CLASS - 10 

MEDIUM - MARATHI 

SUBJECT - Social Science 

SYLLABUS - KARNATAKA STATE 

QUESTION BANK OF  LESSON BASED ASSESSMENT

भूगोल 

पाठ : 1. भारत: भौगोलिक स्थान आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये

अध्ययन निष्पत्ती

  • आपल्या देशाचे महत्त्व आणि वारसा समजावून सांगा.
  • भारताच्या नावामागील पार्श्वभूमी आणि विविधता स्पष्ट करा.
  • भारताचे भौगोलिक स्थान, क्षेत्रफळ, भूमी आणि जल सीमा तसेच शेजारील देशांची नावे सांगा.
  • भारताच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांचे वर्णन करा.
  • भारताच्या नैसर्गिक विभागांची नावे सांगा.
  • भारताच्या नकाशावर पर्वतांची शिखरे, टेकड्या, महत्त्वाचे अक्षांश आणि रेखांश आणि महत्त्वाची बंदरे ओळखा.

I. खालील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडून लिहा. 4×1=4

1. पूर्व किनारपट्टीचा मैदानी प्रदेश (SLP 2020) (सोपे)

A) लांब आहे 

B) रुंद आहे 

C) तीव्र उताराचा आहे 

D) अरुंद आहे


2. लडाख पठार येथे आढळते (SLP 2023) (सोपे)

A) मध्य हिमालयात 

B) महान हिमालयात

C) शिवालिक टेकड्यांमध्ये 

D) भारतीय पठारात


3. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर (जून-2019) (सोपे)

A) गॉडविन ऑस्टिन 

B) माउंट एव्हरेस्ट.

C) अनाईमुडी 

D) गुरु शिखर


4. भारताचा सर्वात मोठा भौगोलिक विभाग आहे (सोपे)

A) उत्तर भारतीय मैदान. 

B) हिमालय

C) किनारपट्टीचा मैदानी प्रदेश आणि बेटे. 

D) भारतीय पठार.


II. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

5. पूर्व आणि पश्चिम घाट कोठे मिळतात? (सोपे) (मार्च/एप्रिल 2022)

6. उत्तर भारतीय मैदानास संचय मैदान (accumulation plain) का म्हणतात? (कठीण) (MQP 2022)

7. हिमालयातील कोणत्याही दोन थंड हवेच्या ठिकाणांची नावे सांगा. (SLP 2022) (सोपे)

8. वाळूचे ढिगारे (Dunes) म्हणजे काय? (सोपे)

9. भारतातील सर्वात जुना भूभाग कोणता आहे? (सोपे)

10. महान हिमालयाचे दुसरे नाव काय आहे? (सोपे)

11. दक्षिण भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे? (सोपे)

12. पश्चिम घाटात आढळणारे सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे? (सोपे)

13. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखांशावर आधारित आहे? (सोपे)

14. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात पश्चिम घाटांना काय म्हणतात? (मध्यम)


III. खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

15. भारताचे प्रमुख नैसर्गिक विभाग कोणते आहेत? (सोपे)

16. देशाच्या आर्थिक विकासात द्वीपकल्पीय पठाराची महत्त्वाची भूमिका कशी आहे? (कठीण) (MQP2021-22)

17. पूर्व आणि पश्चिम घाटांमधील फरक स्पष्ट करा. (मध्यम)

18. हिमालय भारतीयांसाठी कसा उपयुक्त आहे? (मध्यम) (SLP 2020 जून 2023)

IV. 19. भारताचा बाह्यरेखा नकाशा काढा आणि खालील ठिकाणे चिन्हांकित करा. (मध्यम)

A) इंदिरा कोल. (SLP 2020, जून 2025)

B) निलगिरी. (MQP-1. 21-22)

C) मलबार किनारा. (MQP-2.21-22)

D) 82 ½ पूर्व रेखांश (जून 22 मार्च/एप्रिल 23. मार्च/एप्रिल 2025 जून 2025)

E) कर्कवृत्त (एप्रिल 2022, जून 2024, ऑगस्ट 2024)

20. भारताचा बाह्यरेखा नकाशा काढा आणि खालील ठिकाणे चिन्हांकित करा. (मध्यम)

A) विंध्य पर्वतश्रेणी (SLP 2020)

B) अरवली पर्वत

C) कोकण किनारा (मार्च/एप्रिल 2024)

D) कोरोमंडल किनारा (SLP 2025)

E) K2 / गॉडविन ऑस्टिन


नमुना उत्तरे 

पाठ : 1. भारत: भौगोलिक स्थान आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये

आदर्श उत्तरे

I.

1.    रुंद.

2.   महान हिमालयात.

3.   गॉडविन ऑस्टिन.

4.   द्वीपकल्पीय पठार.

II.

5. निलगिरी टेकड्या.

6. उत्तर भारताचे मैदान नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या मातीपासून बनलेले आहे.

7. सिमला, मसुरी, रानीखेत, नैनिताल, चक्राता आणि दार्जिलिंग.

8. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या सपाट, अरुंद मैदानांना दुन (Dunes) म्हणतात.

9. द्वीपकल्पीय पठार.

10. हिमाद्री.

11. अनाईमुडी.

12. अनाईमुडी.

13. 82 ½ पूर्व रेखांश.

14. सह्याद्री टेकड्या.

III.

15.

  • उत्तर भारतीय पर्वत.
  • उत्तर भारतीय महान मैदान.
  • द्वीपकल्पीय पठार.
  • किनारपट्टीचा मैदानी प्रदेश आणि बेटे.
  • येथे प्रचंड खनिज संपत्ती आहे.
  • येथील नद्या धबधब्यांनी भरलेल्या आहेत आणि जलविद्युत निर्मितीसाठी योग्य आहेत.

वैशिष्ट्य

पश्चिम घाट

पूर्व घाट

स्थान

समुद्राच्या जवळ

समुद्रापासून दूर

उंची

उंच आहेत

पश्चिम घाटांइतके उंच नाहीत

अखंडता

सलग आहेत

ठिकठिकाणी विलग आहेत

  • भारताला संरक्षण देतात.
  • उत्तर आशियातून येणाऱ्या थंड वाऱ्यांची गती थांबवतात.
  • नद्यांचे उगमस्थान आहेत.
  • जलविद्युत निर्मितीसाठी योग्य आहेत.
  • खनिज संसाधने आहेत.
  • पर्यटन आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहेत.
  • वनस्पती आणि प्राणीजगतासाठी आश्रयस्थान आहेत.

IV.

19. 



20. 


☀️इयत्ता - 10वी ♦️ 

⭕विषय समाज विज्ञान  

 🔰भाग -1

नमूना प्रश्नोत्तरे 

1.युरोपियनांचे भारतात आगमन


2.ब्रिटिश सत्तेचा विस्तार


3.भारतावरील ब्रिटिश सत्तेचे परिणाम


4.म्हैसूरचे वडेयर आणि ब्रिटिश सत्तेला कर्नाटकातून झालेला विरोध


5.सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या चळवळी


6.सार्वजनिक प्रशासन - एक परिचय


7.भारतासमोरील आव्हाने आणि त्यांवरील उपाययोजना


8.सामाजिक स्तर


9.श्रम आणि आर्थिक जीवन


10.भारत -भौगोलिक स्थान आणि प्राकृतिक वैशिष्ट्ये


11.भारताचे हवामान


12.भारतातील माती


13.भारतातील अरण्य संपत्ती


14.भारतातील जलसाधन संपत्ती 


15.अर्थव्यवस्था आणि सरकार


16.बँकेचे व्यवहार


🛑CLASS -10

🔰Sub. - English (TL)

⭕Poem - Summary

🔰New Words

🌀Marathi Meaning

👇👇👇👇👇👇👇👇

https://www.smartguruji.net/2025/04/class-10-english-3rd-language-poems.html




Post a Comment

أحدث أقدم