SUBJECT - Maths

SYLLABUS - KARNATAKA STATE 

QUESTION BANK OF  LESSON BASED ASSESSMENT

पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली 

सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.

प्रकरण: 3

वजाबाकी (Subtraction)


I) बहुपर्यायी प्रश्न (प्रत्येकी 1 गुण)

  1. 26235 – 12124 = 14111 या प्रश्नात 'वजा होणारी संख्या' (subtrahend) कोणती आहे? (सोपे)

    A) 14111          B) 12124            C) 26235           D) यापैकी नाही

  2. 75289 – 32174 या वजाबाकीतील पहिली पायरी कोणती? (सोपे)

    A) दशकाच्या स्थानावरील अंकांची वजाबाकी

    B) एककाच्या स्थानावरील अंकांची वजाबाकी

    C) शतकाच्या स्थानावरील अंकांची वजाबाकी

    D) हजारच्या स्थानावरील अंकांची वजाबाकी

  3. 39637 – 26235 = 13402 यात '39637' ही संख्या काय आहे? (सोपे)

    A) वजा होणारी संख्या (Subtrahend)

    B) ज्यातून वजा करायचे ती संख्या (Minuend)

    C) गुणाकार (Multiple)

    D) फरक (Difference)

  4. वजाबाकी पडताळण्यासाठी योग्य विधान कोणते? (सोपे)

    A) फरक - वजा होणारी संख्या = ज्यातून वजा करायचे ती संख्या

    B) वजा होणारी संख्या + फरक = ज्यातून वजा करायचे ती संख्या

    C) फरक + ज्यातून वजा करायचे ती संख्या = वजा होणारी संख्या

    D) फरक – वजा होणारी संख्या = ज्यातून वजा करायचे ती संख्या

  5. 57394 – 26735 यामध्ये 4 मधून 5 वजा करता येत नाही, म्हणून काय कराल? (सोपे)

    A) दशकाच्या स्थानावरून 1 दशक घ्यावा.

    B) शतकाच्या स्थानावरून 1 दशक घ्यावा.

    C) हजारच्या स्थानावरून 1 दशक घ्यावा.

    D) दहा हजारच्या स्थानावरून 1 दशक घ्यावा.

  6. 42695 - 20746 यामध्ये दशकाच्या स्थानावरून 1 उसना घेतल्यास, दशकाच्या स्थानी कोणती संख्या शिल्लक राहील? (सोपे)

    A) 8 दशक B) 7 दशक C) 9 दशक D) 0 दशक

  7. 90000 - 74649 वजाबाकी करताना उसना घेतल्यावर कोणत्या स्थानावरील अंक वेगळा होतो? (सोपे)



  8. 59842 – 34532 किती आहे? (सोपे)

    A) 94374 B) 25300 C) 25310 D) 25314

  9. 10,000 रोपांपैकी 8625 रोपे मरण पावली. उरलेली रोपे शोधण्यासाठी कोणती क्रिया करावी लागेल? (सोपे)

    A) बेरीज B) वजाबाकी C) गुणाकार D) भागाकार

  10. 17094 – 3043 याचा फरक किती? (सोपे)

    A) 14051 B) 20137 C) 14050 D) 0


II) जोड्या जुळवा. (प्रत्येकी 1 गुण) (मध्यम)

a) वजाबाकी                      फरक + ज्यातून वजा करायचे ती संख्या = वजा होणारी संख्या

b) ज्यातून वजा करायचे ती संख्या – वजा होणारी संख्या                    वजाबाकी

c) वजाबाकी पडताळण्यासाठी                                                       10000

d) 49137 – 39137                                                                    11235

e) 20000 - 8625                                                                    फरक


III) खालील प्रश्नांची उत्तरे द्या (प्रत्येकी 1 गुण)

  1. जी संख्या वजा केली जाते तिला काय म्हणतात? (सोपे)

  2. 49137 – 26134 = 23003 यामध्ये वजा होणारी संख्या कोणती आहे? (सोपे)

  3. 20000 – 5635 ही वजाबाकी करताना, उसना घेतल्यावर दशकाच्या स्थानावरील अंक किती राहील? (मध्यम)

  4. वजाबाकीच्या प्रक्रियेत, सर्वप्रथम कोणत्या स्थानावरील अंक वजा करायला पाहिजे? (मध्यम)

  5. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करता येत नसल्यास काय करावे? (मध्यम)

  6. 86291 – 64130. फरक काढा. (मध्यम)


IV) फरक काढा (प्रत्येकी 2 गुण)

  1. 42695 – 20746 (सोपे)

  2. 40000 – 16543 (सोपे)

  3. 50625 – 36178 (सोपे)

  4. 39637 – 26235 (सोपे)

  5. 20000 – 8625 (सोपे)

  6. 25307 – 6149 (सोपे)

  7. 11035 मधून 4297 वजा करा. (मध्यम)

  8. 40000 मधून 24683 वजा करा. (मध्यम)

  9. 26475 मधून 16486 वजा करा. (मध्यम)

  10. 37946 मध्ये किती मिळवल्यास 91643 होतील? (मध्यम)

  11. 67215 मधून किती वजा केल्यास 28941 होतील? (मध्यम)

  12. एका व्यापाऱ्याकडे 39637 नारळ होते. जर त्याने 26235 नारळ विकले, तर आता त्याच्याकडे किती नारळ शिल्लक आहेत? (कठीण)


V) फरक काढा. (प्रत्येकी 3 गुण)

  1. गेल्या वर्षी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनावर 16986 किलो तांदूळ खर्च झाला. या वर्षी 21482 किलो तांदूळ वापरला गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी किती जास्त तांदूळ वापरला गेला? (कठीण)

  2. दोन संख्यांची बेरीज 87065 आहे आणि त्यापैकी एक संख्या 49726 आहे. दुसरी संख्या शोधा. (कठीण)

  3. एका शेतकऱ्याला गेल्या वर्षी त्याच्या शेतातून 938462 नारळ मिळाले. या वर्षी त्याला 47285 नारळ मिळाले. त्याला गेल्या वर्षीपेक्षा किती जास्त नारळ मिळाले? (कठीण)

  4. चहा कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांना दिवसाला 48342 चहा पाकिटे भरायची असतात. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत 33675 चहा पाकिटे भरली असल्यास, अजून किती चहा पाकिटे भरायची आहेत ते शोधा. (कठीण)


VI) खालील उदाहरणे सोडवा. (प्रत्येकी 4 गुण)

  1. 22457 + 32986 – 35712 (मध्यम)

  2. 54398 + 24897 – 39486 (मध्यम)

  3. 43618 + 6382 – 29467 (मध्यम)

  4. 21679 + 27428 – 2438 (मध्यम)


VII) खालील उदाहरणे सोडवा. (प्रत्येकी 5 गुण)

  1. एका मोबाईल उत्पादन कंपनीने नोव्हेंबरमध्ये 23715 मोबाईल आणि डिसेंबरमध्ये 34160 मोबाईल तयार केले, त्यापैकी 42534 मोबाईल विकले गेले. शिल्लक राहिलेल्या मोबाईलची संख्या शोधा. (कठीण)

  2. एका पेट्रोल पंपावर 96321 लिटर पेट्रोल होते. सोमवारी 26841 लिटर पेट्रोल विकले गेले. मंगळवारी 35769 लिटर पेट्रोल विकले गेले. पेट्रोल पंपावर शिल्लक असलेल्या पेट्रोलची एकूण मात्रा शोधा. (कठीण)

  3. श्रीमती अनिता यांच्याकडे 50000 रुपये आहेत. त्यांनी 13538 रुपयांना रंगीत दुर्बिण आणि 16990 रुपयांना रेफ्रिजरेटर विकत घेतले. आता त्यांच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत ते शोधा. (कठीण)

  4. एका जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी 60000 गणवेश देण्यात आले आहेत. दोन तालुक्यांमध्ये आधीच 12372 आणि 23003 गणवेश वाटप केले गेले आहेत. अजून किती गणवेश शिल्लक आहेत? (कठीण)


मराठी नमुना प्रश्नपत्रिका - येथे पहा 


परिसर नमुना प्रश्नपत्रिका - येथे पहा. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने