पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

दिनांक: 14.08.2025 रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार -

  1.  पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
  2.  भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक पाठ आणि एक कविता विचारात घ्यावी.
  3. इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक पाठ-आधारित मूल्यमापन करावे.
  4. इयत्ता 1 ते 5 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  5. इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
पाठ आधारित मूल्यमापन 2025-26

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता - 4थी विषय - परिसर अध्ययन गुण: 10

पाठ 12 - नकाशा शिका - दिशा जाणा

Question Paper Blueprint

Difficulty Level Weightage (%) Marks
Easy (सोपे) 45% 4.5
Average (साधारण) 40% 4
Difficult (कठीण) 15% 1.5
Total 100% 10

I. योग्य उत्तरे निवडा (1 × 3 = 3 गुण)

1. सूर्य उगवतो ती दिशा कोणती? (सोपे)

  • A) उत्तर
  • B) दक्षिण
  • C) पश्चिम
  • D) पूर्व

2. जागतिक नकाशा म्हणजे काय? (सोपे)

  • A) भारताचा नकाशा
  • B) महासागराचा नकाशा
  • C) दिशा दर्शविणारा नकाशा
  • D) पृथ्वीचा नकाशा

3. भारताच्या उत्तर भागात कोणती पर्वतरांगा आहेत? (सोपे)

  • A) निलगिरी
  • B) विंध्याचल
  • C) हिमालय
  • D) अरावली

II. रिकाम्या जागा योग्य उत्तरांनी भरा (0.5 × 2 = 1 गुण)

4. चार मुख्य दिशा कोणत्या आहेत _______________, _______________, _______________, आणि _______________. (सोपे)

5. ग्रीक लोकांनी पृथ्वीचा नकाशा _______________ मध्ये तयार केला. (सोपे)


III. एक वाक्यात उत्तरे लिहा. (1 × 2 = 2 गुण)

6. नकाशावर किती दिशा दाखवलेल्या असतात? (सोपे)

7. नकाशा मध्ये वापरल्या जाणाऱ्या काही चिन्हांची नावे लिहा. (सोपे)


IV. योग्य जोड्या जुळवा. (1 × 1 = 1 गुण)

8. (साधारण)

A B
i. कर्नाटक a) नकाशावरील मुख्य दिशा
ii. उत्तर b) भारताची दक्षिण दिशा

V. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (1.5 × 2 = 3 गुण)

9. नकाशा काढताना ठळक चिन्हे का महत्त्वाचे असतात? (साधारण)

10. नकाशावर दिशा वापरून एखाद्या ठिकाणाचे स्थान कसे शोधता येते हे स्पष्ट करा. (कठीण)

मौखिक परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न

  1. सूर्य उगवतो ती दिशा कोणती?
  2. कर्नाटक भारताच्या कोणत्या दिशेला आहे?
  3. जागतिक नकाशा म्हणजे काय?
  4. भारताच्या उत्तर भागात कोणती पर्वतरांगा आहेत?
  5. चार मुख्य दिशा कोणत्या आहेत?
  6. धड्यात दिलेल्या उदाहरणात, यास्मिनची दोन पावले किती मीटर इतक्या अंतराच्या होती?
  7. गावच्या नकाशावर संदर्भ बिंदू म्हणून वापरलेले एक मोठे झाड कोणते?
  8. सर्वप्रथम नकाशा कोणी तयार केला?
  9. नकाशावर उत्तर दिशा दाखवण्यासाठी कोणते अक्षर वापरले जाते?
  10. नकाशा मध्ये वापरल्या जाणाऱ्या काही चिन्हांची नावे लिहा.
  11. नकाशावर भूचिन्ह म्हणजे काय?
  12. बागेपासून मंदिराकडे जाण्यासाठी कोणत्या दिशेने जावे लागेल?
  13. रुग्णालयाच्या कोणत्या दिशेला मज्जिद आहे?
  14. अचूक नकाशा काढण्यासाठी स्केल (मोजपट्टी) वापरण्याचा काय फायदा आहे?
  15. जागतिक नकाशा आणि स्थानिक नकाशा यामधील महत्त्वाचे फरक कोणते?

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने