/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

NIPANI TALUK DASARA SPORTS 2023-24 निप्पाणी तालुकास्तरीय दसरा क्रीडा उत्सव

NIPANI TALUK DASARA SPORTS 2023-24

सन 2023-24 साठी निप्पाणी तालुकास्तरीय दसरा क्रीडा उत्सव आयोजनाबाबत.

संदर्भ:माननीय आयुक्त, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग, बंगलोर परिपत्रक क्रमांक DYES/CreechPro/41/ 2023-24, दिनांक 16/08/2023.

       युवा सबलीकरण व क्रीडा विभाग बेळगावी यांच्यामार्फत 2023-24 सालातील निप्पाणी तालुकास्तरीय दसरा क्रीडा उत्सव स्पर्धा 16 आणि 17 सप्टेंबर 2023 रोजी निप्पाणी तालुक्यातील शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूल मैदान,निप्पाणी येथे होणार आहेत.तरी तालुक्यांतील इच्छुक खेळाडूंनी 16-09-2023 रोजी सकाळी 9.00 वाजता उपस्थित राहून आयोजकाकडे नावे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धांची माहिती -

ऍथलेटिक (पुरुषांसाठी): 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी, 5000 मी, 10000 मी, लांब उडी,उंच उडी,शॉट पुट, तिहेरी उडी (Triple Jump),भालाफेक,थाळी फेक,110 मी हर्डल,4 x 100 रिले ,4x 400 रिले.

ऍथलेटिक (महिलांसाठी): 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी, 3000 मी, लांब उडी, उंच उडी, शॉट पुट, तिहेरी उडी, भाला फेक, थाळी फेक, 100 मी हर्डल, 4 x 100 रिले ,4x 400 रिले.

सामूहिक खेळ: व्हॉलीबॉल, फुटबॉल, खोखो, कबड्डी, थ्रो बॉल, योगासान (पुरुष आणि महिलांसाठी).

नियम व अटी:-
1. दसरा खेळात सहभागी होणारे खेळाडू निप्पाणी तालुक्यातील रहिवासी असले पाहिजेत.

2. खेळाडूंनी 16-09-2023 रोजी सकाळी 9.00 वाजता शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूल मैदान, निप्पाणी,तालुका-निप्पाणी येथे आयोजकाकडे नोंदविणे.

3. संरक्षण दल,पॅरा-डिफेन्स फोर्सचे खेळाडूना खेळांमध्ये सहभागी होण्यास परवानगी नाही/.

4. या क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, युवक संघटना व क्रीडा संघटनांतील खेळाडू सहभागी होऊ शकतात.

5. सहभागी खेळाडूंनी त्यांच्या बँक पासबुकची प्रत आणि आधार कार्ड प्रत आणणे आवश्यक आहे.

6. एका तालुक्यात सहभागी झालेल्या खेळाडूंनी दुसऱ्या तालुक्यात सहभागी होऊ नये. जर ते सहभागी झाले तर ते अपात्र ठरतील,सामूहिक स्पर्धांमध्ये संपूर्ण संघ अपात्र ठरेल.
7. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि खेळांमध्ये अयोग्य वर्तन केल्याचे आढळून आलेल्या खेळाडूंना किंवा संघांना अपात्र ठरवले जाईल.

8. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9980611131 किंवा 7892156167 वर संपर्क साधावा.


 
🌎Search us for Next Updates -
┈┉━❀❀❀❀❀❀❀━┉┈
🔰Please Subscribe Our YouTube Channel -
┈┉━❀SmartGuruji❀━┉┈


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा