7th SS Textbook Solution Lesson 4. 18 व्या शतकातील भारत (1707-1757)

"पानिपतची तिसरी लढाई,प्लासीची लढाई "

7 min read

   








 

इयत्ता - सातवी

विषय - समाज विज्ञान 

माध्यम - मराठी 

अभ्यासक्रम - २०२२ सुधारित 

विषय - स्वाध्याय 

पाठ – 4

18 व्या शतकातील भारत (1707-1757)  


1. एका शब्दात किंवा वाक्यात उत्तरे द्या.
1. कोणत्या शतकाला इतिहासकारांनी 'मराठा सार्वभौमत्व' काळ म्हटले आहे ?
उत्तर - 18व्या शतकाला इतिहासकारांनी 'मराठा सार्वभौमत्व' काळ म्हटले आहे.
2.
पानिपतची तिसरी लढाई कोणाकोणामध्ये झाली ?
उत्तर - पानिपतची तिसरी लढाई मराठे व अहमशहा अब्दाली मध्ये झाली.
3.
कर्नाटक युद्धात शेवटी कोणाचा विजय झाला ?
उत्तर - कर्नाटक युद्धात शेवटी ब्रिटिशांचा विजय झाला.
4.
प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली होती ?
उत्तर - प्लासीची लढाई ब्रिटीश आणि सिराजउद्दौला यांच्यामध्ये झाली होती.

 
2. दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. पेशव्यातील पहिल्या बाजीरावांच्या योगदानाबद्दल लिहा.

उत्तर - पहिला बाजीराव (1720 - 1740) : पहिला बाजीराव सत्तेवर आला तेव्हा तो 20 वर्षाचा तरुण होता, त्याचबरोबर बलवान आणि राजनीतीमध्ये निपुण होता. मोगल साम्राज्याच्या राजकीय दुर्दशेचा वापर करून त्याने भारतात एक प्रचंड विशाल साम्राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला.त्याने सुरुवातीला हैदराबाद त्यानंतर माळवा, गुजरात आणि बुंदेलखंड जिंकून घेतले.बाजीरावांची सर्वात महत्वाची कामगिरी म्हणजे आपल्या सैन्यासह उत्तर भारताकडे कूच करून दिल्लीवर आक्रमण केले. त्यामुळे तो "दुसरा शिवाजी" म्हणून गौरवास पात्र ठरला.

2. प्लासीच्या लढाईची कारणे कोणती ?
उत्तर - इंग्रज आपला आदेश न पाळता आपल्या शत्रूबरोबर हात मिळवणी करून गैर व्यवहार करत आहेत असा समज सिराज उद्दौलाने करून घेतला. त्यामूळे सिराजउद्दौलाने इंग्रजांचे किल्ले आपल्या ताब्यात घेतले.हेच प्लासीच्या लढाईचे कारण ठरले
3.
प्लासीची लढाई का महत्त्वाची आहे?
उत्तर - खालील कारणांमुळे प्लासीची लढाई महत्वाची आहे -
1.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपार संपत्ती आणि 24 परगण्यांची जमीनदारी हक्क (जहागीरी) मिळविला. 2.प्लासीची लढाई पुढे बक्सारच्या लढाईस कारणीभूत ठरली.
3.
व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी तेंव्हापासून शासन व्यवस्था चालविण्याचा अधिकार मिळविला.
4.
प्लासीची लढाई भारतात ब्रिटिशांच्या साम्राज्याच्या स्थापनेची नांदी ठरली.

 

टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share