CLASS - 10 

MEDIUM - MARATHI 

SUBJECT - Social Science 

SYLLABUS - KARNATAKA STATE 



QUESTION BANK OF  LESSON BASED ASSESSMENT

पाठ १ - भारतात युरोपियनांचे आगमन

पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली 

    कर्नाटक राज्यातील सर्व शाळांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून 'पाठ-आधारित मूल्यमापन परीक्षा' (Lesson Based Assessment - LBA) प्रणाली अंमलात येणार आहे. हा बदल शिक्षण गुणवत्तेत वाढ करेल का, याबद्दल शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे.

काय आहे नवीन प्रणालीचा उद्देश?

सध्या सरकारी शाळांमध्ये रचनात्मक मूल्यमापन (FA – Formative Assessment) आणि संकलनात्मक मूल्यमापन (SA – Summative Assessment) या पद्धती वापरल्या जातात. नव्या LBA प्रणालीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या आकलनाची आणि त्यांच्या शिकण्याच्या गुणवत्तेची सातत्याने खात्री करणे हा आहे. प्रत्येक पाठ किंवा अध्याय शिकवून झाल्यानंतर लगेचच छोटी चाचणी घेतल्याने विद्यार्थ्यांना विषय किती समजला हे स्पष्ट होईल. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षांच्या गुणांसाठी नव्हे, तर खऱ्या अर्थाने ज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. भविष्यात होणाऱ्या बोर्ड परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी ही सुरुवातीपासूनची मूल्यमापन पद्धत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने व्यक्त केली आहे.


अंमलबजावणी आणि स्वरूप:

    ही घटक चाचणी पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (DSERT) या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका तयार करून शाळांना पुरवेल. शाळांना या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मिळालेले गुण 'SATS' पोर्टलवर (Student Achievement Tracking System) अपलोड करावे लागतील, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे सोपे होईल.

प्रत्येक चाचणी ३० गुणांची असेल आणि त्यात २५ प्रश्न असतील. प्रश्नपत्रिकेची रचना विशिष्ट प्रमाणात सोपे, सामान्य आणि कठीण प्रश्नांच्या मिश्रणाने केली जाईल:

६५% सोपे प्रश्न

२५% सामान्य प्रश्न

१०% कठीण प्रश्न

    बहुतेक प्रश्न बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे असतील, जेणेकरून विद्यार्थ्यांचे आकलन तपासणे सोपे होईल. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रिकाम्या जागा भरणे, चित्रांना रंग भरणे, जोड्या जुळवा आणि गटात न बसणारा शब्द ओळखणे असे मनोरंजक प्रश्न असतील.

सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.

पाठ १ - भारतात युरोपियनांचे आगमन

अध्ययन निष्पत्ती  -:

·        भारताचे युरोपियनांशी असलेले व्यापार आणि व्यावसायिक संबंध समजून घ्या.

·        व्यापारासाठी भारतात आलेल्या युरोपियनांची यादी करा.

·        युरोपियनांच्या राजकीय शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीतून कर्नाटक युद्धांची निर्मिती कशी झाली हे समजून घ्या.

·        प्लासीच्या लढाईची आणि बक्सरच्या लढाईची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा.

·        दुहेरी शासन प्रणाली (Dual-Government System) स्पष्ट करा.

I. प्रत्येक प्रश्न किंवा अपूर्ण विधानासाठी चार पर्याय दिले आहेत. त्यातून एक योग्य उत्तर निवडा आणि ते त्याच्या अक्षरासह पूर्ण उत्तर लिहा.

1.    युरोपीय व्यापाराचे 'प्रवेशद्वार' (सोपे)

a) इटली

b) कॉन्स्टँटिनोपल

c) पॅरिस

d) अरेबिया

2.   भारतासाठी नवीन सागरी मार्ग शोधणारा व्यक्ती (जून-२०२२) (सोपे)

a) वास्को-द-गामा

b) ड्यूपलेक्स

c) आल्मेडा

d) अल्बुकर्क

3.  'ब्लू वॉटर पॉलिसी' (Blue Water Policy) लागू करणारा पोर्तुगीज व्हाइसरॉय (सोपे)

B) फ्रान्सिस्को डी आल्मेडा

A) वास्को द गामा

C) आल्फोन्सो डी अल्बुकर्क

D) ड्यूपलेक्स

4.  पहिले कर्नाटक युद्ध ___________ च्या कराराने समाप्त झाले. (सोपे)

A) पाँडिचेरी

B) ऐक्स-ला-चॅपेल

C) पॅरिस

D) वांडीवॉश

5.  बंगालमध्ये ब्रिटिशांना मुक्त व्यापार करण्याची परवानगी देणारा मुघल सम्राट (सोपे)

A) जहांगीर

B) शाह आलम दुसरा

C) बहादूर शाह

D) फारुखसियर

II. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे द्या.

1.    बंगालमध्ये दुहेरी शासन प्रणाली कोणी सुरू केली? (जून-२०२०) (सोपे)

2.   ब्लू वॉटर पॉलिसी म्हणजे काय? (सोपे)

3.   १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपलवर कोणी कब्जा केला? (जून-२०२०) (सोपे)

4.   भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचा खरा संस्थापक कोण होता? (मध्यम)

5.   कोणत्या कराराने तिसरे कर्नाटक युद्ध समाप्त झाले? (सोपे)

6.   भारतात फ्रेंचची राजधानी कोणती होती? (सोपे)

7.   वास्को द गामा भारतात कुठे उतरला? (सोपे)

8.   मार्तंड वर्मा यांनी राज्य केलेले संस्थानाचे नाव काय होते? (सोपे)

III. खालील प्रश्नांची दोन ते चार वाक्यांत उत्तरे द्या.

1.    भारतासाठी नवीन सागरी मार्ग शोधण्यास कारणीभूत ठरलेल्या घटकांवर चर्चा करा. (सप्टेंबर-२०२०) (मध्यम)

2.   'दुहेरी शासन प्रणाली' स्पष्ट करा. (मध्यम)

3.   दुसऱ्या कर्नाटक युद्धाचे परिणाम काय होते? / दुसरे कर्नाटक युद्ध स्पष्ट करा. (मार्च-२०२०, जून-२०२५) (मध्यम)

4.   तिसऱ्या कर्नाटक युद्धाचे परिणाम काय होते? (मध्यम) (मार्च-२०२०)

5.   बक्सरच्या लढाईची कारणे सांगा. (मध्यम) (एप्रिल-२०२५)

IV. खालील प्रश्नांची प्रत्येकी सहा वाक्यांत उत्तरे द्या.

1.    बक्सरच्या लढाईचे परिणाम सांगा. (सप्टेंबर-२०२२, एप्रिल-२०२३, एप्रिल-२०२३) (मध्यम)

2.   प्लासीच्या लढाईची कारणे आणि परिणाम काय होते? (कठीण) (जून-२०२३, जून-२०२३)

3.   मार्तंड वर्मा यांनी डचांना कसे नियंत्रित केले? (कठीण)



☀️इयत्ता - 10वी ♦️ 

⭕विषय समाज विज्ञान  

 🔰भाग -1

नमूना प्रश्नोत्तरे 

1.युरोपियनांचे भारतात आगमन


2.ब्रिटिश सत्तेचा विस्तार


3.भारतावरील ब्रिटिश सत्तेचे परिणाम


4.म्हैसूरचे वडेयर आणि ब्रिटिश सत्तेला कर्नाटकातून झालेला विरोध


5.सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या चळवळी


6.सार्वजनिक प्रशासन - एक परिचय


7.भारतासमोरील आव्हाने आणि त्यांवरील उपाययोजना


8.सामाजिक स्तर


9.श्रम आणि आर्थिक जीवन


10.भारत -भौगोलिक स्थान आणि प्राकृतिक वैशिष्ट्ये


11.भारताचे हवामान


12.भारतातील माती


13.भारतातील अरण्य संपत्ती


14.भारतातील जलसाधन संपत्ती 


15.अर्थव्यवस्था आणि सरकार


16.बँकेचे व्यवहार


🛑CLASS -10

🔰Sub. - English (TL)

⭕Poem - Summary

🔰New Words

🌀Marathi Meaning

👇👇👇👇👇👇👇👇

https://www.smartguruji.net/2025/04/class-10-english-3rd-language-poems.html


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने