CLASS - 10
MEDIUM - MARATHI
SUBJECT - Social Science
SYLLABUS - KARNATAKA STATE
QUESTION BANK OF LESSON BASED ASSESSMENT
पाठ -5: सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या चळवळी
प्रस्तावना -:
१९व्या शतकातील भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ह्या समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव, स्त्री-शिक्षणाचा अभाव, धार्मिक कर्मकांडे यांना आव्हान देणाऱ्या प्रगतिशील विचारसरणीवर आधारित होत्या. राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, ज्योतिबा फुले, स्वामी विवेकानंद, सय्यद अहमद खान, नारायण गुरु, पेरियार यांसारख्या महान विचारवंतांनी समाज परिवर्तनासाठी ऐतिहासिक योगदान दिले. या चळवळींमुळे भारतात बुद्धिवाद, समतावाद, राष्ट्रवाद आणि सामाजिक न्याय या संकल्पनांना बळ मिळाले.
महत्त्वाचे मुद्दे (Important Events)
1. ब्राह्मो समाजाची स्थापना (1828) – राजा राममोहन रॉय यांनी मूर्तिपूजा, सतीप्रथा यांना विरोध करून एकेश्वरवादाचा पुरस्कार केला.
2. आर्य समाजाची स्थापना (1875) – स्वामी दयानंद सरस्वती यांनी "वेदांकडे परत जा" या घोषणेसह जातीय भेदभावाला विरोध केला.
3. सत्यशोधक समाज (1873) – ज्योतिबा फुले यांनी शूद्र-अतिशूद्रांसाठी शिक्षणाचा प्रसार केला.
4. अलीगढ चळवळ (1875) – सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजात आधुनिक शिक्षणाचा प्रचार केला.
5. रामकृष्ण मिशन (1897) – स्वामी विवेकानंद यांनी धर्मसहिष्णुता आणि समाजसेवेचा संदेश दिला.
6. वैकम सत्याग्रह (1924) – नारायण गुरु यांनी अस्पृश्यतेला विरोध करून मंदिर प्रवेशाची मागणी केली.
7. आत्मगौरव चळवळ (1925) – पेरियार यांनी द्राविड समाजाच्या स्वाभिमानासाठी लढा दिला.
अध्ययन निष्पत्ती :
·
१९ वे शतक 'भारतीय पुनर्जागरणाचा' काळ म्हणून ओळखले जाते.
·
ब्राम्हो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाजाची स्थापना आणि सुधारणांची माहिती होईल.
·
यंग बंगाली आणि अलिगढ चळवळी स्पष्ट केल्या जातील.
·
रामकृष्ण मिशनची शिकवण समजून घेतली जाईल.
·
थियोसोफिकल सोसायटीच्या कल्पना स्पष्ट केल्या जातील.
·
नारायण गुरुंच्या धर्मपरिपालन योगम आणि पेरियार यांच्या
कल्पना समजून घेतल्या जातील.
I. प्रत्येक
प्रश्न किंवा अपूर्ण विधानासाठी चार पर्याय दिले आहेत. त्यातून एक योग्य उत्तर
निवडा आणि ते त्याच्या अक्षरासह पूर्ण उत्तर लिहा.
- मानवतेची सेवा हीच ईश्वर सेवा या तत्त्वावर आधारित
सुधारणावादी संघटना (मध्यम)
A. सत्यशोधक समाज
B. प्रार्थना
समाज
C. आर्य समाज
D. रामकृष्ण मिशन
- 'संवाद कौमुदी' वृत्तपत्र सुरू करण्याचे कारण होते (मध्यम)
A. ब्रिटिश
राजवटीला विरोध करण्यासाठी
B. ब्रिटिश
राजवटीला पाठिंबा देण्यासाठी
C. लोकांमध्ये
विवेकबुद्धी विकसित करण्यासाठी
D. भारतीय
समाजावर टीका करण्यासाठी
- डॉ. बी. आर. आंबेडकर __________ च्या तत्त्वांनी
प्रभावित झाले होते. (मध्यम)
A. स्वामी
विवेकानंद
B. दयानंद
सरस्वती
C. ज्योतिबा फुले
D. आत्माराम
पांडुरंग
- ब्राम्हो विद्या समाज __________ यांनी सुरू केला
होता. (सोपे)
A. राममोहन रॉय
B. ॲनी बेझंट
C. दयानंद
सरस्वती
D. कर्नल ऑल्कोट
आणि मॅडम ब्लॅव्हेटस्की
- 'न्यू इंडिया' वृत्तपत्र __________ यांनी सुरू केले होते. (सोपे)
A. राजाराम मोहन
रॉय
B. महात्मा गांधी
C. ॲनी बेझंट
D. दयानंद
सरस्वती
- 'वेदांकडे परत चला' ही हाक __________ यांनी
दिली. (सोपे)
A. दयानंद
सरस्वती
B. आत्माराम
पांडुरंग
C. स्वामी
विवेकानंद
D. राजाराम मोहन
रॉय
- भारतीय समाजाचे पुनरुत्थान करण्यासाठी दयानंद
सरस्वतींनी (मध्यम)
A. वेदांकडे परत
जाण्याची घोषणा केली
B. सत्यार्थ
प्रकाश लिहिले
C. गोरक्षण
संस्था सुरू केली
D. शुद्धी चळवळ
सुरू केली
- चुकीचा पर्याय ओळखा (सोपे)
A. राजाराम मोहन
रॉय - संवाद कौमुदी
B. दयानंद
सरस्वती - सत्यार्थ प्रकाश
C. नारायण गुरु -
रिवोल्ट
D. ॲनी बेझंट -
न्यू इंडिया
II. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे द्या.
- १९ व्या शतकाला कसे संबोधले जाते? (मध्यम)
- राममोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? (सोपे)
- प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? (सोपे)
- प्रत्येक मानवी जीवनाची पहिली गरज स्वातंत्र्य आहे असे
कोणी म्हटले? (मध्यम)
- स्वामी विवेकानंदांचे गुरू कोण होते? (सोपे)
- यंग बंगाली चळवळ कोणी सुरू केली? (सोपे)
- रामकृष्ण मिशनची स्थापना करण्याचा उद्देश काय होता? (मध्यम)
(सप्टेंबर-२०२०)
- "मानवजातीसाठी एक जात, एक धर्म आणि एक
देव आहे" असे कोणी म्हटले? (मध्यम)
- 'गुलामगिरी' (Slavery) हे पुस्तक लिहिणारे समाजसुधारक कोण
होते? (मध्यम)
- प्रार्थना समाजाला लोकप्रिय करणारे समाजसुधारक कोण
होते? (मध्यम)
- अँग्लो ओरिएंटल कॉलेज कोणी सुरू केले? (सोपे)
- विल्यम बेंटिंकने सती प्रथेविरुद्धच्या राजा राममोहन
रॉय यांच्या लढ्याला कसे पाठिंबा दिला? (कठीण)
- 'सत्यार्थ प्रकाश' हे पुस्तक कोणी लिहिले? (जून-२०२४) (सोपे)
III. खालील प्रश्नांची प्रत्येकी सहा वाक्यांत उत्तरे द्या.
- १९ व्या शतकाला 'भारतीय पुनर्जागरणाचे शतक' का
म्हटले जाते? (कठीण)
- राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचे समर्थन
केले ते नमूद करा. (मध्यम) (जून-२०२५)
- सत्यशोधक समाजाच्या सुधारणा कोणत्या होत्या? (सोपे)
- ब्राम्हो समाजाची शिकवण काय होती? (सोपे)
- दयानंद सरस्वतींच्या सुधारणा सांगा / आर्य समाजाची
उद्दिष्टे सांगा. (मध्यम) (जून-२०२०, जून-२०२२, सप्टेंबर-२०२२, एप्रिल-२०२५)
- प्रार्थना समाजाच्या सुधारणा / उद्दिष्टे सांगा.
(मध्यम) (एप्रिल-२०२३, जून-२०२३)
- स्वामी विवेकानंदांचे योगदान काय होते? (मध्यम)
- ॲनी बेझंट यांच्या सुधारणात्मक उपाययोजना काय होत्या? (मध्यम)
(सप्टेंबर-२०२०, एप्रिल-२०२४, ऑगस्ट-२०२४)
- श्री नारायण गुरु धर्म परिपालन योगमच्या सुधारणा
सांगा. (मध्यम)
- पेरियार चळवळीची ठळक वैशिष्ट्ये सांगा. (मध्यम)
☀️इयत्ता - 10वी ♦️
⭕विषय समाज विज्ञान
🔰भाग -1
नमूना प्रश्नोत्तरे
3.भारतावरील ब्रिटिश सत्तेचे परिणाम
4.म्हैसूरचे वडेयर आणि ब्रिटिश सत्तेला कर्नाटकातून झालेला विरोध
5.सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या चळवळी
6.सार्वजनिक प्रशासन - एक परिचय
7.भारतासमोरील आव्हाने आणि त्यांवरील उपाययोजना
10.भारत -भौगोलिक स्थान आणि प्राकृतिक वैशिष्ट्ये
🛑CLASS -10
🔰Sub. - English (TL)
⭕Poem - Summary
🔰New Words
🌀Marathi Meaning
👇👇👇👇👇👇👇👇
https://www.smartguruji.net/2025/04/class-10-english-3rd-language-poems.html
टिप्पणी पोस्ट करा