा बोलणारे लोक विखुरलेले होते. 2. हा सर्व भाग एकत्र आणण्यासाठी अखिल कर्नाटक राज्य रचना परिषदेच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू करण्यात आली. 3. शेवटी 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेंगळुरू येथील एका समारंभात तत्कालीन राष्ट्रपती डॉ. बाबू राजेंद्र प्रसाद यांनी 'म्हैसूरु राज्याचे' उद्घाटन केले.
टिप्पणी पोस्ट करा