सर्वेक्षण काळात सर्वेक्षक, पर्यवेक्षक व संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यालय न सोडू नये - मा. जिल्हाधिकारी
कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत सन 2025-26 मध्ये राज्यातील नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक स्थितीबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शासन आदेश क्रमांक: हिंवक 289 बीसीए 2025 दिनांक: 13.08.2025 नुसार, हे सर्वेक्षण 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाले आहे.
सर्वेक्षण कार्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वेक्षक, पर्यवेक्षक, मास्टर ट्रेनर, तालुका नोडल अधिकारी आणि जिल्हा नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वेक्षण कार्य 07 ऑक्टोबर 2025 पूर्वी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी तात्काळ प्रभावाने, 07-10-2025 पर्यंत सर्व दिवस हे कर्तव्याचे दिवस म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
सर्वेक्षण कालावधीत कोणताही अधिकारी/कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये आणि सुट्टीवर जाऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. सर्वेक्षण कार्य निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सामाजिक-शैक्षणिक सर्वेक्षण हे राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व संबंधितांनी कर्तव्यभावनेने सहभाग नोंदवावा, हीच अपेक्षा आहे. वेळेत आणि अचूकपणे हे कार्य पूर्ण होणे आवश्यक आहे.
टिप्पणी पोस्ट करा