31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करणेबाबत...
शिक्षकानी दिनांक 25.10.2022 ते 31.10.2022 पर्यंत शालेय स्तरावर खालील उपक्रम राबवावेत.
👉राष्ट्रीय एकता दिवसाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी एकता धाव (Run For Unity) तसेच सायकल रॅली कार्यक्रम आयोजित करणे.
👉 दिनांक: 31.10.2022 रोजी सकाळी 7:00 ते 8:00 पर्यंत प्रार्थनेपूर्वी शून्य वर्ग वेळेत मुलांच्या क्षमतेनुसार/संख्येनुसार एकता धाव (Run For Unity) कार्यक्रम आयोजित करावा.
👉एकता धाव कार्यक्रमाच्या सुरुवातीला किंवा शेवटी मुलांनी देशाच्या एकीकरणात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेबद्दल माहिती सांगणे.
👉शालेय/महाविद्यालयीन मासिके, वेबसाइट्स, व्हॉट्सअॅप ग्रुप्सद्वारे कार्यक्रमाची प्रसिद्धी करणे आणि शक्य असल्यास शाळेतील मुलांच्या कुटुंबातील सदस्यांना, स्थानिक समुदायाला एकता धाव कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करणे.
👉देशाच्या एकात्मता आणि अखंडतेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान या विषयावर वादविवाद स्पर्धा,नाटक व निबंध स्पर्धांचे शालेय स्तरावर आयोजन करणे.
वरील उपक्रमात सहभागी होऊन शालेय मुलांमध्ये देशभक्ती जागृत करणे आणि मुलांना राष्ट्र एकात्मतेसाठी झटण्याची प्रेरणा देणे.
अधिक माहितीसाठी खालील आदेश पहावा..
.jpg)
.gif)
टिप्पणी पोस्ट करा