CLASS - 3 

MEDIUM - MARATHI 

SUBJECT - EVS

SYLLABUS - KARNATAKA STATE 

QUESTION BANK OF  LESSON BASED ASSESSMENT

पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली 

सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.

इयत्ता 3री 

परिसर अध्ययन  - भाग 1

पाठ – 4.  पाण्याच्या थेंबाची गोष्ट

I. खालील प्रश्नांसाठी चार योग्य उत्तरांपैकी एक निवडा आणि लिहा: 8X1=8

1.     जीवजल (water of life) म्हटले जाणारे द्रव कोणते आहे?

        A) दूध

        B) पाणी

        C) ताक

        D) रस

2.   खालीलपैकी कोणता पाण्याचा स्रोत नाही?

        A) नळ

        B) विहीर

        C) नदी

        D) तलाव

3.   समुद्राच्या पाण्याची चव कशी असते?

        A) गोड

        B) कडू

        C) खारट

        D) आंबट

4.   मानवाने मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्यासाठी _____ बांधले आहेत.

        A) हौद (Trough)

        B) पाण्याची टाकी

        C) तलाव

D) धरण

5.   फळे आणि भाज्या धुण्यासाठी वापरलेले पाणी कोणत्या कामासाठी पुन्हा वापरता येते?

        A) पिण्यासाठी

        B) स्वयंपाक करण्यासाठी

        C) अंघोळ करण्यासाठी

        D) झाडे लावण्यासाठी

6.   पाणी हा एक ____________ पदार्थ आहे.

        A) घन

        B) द्रव

        C) वायू

        D) प्लाझ्मा

7.    खालीलपैकी सर्वात कमी पाणी धरून ठेवणारे साधन ओळखा.

A) भांडे

B) गाळणी (Filter)

C) ग्लास

D) टाकी

8.   आपण दररोज कमीतकमी किती पाणी प्यावे?

A) 1 लिटर

B) 6 ते 7 लिटर

C) 1.5 ते 3 लिटर

D) 500 मिली.

II. जोड्या जुळवा: 4 X 1=4

    9.      माठ                   -       स्टील

    10.     सिंटॅक्स       -       वीट, वाळू, सिमेंट

    11.  बादली                 -       प्लास्टिक

    12.हौद             -           माती

III. प्रश्नांची उत्तरे लिहा.

13. जमिनीवर पडलेले पावसाचे पाणी कोठे जाते?

14. तुमच्या गावात किंवा तुम्हाला माहीत असलेले पाण्याचे स्रोत कोणते आहेत?

15. तुमच्या घरी पाणी कोण आणते आणि कोठून आणते?

16. तुम्ही पाण्याचा उपयोग कोणत्या कोणत्या कामांसाठी करता?

17.  तुम्ही दररोज अंघोळ करण्यासाठी आणि शौचासाठी किती कप पाणी वापरता, याचा अंदाज घेऊन लिहा.

IV. खालील प्रश्नाचे उत्तर तीन ते चार वाक्यांत द्या. 1 X 3= 3

18. तुमच्या घरात पिण्याचे पाणी सुरक्षितपणे साठवण्यासाठी आणि वापरण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत?


नमुना उत्तरे 

पाठ  – 4. एका पाण्याच्या थेंबाची गोष्ट

I

1.     B) पाणी

2.   A) नळ

3.   C) खारट

4.   D) धरण

5.   D) झाडे लावण्यासाठी

6.   B) द्रव

7.    C) ग्लास

8.   C) 1.5 ते 3 लिटर


II

9. माती

10. प्लास्टिक

11. स्टील

12. वीट, वाळू, सिमेंट


III

13. पृथ्वीवर पडलेले पावसाचे पाणी पाणी, तलाव, ओढे, नद्या, विहिरी आणि समुद्रात जाते. (इत्यादी)

14. नदी, तलाव, विहीर, हँडपंप, ओढा, झरा, तळे, समुद्र.

15. मुलाचे उत्तर अवलंबून आहे.

उदाहरण: माझी आई विहिरीतून घरात पाणी आणते.

16. मी पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, शौचासाठी, अंघोळीसाठी, हात-पाय-तोंड धुण्यासाठी, झाडांना पाणी देण्यासाठी, फरशी पुसण्यासाठी, भांडी धुण्यासाठी इत्यादी कामांसाठी करतो. (मुलाच्या उत्तरावर आधारित गुण)

17. मी दररोज अंघोळीसाठी 20 कप पाणी आणि शौचासाठी 8 कप पाणी वापरतो. (उत्तरावर आधारित गुण)


IV

18. * आपण स्वच्छ पाणी स्वच्छ नळ असलेल्या भांड्यात साठवतो आणि ते नेहमी झाकून ठेवतो.

* पिण्यासाठी पाणी घेण्यापूर्वी आपण आपले हात पूर्णपणे धुतो.

* मोठ्या भांड्यातून पिण्यासाठी पाणी घेताना, आपण लांब दांड्याच्या पळी/भांड्याचा वापर करतो.

* आपण संग्रह पात्र (collection container) नियमितपणे धुतो. अशा प्रकारे आपण पिण्याचे पाणी जमा करतो आणि वापरतो.


 

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने