Home  ›  8th Science  ›  Newton  ›  SCIENCE  ›  SI UNITS  ›  Watt

विज्ञानातील SI एककांची यादी

"विज्ञान विषयातील SI एककांचा समावेश (मीटर, किलोग्राम, सेकंद, ॲम्पिअर, केल्विन, मोल, कॅन्डेला) "

3 min read

 विज्ञानाची भाषा समजून घेणे: SI एककांची संपूर्ण मार्गदर्शिका


     ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या 20 महत्त्वाच्या SI एककांची सविस्तर माहिती सादर करतो. प्रत्येक राशीचे एकक, त्याचे चिन्ह आणि संक्षिप्त स्पष्टीकरण यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल. SI एककांच्या आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित हा संदर्भ मार्गदर्शक म्हणून वापरला जाऊ शकतो.  

सर्व 7 मूलभूत SI एककांचा समावेश (मीटर, किलोग्राम, सेकंद, ॲम्पिअर, केल्विन, मोल, कॅन्डेला).  

टीप: ही माहिती BIPM (Bureau International des Poids et Mesures) च्या अद्ययावत मानकांनुसार तयार करण्यात आली आहे. काही  एककांची चिन्हे ग्रीक अक्षरांमध्ये दर्शविली आहेत (उदा. ओहम – Ω).


1. वस्तुमानाचे SI एकक काय आहे?

उत्तर – किलोग्राम (kg)  

2. बलाचे SI एकक काय आहे?

 उत्तर – न्यूटन (N)  

3. ऊर्जेचे SI एकक काय आहे? 

उत्तर – जूल (J)  

4. शक्तीचे SI एकक काय आहे?

 उत्तर – वॅट (W)  

5. दाबाचे SI एकक काय आहे?

उत्तर – पास्कल (Pa)  

6. विद्युत प्रवाहाचे SI एकक काय आहे?

 उत्तर – ॲम्पिअर (A)  

7. चुंबकीय क्षेत्राचे SI एकक काय आहे?

 उत्तर – टेस्ला (T)  

8. कार्याचे SI एकक काय आहे?

 उत्तर – जूल (J)  

9. आवर्तनाचे SI एकक काय आहे?

उत्तर – हर्ट्झ (Hz)  

10. लांबीचे SI एकक काय आहे?

उत्तर – मीटर (m)  

11. वेळेचे SI एकक काय आहे?

उत्तर – सेकंद (s)  

12. गतीचे SI एकक काय आहे?

 उत्तर – मीटर/सेकंद (m/s)  

13. तापमानाचे SI एकक काय आहे?

 उत्तर – केल्विन (K)  

14. विद्युतरोधाचे SI एकक काय आहे?

 उत्तर – ओहम (Ω)  

15. विद्युत विभवांतराचे SI एकक काय आहे?

 उत्तर – व्होल्ट (V)  

16. पदार्थाच्या प्रमाणाचे SI एकक काय आहे?

उत्तर – मोल (mol)  

17. प्रकाशाच्या तिव्रतेचे SI एकक काय आहे?

 उत्तर – कॅन्डेला (cd)  

18. द्रव्यमान प्रवाह दराचे एकक काय आहे?

उत्तर – किलोग्रॅम / सेकंद (kg/s)  

19. कार्य करण्याच्या दराचे एकक काय आहे?

उत्तर – वॅट (W)  

20. गुरुत्वाकर्षण बलाचे एकक काय आहे?

उत्तर – न्यूटन (N)  

________________________________




टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share