इयत्ता - सातवी

विषय - समाज विज्ञान 



माध्यम - मराठी 

अभ्यासक्रम - 2023 सुधारित 

विषय - स्वाध्याय 

प्रकरण 7 - ब्रिटिश राजवटीचा प्रभाव  

अभ्यास

 

अभ्यास

1. एका शब्दात अथवा एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. आय. सी. एस. (I.C.S) अधिकारी म्हणजे काय ?

उत्तर - ICS म्हणजे "भारतीय नागरी सेवा".ब्रिटिश भारतातील विविध प्रशासकीय, न्यायालयीन आणि सरकारी कामकाजासाठी आयसीएस अधिकारी जबाबदार होते.त्यांनी देशाच्या कारभारात आणि प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली.

2. ब्रिटिश लष्करी सेनेचे कोणतेही एक कर्तव्य सांगा.

उत्तर - भारतातील राज्ये ताब्यात घेणे हे ब्रिटिश लष्करी सेनेचे एक कर्तव्य होते.

3. ब्रिटिशांनी पोलीस व्यवस्था कोणत्या कामासाठी वापरली ?

उत्तर - भारतीयांना ताब्यात घेणे आणि स्वातंत्र्यलढा दडपून टाकणे या कामासाठी ब्रिटिशांनी पोलीस व्यवस्थेचा वापर केला.

4. रयतवारी पद्धत म्हणजे काय ?

उत्तर - शेतकऱ्यांनी मध्यस्थांशिवाय थेट सरकारला कर भरण्याची पद्धत म्हणजे रयतवारी पद्धत होय.

5. 1857 मध्ये स्थापन झालेली भारतीय विश्वविद्यालये कोणती ?

उत्तर - कलकत्ता, मुंबई आणि मद्रास 1857 मध्ये स्थापन झालेली भारतीय विश्वविद्यालये होय.

 

2. दोन अथवा तीन वाक्यात उत्तरे लिहा

1. कायम जमिनदारी पद्धतीचे शेतकऱ्यांवर झालेले परिणाम कोणते ?

उत्तर - कायम जमिनदारी पद्धतीने जमिनदारांनी शेतकऱ्यांचे शोषण झाले.व्यापारी पिके पिकविण्यासाठी बळजबरी केल्यामुळे शेतकरी पुन्हा गरीब झाले.

2. पाश्चात्य शिक्षणाचे परिणाम कोणते ?

उत्तर - पाश्चात्य शिक्षणामुळे भारतीयांमध्ये संवाद वाढला,राष्ट्रवादाचा प्रसार झाला आणि भारतीय समाज व  साहित्यावर युरोपियन विचारसरणीचा परिणाम प्रभाव पडला.
 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने