पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
दिनांक: 14.08.2025 रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार -
- पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
- भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक पाठ आणि एक कविता विचारात घ्यावी.
- इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक पाठ-आधारित मूल्यमापन करावे.
- इयत्ता 1 ते 5 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
इयत्ता - 4थी
विषय - परिसर अध्ययन
गुण - 10
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता - 4थी
विषय - परिसर अध्ययन
गुण: 10
पाठ 11 - कचरा-एक संपत्ती
Question Paper Blueprint
Difficulty Level | Weightage (%) | Marks |
---|---|---|
Easy (सोपे) | 45% | 4.5 |
Average (साधारण) | 40% | 4 |
Difficult (कठीण) | 15% | 1.5 |
Total | 100% | 10 |
I. योग्य उत्तर निवडा (1 × 3 = 3 गुण)
1. कचराकुंडीवर आढळणारे चिन्ह कोणते आहे? (सोपे)
2. हिरव्या डब्यात टाकण्याचा कचरा कोणता? (सोपे)
3. देशातील स्वच्छता कोणाकडून राखली पाहिजे? (सोपे)
II. रिकाम्या जागा भरा. (0.5 × 2 = 1 गुण)
4. भाजीपाला, फळांची साले, ब्रेडचे तुकडे हे _______________ कचऱ्याचे उदाहरण आहे. (सोपे)
5. घराजवळील साचलेले पाणी _______________ आणि माशा यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण बनते. (सोपे)
III. एक वाक्यात उत्तरे लिहा. (1 × 2 = 2 गुण)
6. कचरा म्हणजे काय? (सोपे)
7. पुनर्वापर म्हणजे काय? (सोपे)
IV. योग्य जोड्या जुळवा. (1 × 1 = 1 गुण)
8. (साधारण)
A | B |
---|---|
i. कोरडा कचरा | a) भाजीपाला, वापरलेले पाणी, शिल्लक अन्न |
ii. ओला कचरा | b) प्लास्टिक, काच, धातूचे तुकडे |
V. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (1.5 × 2 = 3 गुण)
9. धोकादायक कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यास काय होते? (कठीण)
10. ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण का महत्त्वाचे आहे? (साधारण)
मौखिक परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न
- कचराकुंडीवर आढळणारे चिन्ह कोणते आहे?
- हिरव्या डब्यात टाकण्याचा कचरा कोणता?
- लाल डब्यात टाकावयाचा कचरा कोणता?
- देशातील स्वच्छता कोणाकडून राखली पाहिजे?
- सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धत कोणती?
- भाजीपाला, फळांची साले, ब्रेडचे तुकडे हे कोणत्या कचऱ्याचे उदाहरण आहे?
- धोकादायक कचऱ्यामध्ये कोणत्या रसायनांचा समावेश होतो?
- कचरा म्हणजे काय?
- पाठात नमूद केलेले कचऱ्याचे दोन प्रकार सांगा.
- पुनर्वापर म्हणजे काय?
- कचरा गोळा करण्यामध्ये कचरा वेचकची (Ragpickers) भूमिका काय असते?
- कंपोस्ट खत म्हणजे काय?
- घराबाहेर पाणी साचल्यास काय होते?
- प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी का करावा?
- कुजलेल्या कचऱ्याचा एक उपयोग सांगा.
إرسال تعليق