CLASS - 10
MEDIUM - MARATHI
SUBJECT - Social Science
SYLLABUS - KARNATAKA STATE
1.युरोपियनांचे भारतात आगमन
इयत्ता - 10वी विषय - समाज विज्ञान पाठ १. युरोपियनांचे भारतात आगमन
प्र.१. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
१. भारतातील कोणत्या वस्तुंना युरोपीय बाजारपेठेत जास्त मागणी होती ?
उत्तर : जिरे, मिरी, लवंग, दालचिनी, वेलदोडे, सुंठ यासारख्या मसाल्याच्या पदार्थांना प्रचंड मागणी होती.
२. १४५३ साली अॅटोमन तुर्वांनी कोणते शहर काबीज केले ?
उत्तर : कॉन्स्टॅन्टिनोपल
३. भारताकडे येणारा नवीन जलमार्ग प्रथम कोणी शोधून काढला ?
उत्तर : इ.स. १४९८ साली पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामाने शोधून काढला.
४. कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने जहांगीरकडून वखारी स्थापन करण्यासाठी परवानगी मिळविली ?
उत्तर : सर थॉमस रो.
५. कोणत्या शास्त्रीय शोधांमुळे नाविकांना नवीन जलमार्ग शोधण्यास मदत झाली ?
उत्तर : होकायंत्र, बंदुकीची दारू, अॅस्ट्रोलॅब (ग्रहोन्नतीमापक), अॅटलास, नकाशे या सारख्या शास्त्रीय शोधांमुळे खलाशांना मदत झाली.
६. 'निळ्या पाण्याचे धोरण' (Blue water policy) कोणी अंमलात आणले ? का ?
उत्तर : फ्रान्सिस्को-द-अलमिडाने. सागरी मार्गावर मक्तेदारी मिळविण्यासाठी.
७. पोर्तुगीजांचा पहिला व्हाईसरॉय कोण ?
उत्तर : फ्रान्सिस्को-द-अलमिडा'
८. विजापूरच्या सुलतानाकडून गोवा कोणी जिंकून घेतले ?
उत्तर : पोर्तुगीजांचा व्हाईसरॉय अल्फान्सो अल्बुकर्कने. (इ.स. १५१०)
९. दिवाणी हक्क' म्हणजे काय ?
उत्तर : जमीन महसूल गोळा करण्याचा हक्क.
१०. बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था कोणी सुरू केली ?
उत्तर : रॉबर्ट क्लाईव्ह.
११. प्लासीची लढाई केव्हा ? कोणात झाली ?
उत्तर : बंगालचा नवाब सिराजउद्दौला व इंग्रज (रॉबर्ट क्लाईव्ह) यांच्यात २३ जून १७५७ रोजी.
१२. हैद्राबाद संस्थानची स्थापना कोणी व केव्हा केली ?
उत्तर : १७२४ मध्ये 'आसफ झा' यांनी केली,
१३. वाँदिवॉशच्या लढाईत कोणी कोणाचा पराभव केला ?
उत्तर : वाँदिवॉशच्या युद्धात ब्रिटीश सेनाधिकारी सर आयरे कूट याने फ्रेंचांचा दारूण पराभव केला
प्र.२. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.
१. दस्तक म्हणजे काय ? बंगालच्या नवाबाने दस्तकाला का विरोध केला ?
उत्तर : मुक्त व्यापार करण्याचे परवानगीपत्र म्हणजे **दस्तक** होय. करण्यास दिलेले परवानापत्र. कारण दस्तकाचा वापर कंपनीतील नोकर स्वतःच्या फायद्यासाठी करू लागले म्हणून विरोध केला.
२. मध्ययुगात भारत व युरोप यांच्यातील व्यापार कसा चालत असे?
उत्तर : मध्ययुगात अरबी व्यापारी आशियातील विक्रीचा माल पूर्व रोमन साम्राज्याची (बायंझंटाईन) राजधानी '**कॉन्स्टॅन्टिनोपल**' येथे पोहोचवत असत. तेथून इटलीचे (रोमन साम्राज्याचा भाग) व्यापारी तो माल खरेदी करून युरोपियन राष्ट्रांना विकत असत. अशाप्रकारे कॉन्स्टॅन्टिनोपल हे आंतरराष्ट्रीय वस्तू विनिमयाचे प्रमुख केंद्र बनले.
३. भारताकडे येणारा नवीन जलमार्ग का शोधावा लागला याबद्दल चर्चा करा.
उत्तर : १. १४५३ मध्ये अॅटोमन तुकौनी कॉन्स्टॅन्टिनोपल काबीज केले. २. इटालियन व्यापाराची मक्तेदारी मोडून काढण्यास स्पेन पोर्तुगालने पुढाकार घेतला. ३. तुर्कांनी या मार्गावरून नेण्यात येणाऱ्या व्यापारी वस्तूंवर भरमसाठ कर लावण्यास प्रारंभ केला. ४. नवीन वैज्ञानिक शोधामुळे खलाशांना होकायंत्र, अॅटलास, बंदुकीची दारू, नकाशे यांचा उपयोग झाला.
४. कृष्णरंध्र शोकांतिका म्हणजे काय ?
उत्तर : १७५६ मध्ये बंगालचा नवाब **सिराजउद्दौलाने फोर्ट विल्यम किल्ला सहजपणे काबीज केला** आणि इंग्रजी सैनिकांना बंदी बनविले. बंदी बनवलेल्या ब्रिटीशांना सिराज उद्दौलाने एका छोटया खोलीत डांबले. **१४६ कैद्यांपैकी १२३ जणांचा त्या खोलीतील उष्णतेने गुदमरुन मृत्यू झाला** यालाच '**कृष्णरंध्र शोकांतिका**' असे म्हटले जाते.
५. दुसऱ्या कार्नाटिक युद्धाचे वर्णन करा.
उत्तर : १. फ्रेंचांच्या पाठिंब्याने चंदासाहेब हा कार्नाटिकचा नबाब झाला. २. रॉबर्ट क्लाईव्हने कार्नाटिकची राजधानी अर्काटवर हल्ला करून फ्रेंचांचा व चंदासाहेबाचा पराभव केला. ३. शेवटी या युद्धात चंदासाहेबाला अटक करून त्याची हत्या करण्यात आली. ४. महंम्मद अली याची नबाब म्हणून नेमणूक केली. ५. पाँडिचेरीच्या करारानुसार हे युद्ध थांबले.
६. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय ?
उत्तर : १. १७६५ मध्ये रॉबर्ट क्लाईव्हने बंगालमध्ये **दुहेरी राज्यव्यवस्था** अंमलात आणली. २. या पद्धतीनुसार बंगाल प्रांतातील **जमीन महसूल गोळा करण्याचे अधिकार ब्रिटिशांना मिळाला**. ३. न्यायदान, दैनंदिन राज्यकारभार आणि प्रशासकीय कामकाज नबाबाकडेच राहिले.
प्र.३. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.
१. प्लासीच्या लढाईची कारणे व परिणाम लिहा.
**कारणे** : १) दस्तकाचा गैरवापर २) विनापरवाना किल्ल्याची दुरुस्ती ३) कृष्णरंध्र शोकांतिका.
**परिणाम** : १. मीरजाफर बंगालचा नबाब बनला. २. ईस्ट इंडिया कंपनीस बंगाल बरोबर व्यापार करण्यासाठी अनियंत्रित अधिकार प्राप्त झाले. ३. सिराज उद्दौलाने कलकत्त्यावर केलेल्या आक्रमणाची नुकसानभरपाई म्हणून मीरजाफरने कंपनीला सतरा कोटी सत्तर लाख रुपये दिले.
**परिणाम** : १. मीरजाफर बंगालचा नबाब बनला. २. ईस्ट इंडिया कंपनीस बंगाल बरोबर व्यापार करण्यासाठी अनियंत्रित अधिकार प्राप्त झाले. ३. सिराज उद्दौलाने कलकत्त्यावर केलेल्या आक्रमणाची नुकसानभरपाई म्हणून मीरजाफरने कंपनीला सतरा कोटी सत्तर लाख रुपये दिले.
२. बक्सारच्या लढाईचे कोणते परिणाम झाले?
**परिणाम** : १. ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमधील दिवाणीचे हक्क. २. शाह आलमला वार्षिक २६ लाख रू. घेऊन बंगाल वरील सर्व हक्क सोडून द्यावे लागले. ३. अवधचा नबाब शुजा उद्दौला याला युद्धाची नुकसान भरपाई म्हणून ५० लाख रू. द्यावे लागले. ४. मीरजाफरचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या मुलास मासिक निवृत्तीवेतन दिले. आणि बंगालचा पूर्ण कारभार कंपनी पाहू लागली. ५. या लढाईमुळे **बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांताची संपूर्ण मालकी ब्रिटिशांकडे आली**.
टिप्पणी पोस्ट करा