/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

VIDYAPRAVESH DAILY ACTIVITY WEEK -2 DAY -11 (विद्याप्रवेश - दैनंदिन कृती)

 

       

  विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता कार्यक्रम खेळता खेळता शिक’ या तत्वावर आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे.उदाहरणार्थ बाहुल्या,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची कुतूहलजनक पुस्तके,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत.आपण निवडलेली साधने अथवा खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे.

    शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले 05 दिवस याप्रमाणे नियोजित केल्या आहेत.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम हाती घ्यावा.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी देण्यात आला आहे.या दिवशी आपण इतर पाच दिवस केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे.

विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच

विद्याप्रवेश - दैनंदिन कृती

आठवडा -2

दिवस - 11 


तासिका

कृतींचे विवरण

अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज)

9 व्या दिवशी परिचित केलेली अभिवादन कृती पुनरावर्तीत करणे.

गुजगोष्टी

9 व्या दिवशी  गायिलेले गीत खालील प्रकारे गावून त्यांच्या आवडत्या भाज्याविषयी प्रश्न विचारून उत्तरे मिळविणे.

शिक्षक    : भाजी घ्या ओ भाजी,

विद्यार्थी : ताजी ताजी भाजी .

       शिक्षक    :  चवळी कोवळी कोवळी

       विद्यार्थी : लिंबे आंबट पिवळी

शिक्षक  :      मुळा,गाजर,कांदा,

विद्यार्थी :     आणला कि हो दादा.

       शिक्षक  :    काकडी आणि कोथिंबीर,

   विद्यार्थी :      छान होते कोशिंबीर.

·         तुला माहित असलेल्या भाज्यांची नावे सांग.

·         तुझी आवडती भाजी कोणती?

·         तुझ्या नावडत्या भाज्या कोणत्या?

माझा वेळ (Free Indore play)

मुले आपल्या आवडत्या अध्ययन कोपऱ्यात जावून कृती करणे.

 शिक्षकाने नियमावलीप्रमाणे / मार्गदर्शकाप्रमाणे कार्य करणे.

पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती)

सामर्थ्य :तुलना करणे, जोडणे(Matching),वर्गीकरण, आकार /आकारमान संकल्पना आणि पर्यावरणाची जाणीव

कृती -18 तुलना करूया ( ध्येय -3)  

उद्देश वस्तूचा आकार व आकारमान यावर आधारित तुलना करून वर्गीकरण करणे.

आवश्यक साहित्य:  पेन्सील, मापके,फळे(सफरचंद, संत्री) भाज्या (बटाटे,कांदा) भांडी(पेला,वाटी,ताटे) विविध आकारमानाच्या इतर वस्तू

 पद्धत:

 प्रथमता सहजरीत्या मिळणाऱ्या वस्तू जसे पेन्सील, फळे, भाज्या आणि इतर वस्तू वापरून तुलना करणे.

आकारमान व प्रमाण यावर आधारित तुलना करणे.

आकारमानावर आधारित वस्तूच्या गटातील सर्वात मोठी वस्तूमुलांच्या गटातून सर्वात उंच मुलगासर्वात लांब खडू निवडण्यास सांगणे.

तुलना एकाच प्रकारच्या वस्तूंशी  व्हावी.

तुलनात्मक कृती हि मिश्र गटामध्ये करू नये. उदा:आयताकार वस्तूची तुलना वर्तुळाकार वस्तूशी अथवा चेंडूची तुलना सफरचंदाशी तुलना करू नये.

त्याचप्रमाणे प्रमाणावर आधारित तुलना करताना एकाच प्रकारच्या वस्तू असलेल्या कोणत्या गटात अधिक वस्तू आहेत हे तुलना करून ठरविणे.

टीप:इयत्ता 2 री च्या मुलांना- 

1. भोपळा आणि बटाटा यामधील जड व हलका असा फरक ओळखण्यास सांगणे.

2. मुळा आणि शेवगा यामधील उंच व ठेंगू ओळखण्यास सांगणे.

  इयत्ता 3 –  जाड-बारीक, उंच-ठेंगूजड-हलका या संकल्पनांना उदाहरणे सांगून लिहिण्यास सांगणे.

वापरावयाची सराव पत्रके : I.L-10, & 11   ( 01, 02,03 इयत्ता)

सृजनशीलता आणि सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये.

( मुलांच्या कृती)

·         सामर्थ्य ::  सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये व सृजनशीलता यांचा विकास, डोळे व हात यांच्यामधील समन्वय. कृती -41 – रांगोळी / आकृतिबंध ( Patterns) ध्येय – 1

 उद्देश :

सूक्ष्म स्नायूंची वाढ होते.

हात व डोळे यांच्यातील समन्वय विकसित करणे.

सौंदर्योपासना वृद्धिंगत करणे.

बाह्यस्वरूप ( कठोर ,सौम्य) समजते.

 

आवश्यक साहित्य: रांगोळी , पेपर , फेविकॉल.

पद्धत:

एक रेखाचित्र(outline), एका वाटीमध्ये फेविकॉल,रंगीत रांगोळी/ वाळू देणे.मुले दिलेले चित्र एका पेपरवर चिकटवून त्यावर ब्रशच्या सहाय्याने  फेविकॉल लावणे.त्यावर रांगोळी/ वाळू आपल्या बोटाने टाकण्यास सांगणे. चित्रातील अतिरिक्त वाळू/रांगोळी काढण्यासाठी ट्रे, पेपरप्लेट इत्यादी देणे.याचबरोबर फेविकॉल,रंगीत रांगोळी/ वाळू यांचा वापर करून  फुल,झोपडी बनवू शकतात.मुले आपले चित्र पाहून खूपच आनंदी होतील.तसेच मुलांना त्यांच्या परिचयाच्या संकल्पना देवून चित्र बनवण्यास प्रोत्साहित करणे.

इयत्ता 2 री  3 री च्या मुलांना ठिपक्यांची रांगोळी काढून रंग भरण्यास सांगणे.

भाषा विकास आणि पायाभूत साक्षरता

श्रवण करणे 

व बोलणे

सामर्थ्य : शब्दसंपत्तीची वृद्धी, तर्कशक्ती, गटातील सदस्याबरोबर सहकार्याने काम, सुचनांचे पालन करतात.

कृती-रहस्यमय वस्तू/अक्षर/नंबर ओळखणे (ध्येय-2) ECL-7

उद्देश:

योग्य शब्द रचणे.

 सांघिक मनोभाव वाढीस लावणे.

 सूचना लक्षपूर्वक ऐकून पालन करणे.

शब्दसंपत्तीची वृद्धी करणे.

आवश्यक साहित्य: बॅग, उपलब्ध वस्तू.

पद्धत :

वर्गातील खडू, रबर, डस्टर, फासा इत्यादी वस्तू एका बॅगमध्ये भरा. एकेका मुलांना पुढे बोलावून  बॅगमधील कोणत्याही एका वस्तूला स्पर्श करून ती वस्तू ओळखण्यास सांगणे.प्रश्नाच्या सहाय्याने वस्तू योग्यरीत्या ओळखण्यास सहाय्य करणे.

उदा:

  तू स्पर्श केलेली वस्तू लहान आहे कि मोठी?

    तू स्पर्श केलेल्या वस्तूचा आकार कसा आहे?

  ती वस्तू कशापासून बनवली आहे?

    तू स्पर्श केलेली वस्तू कोणती असेल?

- मुलांनी ओळखलेल्या वस्तूविषयी त्यांच्याशी चर्चा करा.

टीप:इयत्ता 2 री च्या मुलांना त्यांनी ओळखलेल्या वस्तूविषयी 3-4 वाक्यात बोलण्यास सांगणे.

3 री च्या मुलांना त्यांनी ओळखलेल्या वस्तूविषयी 3-4 मिनिटे  बोलण्यास सांगणे.

आकलानासहित वाचन

सामर्थ्य :मुद्रित/छापील मजकुराची जागरुकता, शब्द ओळखणे व अर्थग्रहण, शब्दसंपत्तीची वृद्धी आणि पर्यावरणाची जागृती . कृती – 18 चित्रसंचयिका ( ध्येय -2 ) विषय:उद्यानात तुम्ही पाहिलेल्या वस्तू किंवा

उद्देश :

मुलांनी गटामध्ये बसून तयार केलेल्या भित्तीपत्रिका प्रदर्शित करणे.

आवश्यक साहित्य: तक्ते,स्वरचित चित्रे, क्रेयोन्स, फेविकॉल, मोजपट्टी, ट्याग.

पद्धत :

मुले गटामध्ये आवश्यक साहित्य घेवून केवळ रात्रीच्या वेळी पाहू शकणाऱ्या वस्तूविषयी भित्तीपत्रिका तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य देणे.तयार केलेली भित्तीपत्रिका वर्गामध्ये सादर करण्याची संधी देणे आणि भित्तीपत्रिका वर्गात प्रदर्शित करणे.

टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना मार्गदर्शन करून गटामध्ये उपक्रम (Projects) करण्यास सांगणे.

उद्देशीत लेखन

सामर्थ्य :उद्देशीत लेखन, क्रियात्मक स्व-अभिव्यक्ती, लेखनाचा योग्य क्रम अनुसरतात.

कृती:31  आदर्श लेखन  ध्येय -2  ECW-7

उद्देश:

·  लेखनाचा योग्य क्रम अनुसरणे.

·   क्रियात्मक स्व-अभिव्यक्तीला वाव देणे.   

आवश्यक साहित्य:खडू, फळा.

पद्धत :

·   शिक्षक मुलांच्या समोर फलकलेखन करणे.

·    लेखनाचा योग्य क्रम पाहण्याची संधी मुलांना उपलब्ध करून देणे.

·   मुलांची नावे, मुलांनी काढलेली चित्रांची नावे वैगेरे मुलांच्या समोर लिहिणे.

·     शिक्षक वर्गात जे कांही फलक लेखन करतील ते मुलांना व्यवस्थित दिसेल अश्यापद्धतीने करणे.

टीप:इयत्ता 2 रीच्या मुलांना शब्द  3 री च्या मुलांना वाक्ये फळ्यावर श्रुतलेखन देवून लिहिण्याच्या योग्य क्रमाचे निरीक्षण करणे.आवश्यकता भासल्यास योग्य अभिप्राय देवून मार्गदर्शन करणे.

मैदानी खेळ

कृती:29 रोलिंग ( घरंगळने)  ध्येय-1  

सामर्थ्य :स्थूल स्नायू चालना कौशल्य विकसित होते.

आवश्यक साहित्य : चेंडू

पद्धत :


·  जमिनीवर एक सरळ रेषा आखणे.

·  मुले क्रमवार त्या रेषेवरून चेंडू घरंगळत( गडगडत) नेण्यास सांगणे.

·   टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना वर्तुळाकार उभे करून क्रमवार चेंडू वर्तुळाकार घरंगळत( गडगडत) नेण्यास सांगणे.

रंजक कथा

शीर्षक : मित्रांची कथा

Ø  आवश्यक साहित्य: संवाद असलेल्या दृकपट्ट्या ( Flashcards)

उद्देश : 

Ø  ऐकण्याचे सामर्थ्य वृद्धिंगत करणे.

Ø  कल्पक वृत्ती वाढीस लावणे.

Ø  तर्कशक्ती विकसित करणे.

Ø  कथेशी संबधित असणारी चित्रे संग्रहित करण्याची आवड निर्माण करणे.

Ø  प्रश्नामोनोभाव निर्माण करणे.

Ø  अभिव्यक्ती सामर्थ्य वाढीस लावणे.

Ø  अस्खलितपणे बोलण्याचे कौशल्य रुजविणे.

 पद्धत :

पात्राभिनय

Ø  कथेचे पुनरावलोकन करणे.

Ø  कथा सादर करण्यासाठी 2 री व 3 री च्या मुलांना सहाय्य करणे.

Ø   दृकपट्ट्या देवून पात्रांचे संवाद उच्चारण्यास सांगणे.

Ø   मुले चूक करत असल्यास सकारात्मक रित्या स्वीकारून नंतर दुरुस्त्या सुचवून कथा पुढे सुरु ठेवणे.  

पुन्हा भेटू

· दिवसभरात केलेल्या कृती पुनरावर्तीत करणे.

·   दिवसभरात केलेल्या कृती पालकांशी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यास प्रोत्साहित करणे.

·     दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने शाळेत यावीत, यासाठी एक आनंददायी संदर्भ निर्माण करून मुलांना निरोप देणे.

·        तू करून बघहि कृती करण्यासाठी योग्य योजना आखणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा