/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

UNITWISE COMPETENCIES CLASS 7 SCIENCE घटकानुसार सामर्थ्य यादी 7वी विज्ञान

   

 इयत्ता - सातवी 

विषय - विज्ञान 

घटकानुसार सामर्थ्य यादी 

टीप - सदर यादीमध्ये कलिका चेतरिके मधील सामर्थ्यांचा समावेश केलेला नाही.

खालील दिलेली सामर्थ्ये नमुना स्वरूपात देत आहोत.


abc

1.वनस्पतींचे पोषण 
👉  वनस्पतीतील पोषण पद्धतीबद्दल जाणून घेणे.
👉  वनस्पतीत अन्न तयार करण्याची प्रक्रिया प्रकाश संश्लेषण क्रियेबद्दल समजून घेणे.
👉 तसेच कीटक भक्षक वनस्पतींबद्दल जाणून घेणे.
👉 मातीमध्ये पोषक घटकांचे पुनर्भरण कसे होते ते समजून घेणे. 
👉 सहजीवी संबंधांबद्दल समजून घेणे.

2.प्राण्यांचे पोषण 
👉 अन्न सेवनाच्या विविध पद्धतीबद्दल जाणून घेणे.
👉 मानवातील पचनक्रियेचे वर्णन करणे.
👉 गवत खाणाऱ्या प्राण्यातील पचनविषयी जाणून घेणे. अमिबाचे अन्नसेवन पचनक्रियेबद्दल जाणून घेणे.
👉 मानवी पचन संस्थेची सुबक आकृती काढून भागांना नावे देणे.

3.तंतु ते वस्त्र 
👉 लोकर व रेशीम या प्राणिज तंतुबद्दल जाणून घेणे. 
👉 लोकरीची पैदास करणाऱ्या प्राण्यांची यादी करणे.
👉 लोकर बनविण्यासाठी तंतूवरील प्रक्रियाबद्दल जाणून घेणे.

👉 लोकर बनविण्याच्या पायऱ्यांची यादी करणे व वर्णन करणे.

👉 रेशीम व रेशीम किड्यांचा जीवन इतिहास जाणून घेणे.

👉 कोशापासून रेशीम पर्यंत यात रेशीम किड्यांची निपज तसेच रेशीमचा रीळ बनवण्याबद्दल समजून घेणे व वर्णन करणे.

4.उष्णता 
👉 थंड गरम पदार्थ ओळखून त्यांचे वर्गीकरण करणे.
👉 थंड व गरम वस्तूंच्या तापमानाची पातळी ओळखून तुलना करणे.
👉 तापमान मोजून ते डिग्री अंश सेल्सिअस मध्ये सांगणे. वैद्यकीय तापमापक वापरून विद्यार्थ्यांचे तपमान मोजणे.

👉 प्रयोगशाळेतील तापमापक व वैद्यकीय तापमापकातील फरक ओळखणे.
👉 उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार वहन,अभिसरण,उत्सर्जन याबद्दल प्रायोगिकरित्या समजून घेणे.
👉 उष्णतेचे वाहक व रोधक ओळखून वर्गीकरण करणे.

👉 उन्हाळ्यात व हिवाळ्यात वापरत असलेल्या कपड्यांच्या प्रकाराबद्दल जाणून घेणे.

5.आम्ले अल्कली व क्षार 
👉 आम्ल व अल्कली ओळखणे.त्यांच्या फरकांची यादी करणे आणि त्यांच्या गुणधर्मावरून त्यांचे वर्गीकरण करणे.

👉 आपल्या सभोवती असलेले नैसर्गिक सूचक हळद,जास्वंदी बद्दल समजून घेणे.
👉 उदासीनीकरण क्रियेचा अर्थ जाणून घेणे.
👉 दैनंदिन जीवनातील उदासीनीकरण क्रियेच्या उदाहरणांचा अभ्यास करणे.

6.भौतिक व रासायनिक बदल 
👉 आपल्या अवतीभवती होणारे बदल ओळखून त्यांचे एक मुखी बदल व द्विमुखी बदल यामध्ये वर्गीकरण करणे.
👉 भौतिक बदल व रासायनिक बदल ओळखणे.
👉 एकमुखी बदल व द्विमुखी बदल यांचा भौतिक बदल व रासायनिक बदल यांच्याशी संबंध जोडणे.
👉 भौतिक बदल व रासायनिक बदल ओळखणे व त्यांचे वर्गीकरण करणे.
👉 भौतिक बदल व रासायनिक बदलातील फरक स्पष्ट करणे लोखंडाचे गंजणे या क्रियेचे विवरण देणे.

 
7.नित्य हवामान,प्रादेशिक हवामान व त्या हवामानानुसार प्राण्यांचे समायोजन 
👉 हवामान आणि वातावरण यातील फरक ओळखणे.
👉 नित्य हवामान व प्रादेशिक हवामान यामधील फरक समजून घेणे.
👉 आजूबाजूचे नित्य हवामान नोंदवून तुलना करणे.
👉 उष्ण उष्णकटिबंध व ध्रुवीय प्रदेश यातील प्रादेशिक हवामानातील बदलाला कारण व परिणाम समजून घेणे.

👉 उष्णकटिबंधातील जंगलाचे उपयोगाचे विवरण करणे. प्रादेशिक हवामानानुसार प्राण्यांमधील अनुकूलन ओळखणे.

👉 ध्रुवीय व उष्ण कटिबंधीय प्रदेशांमधील जंगलातील प्राणी व पक्षांचे समायोजन समजून घेणे.

8.वारे वादळे व चक्रीवादळे 
👉 हवेला दाब असतो हे समजून विवरण करणे.
👉 हवेच्या वहनामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो हे ओळखणे. 
👉 जमिनीवरील असमान तापमानामुळे वारा वाहतो हे जाणून घेणे.
👉 तसेच पृथ्वीवरील असमान उष्णतेमुळे वादळे निर्माण होतात याचे कारण व परिणामाचे विश्लेषण देणे.
👉 वारे वादळी व चक्रीवादळे यांच्यापासून संरक्षण करून घेण्यासाठी कोणती पूर्वतयारी केली पाहिजे याबद्दल समजून घेणे.

9.माती 
👉 मातीचा परिचय मातीबद्दल जाणून घेणे.
👉 मातीच्या उपयोगांची यादी करणे.
👉 मातीच्या स्तराबद्दल जाणून घेणे.
👉 मातीचा आराखडा यांचा अर्थ व त्यामधील स्तरांचा अभ्यास करणे.
👉 मातीच्या प्रकारांची यादी करणे.
👉 मातीने शोषलेल्या पाण्याचे प्रमाण प्रायोगिकरित्या व सूत्राच्या सहाय्याने काढणे.
👉 मातीतील आर्द्रता व मातीने शोषलेल्या पाण्याचे शेकडा प्रमाण काढणे.
👉 विविध प्रकारच्या मातीचा उपयोग यांची यादी करणे.

10.सजीवातील श्वसन 
👉 पेशीय श्वसनाबद्दल जाणून घेणे.
👉 सजीवांमधील प्रमुख लक्षणे ओळखणे.
👉 सानिल व अनानिल श्वसन यामधील फरक ओळखणे व समीकरण लिहिणे.
👉 मानवाच्या श्वसनसंस्थेची आकृती काढून श्वसनक्रिया स्पष्ट करणे.
👉 श्वसनक्रियेचे कार्य दर्शवणारा नमुना तयार करणे.
👉 इतर प्राण्यांच्या श्वसन इंद्रियाची आकृती काढून भाग ओळखणे व श्वसनक्रिया स्पष्ट करणे.
👉 उत्सर्जन संस्थेची आकृती काढून भाग ओळखणे.
👉 वनस्पती मधील श्वसनक्रिया स्पष्ट करणे.

11.प्राणी व वनस्पती मधील वाहनक्रिया 
👉 रक्तामधील तांबड्या पेशीवर पांढऱ्या पेशीवर प्लेटलेटचे कार्य स्पष्ट करणे.
👉 हृदयाची सुबक आकृती काढून हृदयाचे कार्य स्पष्ट करणे. रक्ताभिसरण संस्थेच्या कार्याचे विवरण करणे.
👉 स्टेथसकोपचा नमुना तयार करणे.
👉 उत्सर्जन संस्थेची सुबक आकृती काढून भाग ओळखणे व कार्य स्पष्ट करणे.
👉 वनस्पती मधील वहनक्रिया व वाहकतेचे कार्य स्पष्ट करणे. 

12.वनस्पतीचे पुनरुत्पादन 
👉 फुलाची आकृती काढून भागांना नावे देणे.
👉 फुलांच्या विविध भागांचे कार्य विवरण करणे व लैंगिक पुनरुत्पादनाच्या विविध पद्धतीने बदल जाणून घेणे.

👉 वनस्पतींमध्ये होणाऱ्या लैंगिक उत्पादनाचे टप्पे समजून घेणे. परागीभवनाचे प्रकार समजून घेणे.
👉 बीज प्रसाराच्या पद्धतीचे विवरण करणे.

13.गती आणि वेळ 
👉 विविध वस्तूंच्या गतींबद्दल गुणधर्मावर आधारित गतीच्या प्रकाराचे वर्णन करणे.
👉 वेगवान गती व सावकाश गती ओळखणे.
👉 गतीचे सूत्र तयार करून विविध समस्या सोडवणे.
👉 साध्या लंबकाच्या आंदोलनाचा आवर्तन अवधी शोधून काढणे.
👉 प्रयोगाच्या सहाय्याने साधे प्रयोग करून वस्तूचा उदाहरण- चेंडू वेग शोधून काढणे व SI परिमाणमध्ये व्यक्त करणे.

14.विद्युत प्रवाह व त्याचे परिणाम 
👉 विद्युत मंडळातील घटक व विद्युत मंडळाचे चित्र काढणे. विद्युत मंडळातील विद्युत घटकांचे संकेत लिहिणे.
👉 बॅटरीचा अर्थ जाणून घेणे व बॅटरी तयार करण्यास प्रवृत्त करणे.
👉 विद्युत प्रवाहाचा औष्णिक व चुंबकीय परिणाम स्पष्ट करणे.
👉 विद्युत घंटाचे कार्य स्पष्ट करणे.
👉 विद्युत चुंबकाचा नमुना तयार करणे.
👉 एलईडी बल्बचा वापर करून विद्युत शक्तीचा कमीत कमी वापरासाठी योग्य क्रम हाती घेणे.

15.प्रकाश 
प्र 👉 काशाचे सरळ रेषेतील संक्रमण प्रयोगाने स्पष्ट करणे. प्रकाशाचे परावर्तन,गोल आरसे व भिंगांची आकृती काढणे.

👉 सपाट आरशात तयार होणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप स्पष्ट करणे. 
👉 एका अंतर्गोल आरशाद्वारे वस्तूच्या विभिन्न स्थितीमध्ये बनलेल्या प्रतिमा प्रयोगाने दाखविणे.
👉 दैनंदिन जीवनात अंतर्गोल आरशाच्या उपयोगाची यादी करणे.
👉 तसेच बहिर्गोल आरशाचा उपयोगाची यादी करणे.
👉 अंतर्गोल व बहिर्गोल भिंगातील फरक समजून घेणे.
👉 दैनंदिन जीवनातील भिंगाचा उपयोग स्पष्ट करणे.
👉 सूर्याचा प्रकाश पांढरा किंवा रंगीत प्रयोगाने स्पष्ट करणे.

16.पाणी -एक अमूल्य स्त्रोत 
👉 पाण्याच्या उपलब्धतेचे विवरण करणे.
👉 पाण्याचे महत्त्व स्पष्ट करणे.तसेच पाण्याच्या अवस्थेबद्दल माहिती देणे.
👉 भूजल एक महत्त्वपूर्ण पाण्याचा स्रोत यावर चर्चा करणे. पाण्याच्या वितरणाबद्दल माहिती देणे.
👉 पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती स्पष्ट करणे.
👉 पाण्याचा काळजीपूर्वकपणे वापर केला पाहिजे.याचे दैनंदिन जीवनात उपयोजन करणे.
👉 पाण्याच्या कमतरतेचा वनस्पतीवर होणाऱ्या परिणामाबद्दल चर्चा करणे

17.अरण्य -आपली जीवनरेषा 
👉 जंगल- प्राणी व वनस्पतीचे आश्रयस्थान आहे हे समजून घेणे. 
👉 जंगलात झाडे वृक्ष,लहान रोपे,गवत विविध स्तर निर्माण करतात हे जाणून घेणे.
👉 जंगले मातीची धूप थांबवतात हे समजून घेणे.
👉 जंगलामुळे हवामान व हवेची गुणवत्ता यावर परिणाम होतो. हे जाणून घेणे.
👉 जंगलापासून मिळणाऱ्या उत्पादनाची यादी करणे. जंगलतोडीमुळे होणारे परिणाम जाणून घेणे.

18.सांडपाण्याची कहाणी 
👉 सांडपाणीचा अर्थ समजून घेणे.
👉 दूषित पाण्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेबद्दल जाणून घेणे. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाबद्दल जाणून घेणे.
👉 दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांबद्दल समजून घेणे.

👉 शौचालयातील सांडपाण्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्याच्या विविध पद्धती ओळखणे.
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा