कर्नाटक राज्य पाठ्यक्रम

माध्यम - मराठी 

विषय - परिसर अध्ययन

नमूना प्रश्नोत्तरे 

पाठातील प्रश्नांची उत्तरे

पाठ 6: प्रत्येक थेंब

जलचक्र (पाण्याचे चक्र):

  • सूर्यप्रकाशामुळे पाणी गरम होते आणि त्याची वाफ होते. ही वाफ आकाशात जाते.
  • आकाशात वाफ थंड होते आणि तिचे छोटे थेंब बनतात.
  • हे छोटे थेंब एकत्र येऊन ढग बनतात.
  • जेव्हा ढग खूप थंड होतात, तेव्हा त्यातील पाणी पावसाच्या स्वरूपात खाली येते.
  • पाऊस नदी-नाल्यांमधून समुद्राला मिळतो आणि पुन्हा सूर्यामुळे त्याची वाफ होते. हेच पाण्याचे चक्र आहे.

पान नंबर – 41

  • पाण्याची वाफ झालेली तुम्ही तुमच्या घरात पाहिली आहे का? बाजूला दिलेल्या रिकाम्या जागेत लिहा:

उत्तर -  होय, गरम पाणी उकळल्यावर त्याची वाफ होते.

पान नंबर – 42

  • दिलेल्या रिकाम्या जागेत तू प्रयोग करताना निरिक्षण केलेले मुद्दे लिही:

उत्तर - पाणी गरम केल्यावर त्याची वाफ होते आणि पाण्याचे प्रमाण कमी होते.

पान नंबर – 43

  • पिशवीतील पाण्याचे काय झाले? पिशवीच्या वरच्या भागात काय दिसते?

उत्तर -  पिशवीतील पाण्याची वाफ झाली. पिशवीच्या वरच्या भागात पाण्याचे छोटे थेंब दिसतात.

ठीक आहे. तू पाहिलेल्या प्रयोगाच्या सहाय्याने खालील रिकाम्या जागा भर. त्यासाठी खाली दिलेल्या शब्दांची मदत घे. बाष्पीभवन, वाफ (वायू), घनीभवन, वाफ, सूर्य, हवा, थेंब, वारा, ढग, थंड, पृथ्वी, पाऊस.

उत्तर - पाण्याचे स्त्रोत, माती, वनस्पती यांच्यातील पाण्याची सूर्याच्या उष्णतेने तापून वाफ  होते. बाष्पीभवन झालेले हे पाणी हवेत मिसळून वर जाते. थंडगार वाऱ्याने घनीभवन होऊन पाण्याचे लहान लहान थेंब बनतात. ते थेंब एकत्र येऊन त्यांचा ढग बनतो. त्या ढगांना थंडगार हवा लागल्याने ते थंड होतात. आणि लहान लहान थेंब एकत्र येऊन त्यांचे मोठे पावसाचे थेंब बनतात. ते मोठे थेंब पावसाच्या स्वरूपात पुन्हा पृथ्वीवर येतात. यालाच जलचक्र म्हणतात.

पान नंबर – 46

हां.. छोट्यांनो दररोज आपण आपल्या गरजेसाठी पाणी वापरतो. ते कशापासून किंवा कोठून मिळते याची यादी करा:

उत्तर - नळाचे पाणी, विहिरीचे पाणी, बोअरवेलचे पाणी, नदीचे पाणी.

 

ठीक आहे, तुझ्या गावात पाणी मिळवण्याच्या साधनांची (स्त्रोतांची) नावे खाली लिही:

उत्तर -  विहीर, नदी, तलाव, कूपनलिका (बोरवेल), पाण्याचा नळ (टॅप).

 

हे चित्र पहा आणि पृथ्वीवर असलेले गोड पाण्याचे प्रमाण जाणून घ्या:

उत्तर -   पृथ्वीवर खूप जास्त खारट पाणी आहे, जे समुद्रात असते. पिण्यायोग्य गोड पाणी खूप कमी आहे. बर्फातही गोड पाणी आहे, पण ते गोठलेले असते.

 

पान नंबर – 47

  • तू गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतोस का? कोणल्या कारणासाठी अनावश्यक पाणी वापरतोस ते लिही.

उत्तर - होय, कधीकधी दात घासताना नळ चालू ठेवतो किंवा अंघोळ करताना जास्त पाणी वापरतो.

पान नंबर – 48

खालील चित्रांचे निरीक्षण कर. तेथे काय घडत आहे ते खाली दिलेल्या जागेत लिही.

उत्तर - या चित्रांमध्ये लोक पाणी वापरत आहेत. कुणी कपडे धुवत आहे, कुणी भांडी धुवत आहे, कुणी पाणी पीत आहे, कुणी पाणी भरत आहे.

 

पान नंबर – 49

  • दररोज तुमच्या सभोवताली पाणी कसे वाया जाते? ते इथे लिही.

उत्तर - नळातून पाणी गळणे, पाईपलाईन फुटणे, गाडी धुताना खूप पाणी वापरणे, गरजेपेक्षा जास्त पाणी वापरणे.

  • मुलांनो, जर पाणीच नसेल तर काय होईल?

उत्तर -  पाणी नसेल तर आपण जगू शकणार नाही, झाडे-वनस्पती वाढणार नाहीत, प्राणी मरतील.

  • तुमच्या शाळेत आणि घरात होणारा पाण्याचा अपव्यय तुम्ही कसा थांबवाल तू त्यासाठी काय उपाय करणार त्याबदलचे दोन मुद्दे लिही.
    1. नळातून पाणी गळत असल्यास लगेच दुरुस्त करायला सांगणार.
    2. गरजेनुसारच पाणी वापरणार, वाया घालवणार नाही.

पान नंबर – 50

पाण्याची बचत कशी करावी:

  • पहिल्या चित्राच्या बाजूला: पावसाचे पाणी बादलीत साठवा. (Rainwater harvesting / Rainwater collection)
  • दुसऱ्या चित्राच्या बाजूला: झाडांना पाणी देताना कमी पाणी वापरा किंवा पाण्याचा योग्य वापर करा.
  • तिसऱ्या चित्राच्या बाजूला: शेतीसाठी पाण्याचा योग्य वापर करा, उदा. ठिबक सिंचन.
  • चौथ्या चित्राच्या बाजूला: भांडी धुताना नळ चालू ठेवू नका, बादलीत पाणी घेऊन धुवा.
  • पाचव्या चित्राच्या बाजूला: नळ खराब असल्यास तो दुरुस्त करा, जेणेकरून पाणी वाया जाणार नाही.
  • सहाव्या चित्राच्या बाजूला: पाणी प्रदूषित करू नका, नदी-नाल्यात कचरा टाकू नका.

पान नंबर – 51

एकदा वापरलेले पाणी पुन्हा कोणत्या कामासाठी वापरता येईल? विचार कर आणि लिही.

    • भांडी धुतलेले पाणी झाडांना घालू शकतो.
    • कपडे धुतलेले पाणी शौचालयात वापरू शकतो.
    • भाजी धुतलेले पाणी कुंड्यांमधील झाडांना घालू शकतो.

पान नंबर – 52

साठविलेले पावसाचे पाणी कोणकोणत्या कामासाठी वापरु शकतो? समजून घेऊन लिही. उत्तर -   साठवलेले पावसाचे पाणी झाडांना घालण्यासाठी, गाडी धुण्यासाठी, शौचालय धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी वापरू शकतो.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने