/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

सहावी समाज विज्ञान 5.दक्षिण भारतातील प्राचीन राजघराणी (6th SS 5.)

   

सहावी समाज विज्ञान 

5.दक्षिण भारतातील प्राचीन राजघराणी 

www.smartguruji.in

 

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1.
शिलप्पदिगारम् या महाकाव्याची कथा नायिका कोण होती ?
उत्तर - 'कण्णगी' ही शिलप्पदिगारम् या महाकाव्याची कथा नायिका होती.
2.
संगम काळातील दोन महाकाव्यांची नावे लिहा.
उत्तर - शिलप्पदिगारम् आणि मणिमेगिलै ही दोन्ही संगम काळातील महाकाव्ये होती.
3.
तिरुक्कुळची रचना कोणी केली ?
उत्तर - तिरुक्कुळची रचना तिरुवळ्ळूवर केली.
4.
संगम काळातील महान कवी कोण होते ?
उत्तर - तिरुवळ्ळूवर हे संगम काळातील महान कवी होते.
5.
सातवाहन वंशाचा प्रसिद्ध राजा कोण ?
उत्तर - गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन वंशाचा प्रसिद्ध राजा होता.
6. '
चैत्य' म्हणजे काय ?
उत्तर - चैत्य म्हणजे बौद्धांचे प्रार्थना मंदिर होय.

 

7. सातवाहन काळातील 'चैत्य' कोठे आहेत ?
उत्तर - महाराष्ट्रातील सातवाहन काळातील 'चैत्य' आहेत.
8.
कर्नाटकात सातवाहन काळातील शिल्पकलेचे अवशेष कोठे आढळतात?
उत्तर - कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील संमती आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातील बनवासी येथे सातवाहन काळातील शिल्पकलेचे अवशेष आढळतात.
9. '
श्रेणी' म्हणजे काय ?
उत्तर - 'श्रेणी' म्हणजे व्यापाऱ्यांनी आणि विविध कामगारांनी आपल्या हितासाठी स्थापन केलेले संघ होय.
10.
सातवाहनांच्या काळातील बंदरांची नावे सांगा.
उत्तर - पश्चिम किनाऱ्यावरील भरू कच्छ मुंबई जवळील सोपारा आणि कल्याण ही सातवाहनांच्या काळातील बंदरांची नावे होती.
11.
कदंबांची राजधानी कोणती होती ?
उत्तर - दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बनवासी ही कदंबांची राजधानी होती.
12.
कदंबांचा प्रसिद्ध राजा कोण होता ?
उत्तर - मयूरशर्म हा कदम वंशाचा प्रसिद्ध राजा होता.

13. कन्नड मधील सर्वात जुना शिलालेख कोणता?
उत्तर - हसन जिल्ह्यातील हल्मिडी हा कन्नड मधील सर्वात जुना शिलालेख होय.
14.
ताळगुंद शासनाची रचना कोणी केली?
उत्तर - ताळगुंद शासनाची रचना कुब्ज यांनी केली.
15.
कर्नाटकातील अति प्राचीन संस्कृत कवी कोण ?
उत्तर - कुब्ज हे कर्नाटकातील अति प्राचीन संस्कृत कवी होते.
16.
चालुक्यांची राजधानी कोणती ? ती कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - बदामी ही चालुक्यांची राजधानी होती.ती बागलकोट जिल्ह्यात आहे.

 

