CLASS - 6
MEDIUM - MARATHI
SUBJECT - SCIENCE
SYLLABUS - KARNATAKA STATE
QUESTION BANK OF LESSON BASED ASSESSMENT
पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली
सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.
प्रकरण
– १ विज्ञानाचे अद्भुत जग
अध्ययन निष्पत्ती यादी -
विज्ञान हे संशोधन आणि चौकशीची एक पद्धत म्हणून समजून घेणे.
विज्ञानाचा अर्थ आणि स्वरूप समजून घेणे.
विज्ञानातील उत्सुकतेची भूमिका ओळखणे.
विज्ञानाद्वारे उघड झालेली काही गुपिते शोधणे.
वैज्ञानिक पद्धतीची पाऊले ओळखणे.
दैनंदिन जीवनातील वैज्ञानिक संकल्पनांचे परस्परसंबंध ओळखणे.
दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व समजून घेणे.
प्रश्न विचारून आणि पुराव्यावर आधारित उत्तरे शोधून वैज्ञानिक मानसिकता विकसित करणे.
तार्किक विचार आणि पुराव्यावर आधारित निर्णय घेणे दर्शविणे.
वैज्ञानिक पद्धतीच्या चरणांचे पालन करून समस्या सोडवणे.
🔹 महत्त्वाचे मुद्दे (Important Points):
1. विज्ञान म्हणजे काय?
विज्ञान म्हणजे विचार करण्याचा, निरीक्षण करण्याचा आणि जग समजून घेण्याचा मार्ग.
'कुतूहल' ही विज्ञानाची खरी सुरुवात आहे.
2. विज्ञान सर्वत्र आहे. समुद्राच्या तळापासून ते आकाशगंगेपर्यंत, स्वयंपाकघरापासून ते खेळाच्या मैदानापर्यंत विज्ञान असते.
3. नवनवीन शोधांचा प्रवास:
प्रत्येक नवीन ज्ञानामुळे अधिक प्रश्न निर्माण होतात.
विज्ञान म्हणजे एक न संपणारे जिगसॉ पझल
(जिगसॉ पझल म्हणजे एका मोठ्या चित्राचे किंवा फोटोग्राफचे विविध आकारात तुकडे कापलेले असतात आणि हे सर्व तुकडे योग्य प्रकारे एकत्र लावून मूळ चित्र तयार करायचे असते. हे एक प्रकारचे कोडे किंवा खेळ आहे, ज्यामध्ये निरीक्षण, संयोजन आणि विचारशक्ती वाढते.)
जिगसॉ पझल = तुकड्यांचे कोडे / तुकड्यांची कोडी / चित्राचे तुकडे एकत्र लावून मूळ चित्र तयार करणे
4. विज्ञानाच्या अभ्यासातून काय समजते
o जीवन जगण्यासाठी आवश्यक घटक (अन्न, पाणी, हवा).
o विविध पदार्थांचे गुणधर्म, निर्मिती आणि उपयोग.
5. दैनंदिन जीवनातील विज्ञान:
o शाई संपली तर काय करायचे?
o डाळ कुकरमधून का सांडली?
o बल्ब का पेटत नाही?
6. वैज्ञानिक पद्धत:
o निरीक्षण → प्रश्न → अंदाज → प्रयोग → परिणाम → विश्लेषण
7. सहकार्याचे महत्त्व:
o वैज्ञानिक ज्ञान हे सहकार्याने वाढते.
o शास्त्रज्ञ एकमेकांशी सहयोग करतात.
8. विज्ञान शिकण्याची सुरुवात:
o कुतूहल, निरीक्षण आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती.
o मित्रांबरोबर चर्चा व प्रयोग.
योग्य शब्दांनी रिकाम्या जागा भरा.
१.
संशोधन आणि प्रश्न विचारणे कोणत्या टप्प्यापासून सुरू होते? (सोपे)
२.
विज्ञानाबद्दलची सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे ते _________
आहे. (मध्यम)
३.
विज्ञान हे एका प्रचंड आणि कधीही न संपणाऱ्या जिगसॉ _________ सारखे आहे. (सोपे)
४.
नवीन शोध अनेकदा जगाबद्दलची आपली समज _________ करतात. (मध्यम)
५.
हिवाळ्यात _________ गरम पाण्याची
अंघोळ आरामदायक असते. (सोपे)
६.
प्रयोगांद्वारे उत्तरे शोधण्याच्या प्रक्रियेला _________
म्हणतात. (सोपे)
७. __________ म्हणजे गोष्टींचे बारकाईने
निरीक्षण करणे. (कठीण)
८.
एक _________ ही एक तपासण्यायोग्य स्पष्टीकरण
आहे. (मध्यम)
९. _________ हे असे ठिकाण आहे जिथे आपण प्रयोग
करतो. (सोपे)
१०.
विज्ञान आपल्याला _________ सोडवण्यास
मदत करते. (सोपे)
११.
शास्त्रज्ञ निसर्गाला समजून घेण्यासाठी _________ पद्धतीचा वापर करतात. (सोपे)
१२.
विज्ञानात कल्पनांची चाचणी _________ करून केली जाते. (सोपे)
१३.
अनेक शास्त्रज्ञ मोठी समस्या सोडवण्यासाठी _________ मध्ये काम करतात. (सोपे)
१४.
वैज्ञानिक पद्धतीचे पालन करणारी कोणतीही व्यक्ती _________
सारखी काम करत असते. (मध्यम)
II. पुढीलपैकी वेगळा शब्द ओळखा.
१५.
अन्न, हवा, मोबाईल, पाणी (सोपे)
१६.
पाणी, बर्फ, पाण्याची वाफ,
धूर (मध्यम)
१७.
स्केल, पेट्रोल, धातूची चावी,
रबर (मध्यम)
१८.
सूर्य, चंद्र, तारा, पृथ्वी (कठीण)
१९.
बाटली, नदी, झाड, मेंढी (कठीण)
२०.
निरीक्षण, परिकल्पना, विश्वास,
प्रयोग (मध्यम)
III. स्तंभ 'अ' आणि स्तंभ 'ब' यांच्या योग्य जोड्या जुळवा.
२१.
अ ब (सोपे)
अ.
बीज १. गाय
ब.
वासरू २. फुलपाखरू
क.
सुरवंट ३. पिल्लू
ड.
अंडे ४. वनस्पती
२२.
अ ब (कठीण)
अ.
बाष्पीभवन १. ढगांमधून पाण्याचे थेंब
ब.
संघनन २. नद्या, तलाव आणि समुद्रात पाणी जमा होणे
क.
पर्जन्यवृष्टी ३. पाण्याची वाफ वर येते
ड.
संकलन ४. पाऊस आणि बर्फ पडणे
२३.
अ ब (मध्यम)
अ.
निरीक्षण १. कल्पनेची चाचणी
ब.
परिकल्पना २. पुराव्यावर आधारित अंतिम निर्णय
क.
प्रयोग ३. अंदाज करणे
ड.
निष्कर्ष ४. काळजीपूर्वक पाहणे
IV. पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.
२४. कुतूहल
आपल्याला काय विचारायला लावते?
अ)
उत्तर
ब)
कथा
क)
प्रश्न
ड)
मत (सोपे)
२५.
विज्ञान आपल्याला काय समजून घेण्यास मदत करते?
अ)
कला
ब)
निसर्ग
क)
संगीत
ड)
नृत्य (सोपे)
२६.
पाणी कुठे आढळते?
अ)
नदी
ब)
तलाव
क)
तळे
ड)
हे सर्व (सोपे)
२७.
जगाबद्दल समजून घेण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी कोणता विषय उपयुक्त आहे?
अ)
समाजशास्त्र
ब)
विज्ञान
क)
कन्नड
ड)
गणित (सोपे)
२८.
विज्ञान कशावर आधारित आहे?
अ)
मते
ब)
अंधश्रद्धा
क)
प्रयोग
ड)
कथा (कठीण)
२९.
जीवनाला आधार देणारा एकमेव ग्रह कोणता?
अ)
मंगळ
ब)
गुरु
क)
बुध
ड)
पृथ्वी (सोपे)
३०.
पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कशापासून मिळते?
अ)
सूर्य
ब)
चंद्र
क)
उपग्रह
ड)
तारा (कठीण)
३१.
बीजाचे रोपात वाढण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
अ)
माती
ब)
हवा
क)
पोषक तत्वे
ड)
हे सर्व (मध्यम)
३२.
पाणी कशावर बर्फात बदलते?
अ)
गरम केल्याने
ब)
उकळल्याने
क)
थंड केल्याने
ड)
यापैकी काहीही नाही (सोपे)
३३.
पुढीलपैकी कोणती नैसर्गिक घटना नाही?
अ)
इंद्रधनुष्य
ब)
वीज
क)
प्रदूषण
ड)
पाऊस (मध्यम)
३४.
पुढीलपैकी कोणती वैज्ञानिक पद्धतीची पायरी नाही?
अ)
परिकल्पना
ब)
निष्कर्ष
क)
स्वप्न
ड)
प्रश्न (मध्यम)
३५.
वैज्ञानिक पद्धतीमध्ये काय समाविष्ट असते?
अ)
अंदाजित कार्य
ब)
अंधश्रद्धा
क)
पद्धतशीर तपासणी
ड)
यादृच्छिक चाचण्या (कठीण)
V. विधान सत्य असल्यास 'स' आणि
असत्य असल्यास 'अ' असे चिन्हांकित करा.
३६.
शाळेत दाखल झाल्यावर प्रश्न विचारणे पुन्हा सुरू होते. (सोपे)
३७.
विज्ञानात प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन दिले जाते. (मध्यम)
३८.
विज्ञानातील नवोपक्रमांना मर्यादा आहेत. (मध्यम)
३९.
निसर्गातील विविधता आपल्यात कुतूहल निर्माण करते. (सोपे)
४०.
तारे चमकतात. (सोपे)
४१.
श्वास घेण्यासाठी हवेची गरज नसते. (सोपे)
४२.
थंड केल्यावर पाणी वाफेत बदलते. (मध्यम)
४३.
वैज्ञानिक चौकशी 'काय, का आणि कसे' असे प्रश्न विचारून सुरू होते. (मध्यम)
४४.
परिकल्पना हा एक निष्कर्ष आहे. (मध्यम)
४५.
एक शास्त्रज्ञ नेहमी पुरावा आणि तर्क यावर विश्वास ठेवतो. (कठीण)
४६.
विज्ञान अंधश्रद्धांवर आधारित आहे. (सोपे)
४७.
विज्ञान केवळ शास्त्रज्ञांसाठी उपयुक्त आहे. (सोपे)
४८.
प्रयोगांची पुनरावृत्ती परिणामांची अचूकता सुनिश्चित करते. (कठीण)
VI. एक गुणांच्या प्रश्नांची उत्तरे द्या.
४९.
विज्ञान शिकण्यासाठी प्रेरणा देणारी पहिली पायरी कोणती? (सोपे)
५०.
वैज्ञानिक प्रक्रियेतील मुख्य क्रियाकलाप काय आहे? (सोपे)
५१.
विज्ञान प्रामुख्याने कशाबद्दल आहे? (मध्यम)
५२.
विज्ञान आपल्याला समजून घेण्यास मदत करणारी कोणतीही एक गोष्ट सांगा. (मध्यम)
५३.
विज्ञानात कुतूहल का महत्त्वाची आहे? (कठीण)
५४. कुतूहलची व्याख्या
करा? (सोपे)
५५.
विज्ञानाची तुलना कोडे (Puzzle) शी का
केली जाते? (कठीण)
५६.
खगोलीय पिंडांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या क्षेत्राचे नाव सांगा. (मध्यम)
५७.
सर्व सजीवांच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? (सोपे)
५८.
वैज्ञानिक पद्धतीतील पहिली पायरी कोणती? (सोपे)
५९.
परिकल्पना म्हणजे काय? (कठीण)
६०.
विज्ञानातील प्रयोगांची भूमिका काय आहे? (कठीण)
६१.
अनुमान (inference) म्हणजे काय? (मध्यम)
६२.
दैनंदिन जीवनात वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग केला जातो असे एक उदाहरण द्या. (सोपे)
६३.
आपण विज्ञान का शिकतो? (सोपे)
६४.
शास्त्रज्ञ परिकल्पना तपासण्यासाठी कशाचा वापर करतात? (सोपे)
६५.
शास्त्रज्ञ प्रयोग का पुन्हा करतात? (कठीण)
६६.
विज्ञानाच्या अभ्यासात प्रश्नांची भूमिका काय आहे? (मध्यम)
VII. दोन गुणांच्या प्रश्नांची उत्तरे द्या.
६७.
विज्ञान म्हणजे काय? (सोपे)
६८.
विज्ञान शिकण्यात कुतूहल कशी मदत करते?
६९.
विज्ञान सर्वत्र आहे. याचा अर्थ काय? (कठीण)
७०.
या पुस्तकाच्या मदतीने आपण काय शोधणार आहोत? (मध्यम)
७१.
विज्ञानाला साहस (adventure) का
म्हटले जाते? (कठीण)
७२.
वैज्ञानिक पद्धत म्हणजे काय? (सोपे)
७३.
आपण स्वतः आपल्या प्रश्नांची उत्तरे कशी शोधू शकतो? (मध्यम)
७४.
विज्ञानातील निरीक्षणाची भूमिका स्पष्ट करा. (कठीण)
७५.
निरीक्षण आणि अनुमान (inference) यातील
फरक सांगा. (सोपे)
७६.
दैनंदिन जीवनात वैज्ञानिक पद्धतीचा वापर करता अशी दोन उदाहरणे लिहा. (सोपे)
७७.
विज्ञान शिकल्याने आपण अधिक चांगले समस्या सोडवणारे कसे बनतो? (मध्यम)
७८.
वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून शास्त्रज्ञ समस्या कशा सोडवतात? (मध्यम)
७९.
वैज्ञानिक संशोधनात सांघिक कार्य (teamwork) कसे उपयुक्त ठरते? (सोपे)
८०.
शास्त्रज्ञांनी वापरलेली कोणतीही दोन सोपी साधने काढा आणि त्यांना नावे द्या.
(सोपे)
VIII. तीन गुणांच्या प्रश्नांची उत्तरे द्या.
८१.
विज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाशी कसे जोडलेले आहे? उदाहरणे द्या. (सोपे)
८२.
पृथ्वीला एक विशेष ग्रह का मानले जाते? (मध्यम)
८३.
वैज्ञानिक पद्धतीतील पायऱ्या दर्शवणारा प्रवाह आकृती (flowchart) काढा. (सोपे)
८४.
दैनंदिन जीवनात वैज्ञानिक पद्धतीचे महत्त्व उदाहरणासह स्पष्ट करा. (कठीण)
८५.
विज्ञानाचा अभ्यास कशामुळे आनंददायक होतो? (सोपे)
८६.
शहाणे होण्यासाठी 'का'
(Why) विचारण्याचा गुण का वाढवला पाहिजे? स्पष्ट
करा. (सोपे)
IX. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. ४-गुण
८७.
विज्ञानातील कुतूहल आणि संशोधनाचे महत्त्व उदाहरणांसह स्पष्ट करा. (कठीण)
८८.
विज्ञान आपल्याला पर्यावरण आणि त्यात आपली भूमिका समजून घेण्यास कोणत्या प्रकारे
मदत करते? (मध्यम)
८९.
जलचक्राच्या (water cycle) अवस्था
दर्शवणारी आकृती काढा. (कठीण)
९०.
विज्ञान कसे ज्ञान निर्माण करते आणि सहकार्याला प्रोत्साहन देते यावर एक लहान टीप
लिहा. (सोपे)
९१.
निसर्गातील विविधता मुलांमध्ये वैज्ञानिक विचार कसे निर्माण करते? (सोपे)
९२.
समजा तुमचा दूरदर्शन (television) अचानक
काम करणे थांबवतो. कारण आणि उपाय शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करा.
(मध्यम)
إرسال تعليق