Home
›
6th SS Our state Karnataka
›
6th SS Textbook Solution
›
Constitution
›
Delhi Dynasty
›
Freedom
›
Gautam Buddha
›
Lesson Notes
›
Shravanbelagol
›
SOCIAL SCIENCE
›
Sultans of Delhi
›
Vedic Period
6th SS 15.VIJAYANAGARA EMPIRE AND BAHAMANI KINGDOM विजयनगरचे साम्राज्य आणि बहामनी राज्य
"'विजयनगर सारखे दुसरे वैभवशाली शहर डोळयांनी पाहिले नाही आणि कानांनी ऐकले नाही""
13 min read
इयत्ता - सहावी
विषय - समाज विज्ञान
माध्यम - मराठी
अभ्यासक्रम - 2022 सुधारित
पाठ 15. विजयनगरचे साम्राज्य आणि बहामनी राज्य
कालगणना -- विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336
- साम्राज्याच्या
कारकिर्दीचा काळ 1336-1646
- कृष्णदेवरायाचा काळ 1509-1529
- रक्कस तंगडीची लढाई जानेवारी 23, 1565
- बहामनी राज्याचा काळ 1347-1489
- बिदरमध्ये मदरशाची
स्थापना 1461
- आदिलशाहीचा काळ 1489-1686
- इब्राहिम रोजाची निर्मिती
1626
- गोलघुमटाची निर्मिती सुमारे 1650
1. फकीर - मुस्लिम साधू
2. बुरुज वाड्यावर बांधलेला घुमट
3. फारसी पर्शियन देशाची भाषा
4. दख्खन - दक्षिण भारतीय प्रदेश
गटांमध्ये चर्चा करून उत्तरे द्या
1. बिदरमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू कोणती ?
उत्तर -बिदरचा भव्य किल्ला ही बिदरमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे.
2. महम्मद गवान कोण होता ?
उत्तर -महम्मद गवान तिसऱ्या महम्मद सुलतानचा मुख्यमंत्री व बहामनी राज्याचा तो एक श्रेष्ठ राज्य करता होता.
3. सोळाखांब मशिद कोठे आहे ?
उत्तर -सोळाखांब मशिद बिदर येथे आहे.
4. आदिलशाही राजांपैकी श्रेष्ठ कोण होते ?
उत्तर -दुसरा इब्राहिम हा आदिलशाही राजांपैकी श्रेष्ठ राजा होता.
5. दख्खनचा ताजमहल असे आदिलशाहीच्या कोणत्या कलाकृतीला संबोधले जाते ?
उत्तर -इब्राहिम रोज या आदिलशाहीच्या कोणत्या कलाकृतीला दख्खनचा ताजमहल असे संबोधले जाते.
6. गोलघुमट का प्रसिद्ध आहे ?
उत्तर -गोल घुमट हा त्याच्या भव्य घुमटामुळे ओळखला जातो. गोलघुमट हा त्याच्या शिल्परचनेसाठी प्रसिद्ध आहे. तसेच गोलघुमट त्याच्या प्रतिध्वनीच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे.
7.संगम वंशाचा प्रसिद्ध राजा कोण ?
उत्तर -दुसरा देवराय हा संगम वंशाचा प्रसिद्ध राजा होता.
8. विजयनगर राजांपैकी सर्वात श्रेष्ठ सम्राट कोण होता ?
उत्तर -तुळूव वंशाचा कृष्णदेवराय हा विजयनगर राजांपैकी सर्वात श्रेष्ठ सम्राट होता.
9. हंपीची मुख्य मंदिरे कोणती ?
उत्तर -हम्पीतील काही महत्त्वाच्या मंदिरांमध्ये हजार रामास्वामी मंदिर,विठ्ठलस्वामी मंदिर,कृष्णस्वामी मंदिर आणि अच्युतराय मंदिर यांचा समावेश होतो.
10. कुमारव्यासांच्या कृती कोणत्या ?
उत्तर -'कर्नाटक भारत कथा मंजिरी' ही कुमारव्यासांची कृती होती.
11. कृष्णदेवरायांच्या कृती सांगा.
उत्तर -तेलुगूमध्ये "अमुक्त माल्यद" आणि संस्कृतमध्ये "जांबवती कल्याण"या कृष्णदेवरायांच्या कृती होय.
12. विजयनगरला भेट देणाऱ्या पर्शियन देशाच्या राजदूताचे नाव सांगा.त्याने विजयनगरबद्दल काय सांगितले ?
उत्तर -अब्दुल रझाक हा विजयनगरला भेट देणारा पर्शियन राजदूत होता.'विजयनगर सारखे दुसरे वैभवशाली शहर डोळयांनी पाहिले नाही आणि कानांनी ऐकले नाही" अशा शब्दात त्याने विजयनगरची प्रशंसा केली.
13. विजयनगरला भेट दिलेल्या विदेशी पर्यटकांची नावे सांगा.
उत्तर -पोर्तुगीज प्रवासी डोमिंगो पायीस आणि पर्शियन राजदूत अब्दुल रझाक यांसारख्या विदेशी पर्यटकांनी विजयनगरला भेट दिली आणि तिची भव्यता पाहून ते मंत्रमुग्ध झाले.