17. उत्तर भारतातील कोणत्या सम्राटाचा पराभव पुलकेशी यांनी केला ?
उत्तर - उत्तर भारतातील लाट माळवा गुर्जर या सम्राटांचा पराभव पुलकेशी यांनी केला.
18.
वास्तुकला असलेली चालुक्यांची तीन ठिकाणे लिहा.
उत्तर - महाकुट,पट्टदकल,बदामी,ऐहोळे ही वास्तुकला असलेली चालुक्यांची ठिकाणे होय.
19.
कोणत्या ठिकाणाला "देवालय वास्तुकलेचा पाळणा" असे म्हटले जाते ?
उत्तर - एहोळे या ठिकाणाला "देवालय वास्तुकलेचा पाळणा" असे म्हटले जाते.
20.
कांचीच्या पल्लवांचा प्रसिद्ध राजा कोण होता?त्याने कोणती पदवी धारण केली होती?
उत्तर - नरसिंह वर्मा हा कांचीच्या पल्लवांचा प्रसिद्ध राजा होता. त्याने महामल्ल ही पदवी धारण केली होती.
21.
पल्लव काळातील अखंड रथ कोठे आहेत ?
उत्तर - पल्लव काळातील अखंड रथ महाबलीपुरम येथे आहेत.
22.
पल्लव काळातील सर्वात प्रसिद्ध देवालयाचे नाव काय?
उत्तर - महाबलीपुरम च्या समुद्रकिनाऱ्यावरील शिवदेवाले हे पल्लव काळातील सर्वात प्रसिद्ध देवालय होय.
23.
श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती कोणी निर्माण केली?
उत्तर - श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती गंग घराण्यातील चौथा राचमल्ल यांचा मंत्री चाउंडराय यांनी निर्माण केली.

24.गंग घराण्याचा प्रसिद्ध राजा कोण होता ?

उत्तर - दुर्विनित हा गंग घराण्याचा प्रसिद्ध राजा होता.
25.
गंगांची राजधानी तलकाडू ही कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - गंगांची राजधानी तलकाडू ही म्हैसूर जिल्ह्यात आहे.
26.
चाउंडरायानी कोणत्या साहित्य कृतीची रचना केली ?
उत्तर - चाउंडरायानी 'चाउंडराय पुराण' साहित्य कृतीची रचना केली.

 

गटामध्ये चर्चा करा आणि उत्तरे द्या.
1. ‘
सर्व व्यक्ती जन्माने समान असतात' असे तिरुवळ्ळूवर यांचे म्हणणे आपल्यासाठी महत्वाचे का आहे?
उत्तर - कारण जर सर्वजण जन्माने समान असतील तर जाती,धर्म, पंथ या गोष्टी समाजात न राहता सर्वजण आनंदाने एकतेने राहतील म्हणूनसर्व व्यक्ती जन्माने समान असतात' असे तिरुवळ्ळूवर यांचे म्हणणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.
2.
सातवाहनांच्या काळात आर्थिक समृध्दीमध्ये योगदान देणारे अंश-
उत्तर - व्यापाऱ्यांनी आणि विविध कामगारांनी आपल्या हितासाठी स्थापन केलेले संघ.
श्रेणीमध्ये आधुनिक बँकांसारखे आर्थिक व्यवहार
3.
सामान्यपणे प्राचीन काळातील राजघराणी कोणत्या कारणाने अधोगतीला गेली ?
उत्तर - अकुशल राजे
परकीय राज घराण्याचे आक्रमण
आर्थिक व सामाजिक कारणे
अचानक आलेली रोगराई, नैसर्गिक संकटे

4. पंप, पोन्न आणि श्रीविजय यावर टिपा लिहा.
उत्तर –

पंप - संस्कृतमध्ये वाल्मिकी जसे तसे कन्नडमध्ये आदिकवी पंप. पंपानी प्रथम कन्नडमध्ये रचना केलेली कांही काव्ये आतापर्यंत मिळालेली नाहीत.'विक्रमार्जुन विजय' हे पंपांचे महाकाव्य हे 'पंपभारत' म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये महाभारताची कथा आहे. कन्नडमधील प्रमुख कवींच्यावर पंपांचा फार प्रभाव होता.

पोन्न- हा राष्ट्रकूट घराण्यातील राजा कृष्ण तिसरा याच्या दरबारांतील प्रख्यात कन्नड कवी होता.तत्कालीन कन्नड़ साहित्यावरील वर्चस्वासाठी राजाने पोन्न यांना "कवींमधील सम्राट" ही पदवी दिली आणि संस्कृतवरही प्रभुत्व दिल्याबद्दल "दोन भाषांचे शाही कवी" ही पदवी दिली.

श्रीविजय - श्रीविजय हा विद्वान साहित्यिक राष्ट्रकूट राजा अमोघावर्ष नृपतुंग यांच्या दरबारात होता.'कविराजमार्ग' हा कन्नडमधील प्रप्रथम लक्षणग्रंथ राष्ट्रकूटांच्या काळातील आहे. याची रचना श्रीविजय यांनी केली.

 
5. एलोराचे कैलास मंदिर आणि एलिफंटा गुहा का प्रसिद्ध आहेत ?
उत्तर - तेथील अप्रतिम शिलालेख व वास्तुशिल्प यामुळे एलोराचे कैलास मंदिर आणि एलिफंटा गुहा प्रसिद्ध आहेत.
6.
तिसऱ्या गोविंदाच्या सैन्य कामगिरीचे वर्णन करा.
उत्तर –

तिसरा गोविंद : तिसरा गोविंद हा राष्ट्रकूट घराण्यातील श्रेष्ठ राजा होता. याने दक्षिण भारतात सगळीकडे प्रभुत्व मिळविले. नंतर हिमालयाच्या पायथ्यापर्यंत यशस्वी आक्रमण केले.या महान कार्याचा उल्लेख केलेल्या शिलालेखावर“गोविंदाच्या युध्दातील हत्तीनी गंगानदीच्या पुण्यतिर्थाची चव पाहिली” असा मनमोहक उल्लेख त्याच्या संस्थानातील कवीने केलेली आहे.
7.
अमोघवर्ष नृपतुंगाला महान सम्राट का म्हणतात ?
उत्तर - अमोघवर्ष नृपतुंग वयाच्या 14 व्या वर्षी राष्ट्रकुट घराण्याच्या गादीवर बसला.त्याने सुमारे 60 वर्षापेक्षा जास्त काळ राज्यकारभार केला.तो स्वतः विद्वान होता.त्याला आपल्या प्रजेचे हीत पाहणे फार आवडत असे.त्याने मान्यखेट नगर (सध्याचे मळखेड, जिल्हा कलबुर्गी) निर्माण केले.ती राष्ट्रकूटांची राजधानी होती.त्याच्या काळातील चार विशाल साम्राज्यापैकी राष्ट्रकूटाचे साम्राज्य एक होते.म्हणूनच अमोघवर्ष नृपतुंगाला महान सम्राट असे म्हणतात.
8.
सहावा विक्रमादित्य हा कल्याण चालुक्य वंशाचा महान सम्राट आहे असे का म्हटले जाते?
उत्तर - 

सहावा विक्रमादित्य -: सहावा विक्रमादित्याच्या प्रदीर्घ राज्यकारभाराच्या काळात कर्नाटक राज्य प्रगतीपथावर आले.त्याने अधिकारावर आलेली आठवण म्हणून चालुक्य विक्रम शकाची सुरुवात केली.विक्रमादित्याने पंडित बिल्हण, विज्ञानेश्वर अशा अनेक विद्वानांना आश्रय दिला. त्याने होयसळ,माळवा, यादव, कदंब इत्यादी राज्यांविरुद्ध स्वाऱ्या करून विजय मिळवला होता.म्हणून सहावा विक्रमादित्य हा कल्याण चालुक्य वंशाचा महान सम्राट आहे असे म्हटले जाते.

 
9. 'विक्रमांकदेव चरित, 'मिताक्षर संहिता' आणि 'मानसोल्हास' या विषयी टिपा लिहा.
विक्रमांकदेवचरित-:
सहावा विक्रमादित्याच्यादरबारातील काश्मीरी राजकवी बिल्हण याने विक्रमांकदेवचरित या महाकाव्याची रचना केली.यात विक्रमादित्याचा जीवन वृतांत आहे.बिल्हणाने या महाकाव्यात विक्रमादित्याच्या विविध स्वाऱ्यांबद्दल सविस्तर वर्णन केले आहे.

मिताक्षर संहिता-:
सहावा विक्रमादित्याच्या दरबारातील विज्ञानेश्वर हा आणखीन एक श्रेष्ठ विद्वान होय.याने 'मिताक्षर संहिता' या ग्रंथाची रचना केली. हा ग्रंथ हिंदू कायदा पद्धतीचा प्रमाण ग्रंथ म्हणून प्रसिध्दीस आला.
मानसोल्हास-:
कल्याणच्या चालुक्यांचा राजा मुम्मडी सोमेश्वर याने 'मानसोल्हास' या प्रसिद्ध संस्कृत ग्रंथाची रचना केली,यात सर्व शास्त्रांचा समावेश आहे.

10.
कोणत्या देवालयाला 'देवालयांचा सम्राट' म्हणूनही ओळखले जाते? का ?
उत्तर - कोप्पळ जिल्ह्यातील इटगीचे महादेव देवालयाला 'देवालयांचा सम्राट' म्हणून ओळखले जाते.कारण हे देवालय म्हणजे कल्याणच्या चालुक्यांच्या काळातील अत्युत्तम वास्तुशिल्प होते.याचे वर्णन तेथील शिलालेखावर ‘देवालयांचा चक्रवर्ती' असे केले आहे.

11.
होयसळ देवालयांच्या कोणत्याही वैशिष्ट्यांचा उल्लेख करा.
उत्तर - होयसळ देवालयांची काही वैशिष्ट्ये खालील प्रमाणे-:
होलसेल देवालय नक्षत्राच्या आकाराची आहेत.
होयसळ मंदिरांच्या भिंती संगीतकार,नर्तक,प्राणी इत्यादींच्या चित्रांनी नटलेल्या आहेत.
होयसळ मंदिरांमध्ये छिद्र असलेल्या दगडी खिडक्या कोरलेल्या आहेत.
12. ‘
भुवनेश्वरी' म्हणजे काय ?
उत्तर - नवरंगाच्या नाजूक कोरीव छताला भुवनेश्वरी म्हणतात.
13.
होयसळांच्या काही श्रेष्ठ देवालयांची नांवे सांगा.
उत्तर - चन्नकेशव मंदिर बेलूर
होयसळेश्वर मंदिर हळेबिडू
केशव मंदिर,सोमनाथपूर
इत्यादी ही होयसळांची कांही श्रेष्ठ देवालये आहेत.

 
14. होयसळ काळातील प्रसिद्ध कवी आणि त्यांच्या साहित्य कृतींची नावे सांगा.
उत्तर - जन्न, हरिहर,राघवांक आणि अंडय्या हे होयसळ काळातील श्रेष्ठ कवी होते.
त्यांच्या साहित्य कृती पुढील प्रमाणे -
जन्न 'यशोधर चरित';
हरिहर राघवांक - 'हरिश्चंद्र काव्य';
अंडय्या - 'कब्बीगर काव्यं'.
15.
बृहदेश्वर देवालय का प्रसिद्ध आहे ?
उत्तर - बृहदेश्वर देवालय हे चोरांची राजधानी तंजावर मध्ये निर्माण केलेले आहे.बृहदेश्वर देवालयाची निर्मिती एक हजार वर्षांपूर्वी झाली होती.या देवालयाचा कळस म्हणजे देवालयाच्या गाभाऱ्याचा वरचा भाग या देवालयाच्या गाभाऱ्यातील कळस 13 मजली असून आभाळाला भिडल्याप्रमाणे वाटतो.कळसाची उंची 61 मीटर आहे.हे मंदिर भारतातील सर्वात उंच व भव्य देवालय आहे.त्याचा समावेश जागतिक वारसा स्थळ म्हणून केलेला आहे.
16.
राजराजा चोळची कामगिरी लिहा.
उत्तर - राजराजा हा पराक्रमी व दक्ष राजा होता. त्याचे विशाल
साम्राज्य तुंगभद्रा नदीच्या व दक्षिणेकडील सर्व प्रदेशात, श्रीलंका आणि मालदीव पर्यंत पसरले होते. साम्राज्याच्या रक्षणासाठी शक्तीशाली भूसेना व नौकादलाची उभारणी केली. बृहदेश्वराच्या भव्य देवालयाची निर्मिती राजराजा चोळ याची देणगी आहे.
 
17.
चोळांच्या काळातील ग्राम प्रशासनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
उत्तर - चोळांच्या काळातील ग्राम प्रशासनाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-:
1.
गावचा कारभार त्याच गावातील ग्रामसभेचे निवडलेले सदस्य चालवित असत.
2.
काही सदस्यांचा समावेश असलेल्या समितीची रचना करून ठराविक कार्य निवडत असत.
3.
भ्रष्ट सदस्यांना ग्रामसभेतून काढून टाकत.
4.
चोळांच्या काळातील ग्राम कारभाराची व्यवस्था सामान्यपणे आताच्या पंचायती व्यवस्थेप्रमाणे होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा