/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

BRIDGE COURSE ALL INFORMATION | सेतुबंध कार्यक्रम संपूर्ण माहिती

सेतुबंध कार्यक्रम संपूर्ण माहिती 

संदर्भ BRIDGE COURSE GUIDE 

BY - SAMAGRA SHIKSHAN ABHIYAN,KARNATAKA. 

 

   

  सेतुबंध कार्यक्रम सविस्तर माहिती,उद्देश,पूर्व परीक्षा,साफल्य परीक्षा,सामर्थ्य यादी,नमुना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका -:

   

  सेतूबंध हा कार्यक्रम वैज्ञानिक,अचूक आणि वस्तुनिष्ठ असला पाहिजे.तो एक प्रक्रिया म्हणून न घेता, मागील वर्गातील अध्ययन आणि पुढील वर्गातील अध्ययन यांना जोडण्याचा प्रयत्न असावा आणि विद्यार्थ्याची प्राप्त सामर्थ्ये समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.समस्या विद्यार्थ्यामध्ये किंवा शिक्षकांमध्ये असू शकते.ती समस्या किंवा कमतरता शोधण्याचे प्रयत्न सेतुबंधासारख्या कार्यक्रमाने शक्य झाले पाहिजे.त्यामुळे ही प्रक्रिया अधिक बळकट केली पाहिजे.या संदर्भात सेतुबंधाचे व्यवस्थापन प्रभावीपणे केले तर काही अध्ययनातील अडथळे टाळता येतील आणि अध्ययनाची सोय करता येईल.


  सेतूबंध म्हणजे काय?


      सद्या शिकण्यास आवश्यक अध्ययनांश किंवा अध्ययन निष्पत्तीस संबंधीत पूरक अध्ययन सामर्थ्य किंवा अध्ययनांश जोडणे.मुलांची शिकण्याची पातळी, त्यांची क्षमता ओळखणे आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी तयार करणे हा एक क्रियाकलाप आहे. थोडक्यात मुलांनी जे शिकले आहे आणि जे शिकत आहेत त्यात परस्परसंबंध निर्माण करणे म्हणजे सेतुबंध म्हणता येईल.

   

  सेतुबंध कधी करता येईल?


  👉शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला कौशल्ये वाढवण्यासाठी सेतुबंध -
  शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला दीर्घ सुट्टीतून शाळेत परत आलेल्या विद्यार्थ्यामध्ये पूर्वी आत्मसात केलेली कौशल्ये किती अवघड आहेत?कोणती कौशल्ये आत्मसात केलेली नाहीत? पुढील अध्ययनांशास पूरक सामर्थ्ये कोणकोणती?
  हे सर्व लक्षात घेऊन या आधी आत्मसात केलेल्या क्षमतांना पुढे आत्मसात करण्यास आवश्यक असलेल्या क्षमतांमध्ये विलीन करण्याची प्रक्रिया शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीची प्रक्रिया म्हणजे सेतुबंध.

  सेतुबंध का करावा? (Importance of bridge course)


          जसे आपण सर्व जाणतो की कोणतेही अध्ययन एकसमान नसते.जरी पाठ्यपुस्तक,वर्ग,शिकवण्याची पद्धत आणि शिक्षक एकच असले तरी वेगवेगळ्या कारणांमुळे शिकणे सारखे नसते.शक्य तितक्या समान शिक्षणाची निर्मिती करणे हे शिक्षणाचे ध्येय आहे.तर मग एकसमान शिक्षण निर्माण करण्यासाठी काय केले पाहिजे? कोण कोणत्या गतीने शिकू शकेल?कोण शिकण्यात मागे आहे?ते का मागे पडत आहेत? कसे आणि किती मागे?अशा प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.वर्षाच्या सुरुवातीला अनेक समस्या असतात ज्या लहान चाचणी, घटक चाचणी,तोंडी प्रश्न, विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीचे निरीक्षण अशा उपायांनी ओळखता येतात.

      मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या मजेत घालवल्या आणि शाळेत आली.मुले जसजसे नवीन शिकतात तसतसे जुने विसरतात. ही एक मानसशास्त्रीय वस्तुस्थिती आहे.
  ही एक मानसशास्त्रीय वस्तुस्थिती आहे.मुले जे काही शिकतात ते सर्व त्यांच्या लक्षात राहत नाही. मुलांनी जे शिकले,विसरले आणि जे उरते ते शिक्षण असे आपण समजून घेतले पाहिजे.अशावेळी पूर्वी शिकलेला विषय आणि आता शिकायचा विषय यांचा परस्परसंबंध निर्माण करावा लागतो.सेतुबंधासारख्या प्रक्रियेतून हे काम पूर्ण होत असते.हे अत्यंत शास्त्रीय आहे.
   

  सेतुबंधचे टप्पे कोणकोणते? (Steps of bridge course)


  👉`नैदानिक (पूर्व) परीक्षे'चे नियोजन आणि आयोजन

  👉प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययनाचे /अध्ययन कमतरतेचे विश्लेषण करणे.

  👉परिहार बोधन नियोजन आणि अंमलबजावणी

  👉साफल्य परीक्षेद्वारे पुन्हा एकदा प्राप्त सामर्थ्य तपासणे.

  👉येथे प्रामुख्याने नैदानिक (पूर्व) परीक्षा आणि साफल्य परीक्षा अशी दोन साधने आहेत.सेतुबंध कार्यक्रमानंतर ज्या विद्यार्थ्याने क्षमता गाठली नाही,अशा विद्यार्थ्याना निरंतर परिहार बोधन अध्यापनाचे नियोजन करावे.

   

  सेतूबंध प्रक्रियेत


  👉आता शिकवला जाणारा विषय/ सामर्थ्याना पूरक असणाऱ्या व विद्यार्थ्याना आवश्यक असणाऱ्या समार्थ्यांची यादी तयार करावी.

  👉इथे सामर्थ्य आधारित परीक्षेत प्राधान्य द्यावे अध्ययनांश आधारित परीक्षेस प्राधान्य देऊ नये.

  👉प्राप्त सामर्थ्य तपासण्यासाठी प्रश्न,उपक्रमांचे नियोजन करावे.

  👉पूर्व/साफल्य परीक्षांमध्ये सर्व प्रकारच्या परीक्षा तंत्रांचा समावेश असावा.

  👉प्रश्नांमध्ये तोंडी उत्तर, लेखी उत्तर आणि क्रियाकलाप (कृती) आधारित प्रश्नांचा देखील समावेश असावा.

  👉त्यात विविध प्रकारचे प्रश्न असावेत.

  👉सेतुबंधामध्ये घेण्यात आलेली पूर्व परीक्षा आणि साफल्य परीक्षा साधनांमध्ये कोणताही निकाल नसेल.कोणतेही ग्रेड नसतील.

  👉हा कार्यक्रम पुढील शिक्षणासाठी किती सामर्थ्य आहेत?किती सामर्थ्य नाहीत?याचे मूल्यमापन करून पुढील शिक्षणास विद्यार्थ्याला तयार करण्यासाठी आहे.

  👉प्रश्नांची रचना थेट अध्ययनांश आधारीत करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेली सामर्थ्ये तपासण्यासाठी करावी.

  👉भाषेच्या बाबतीत, पाठ्यांशाला/ अध्ययनांशाला प्राधान्य न देता भाषा सामर्थ्याची परीक्षा घ्यावी.
   

  पूर्व परीक्षा (Pre-Test)


  👉विद्यार्थ्याने कोणते सामर्थ्य प्राप्त केले आहे? किती प्रमाण प्राप्त केले आहे?याचे तपासणी करणे.

  👉अध्ययनातील दोष शोधणे.

  👉अध्ययनातील दोष ओळखून त्यांचे निराकरण करणे आणि पुढील अध्ययनांशाला पुरक शैक्षणिक कृतीसाठी संधी देणे.

  👉यामुळे वैयक्तिक लक्ष देण्यास मदत होते.

  👉शिक्षकाने त्याचे अध्यापन,पद्धती,तंत्र, सामर्थ्य यांचे निरीक्षण केले पाहिजे.

  👉सामर्थ्य प्राप्त झाले की नाही याची नोंद केली पाहिजे.

  👉पूर्व परीक्षा परिणामांचे (निकालाचे) विश्लेषण:

  👉या टप्प्यावर विद्यार्थ्यामध्ये असलेल्या आणि नसलेल्या सामर्थ्याची यादी करणे. नसलेले सामर्थ्य कसे भरून काढायचे?पुढे कसे जायचे? कोणते अध्ययन अध्यापन साहित्य वापरले जाऊ शकते? ज्यांना सामर्थ्य प्राप्त झालेले नाही त्यांच्यासाठी पुनर्भरण योजना करा आणि ज्यांना सामर्थ्य प्राप्त झालेले आहे त्यांच्यासाठी उजळणी (सराव) योजना तयार करून त्यानुसार ' परिहार बोधन' चे नियोजन करणे.
   

  परिहार बोधन:


      आपल्याला माहीत आहे की कोणत्याही दोन व्यक्ती समान असू शकत नाहीत,त्यांची क्षमता समान असू शकत नाही. अध्ययन प्रक्रियेत,प्रत्येक मूल त्याच्या वैयक्तिक पद्धतीने गुंतलेले असते.परंतु समस्या एकच असू शकते.जरी समस्या एकच असली तरी,त्याचे निराकरण वैयक्तिकरित्या तयार केले जाणे आवश्यक आहे.एकदा समस्या ओळखली आणि समजली की,पूरक उपाय केले जाऊ शकतात.

      शिक्षणात गुणवत्ता वाढीसाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. दर्जेदार शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याचे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समस्या आणि त्यांचे निराकरण शोधणे आवश्यक आहे. परिहार कार्यात शिकण्याच्या समस्यांचे स्वरूप भिन्न असले तरी विषय आणि व्यक्ती यांची समान तत्त्वे आहेत.
   
  👉विद्यार्थ्याने कोणता अध्ययनांश प्राप्त केला नाही हे समजून घेणे व निर्दिष्ट सामर्थ्याचे प्राधान्य क्रमाने पुनर्भरण व उजळणी करणे.

  👉पुढे, विद्यार्थ्याने शिकविण्याचे विषय किंवा प्राप्त सामर्थ्याना पूरक असे क्रियाकलाप एकत्र करून करावे.

  👉ते विद्यार्थ्यांनी विसरलेल्या अध्ययनांशाची उजळणी करून घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे.

  👉परिहार/उपायात्मक अध्यापनामध्ये मजबूत प्रेरणादायी उपक्रमांचा समावेश असावा.

  👉अध्ययन मानसशास्त्रीय आधार वैयक्तिक असावा.

  👉प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्याचे सतत निरीक्षण आणि मूल्यमापन केले पाहिजे.
   
  येथे मुख्य घटक -:

  👉अनेक सामर्थ्ये प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांचे गट करणे.

  👉ज्या विद्यार्थ्यांनी सामर्थ्य प्राप्त केलेले नाही त्यांच्यासाठीत्या सामर्थ्याचे पुन्हा अध्यापन केले पाहिजे.

  👉ज्या विद्यार्थ्यांनी सामर्थ्य प्राप्त केले आहे त्यांना उजळणी कार्यात गुंतवावे.

  👉परिहार बोधन साधने आणि तंत्रे आयोजित केली पाहिजेत.

  👉नियोजनाप्रमाणे सर्व पार पाडणे

  👉शेवटी मूल्यांकन करणे.
   
  परिहार बोधन मध्ये विद्यार्थ्यांचे सामर्थ्य आधारित गटात वर्गीकरण करून काहींसाठी -:

  👍स्वयंअध्ययन देणे. (कृती स्वरूपात)


  👍काहींना निर्दिष्ट पाठ वाचण्यास सांगणे. (फक्त स्वयं पूनर्मनन)

  👍सामूहिक अभ्यासाचा समावेश. (सहकार्याने द्विमुखी अध्ययन)

  👍वर्गमित्रासोबत किंवा सहाध्यायी सोबत अध्यापन समावेश. (एक मार्गी अध्ययन)

  👍वैयक्तिक अध्यापन करणे. (शिक्षकांनी विद्यार्थ्याला वैयक्तिक अध्यापन करणे)

  👍मूल कसे शिकते? हे समजून घेणे व त्यानुसार शिकवणे हे आपले ध्येय असले पाहिजे.अर्थात आपण हे लक्षात घेतले पाहिजे की मूल पाच इंद्रियांच्या वापराने शिकते.

          पूर्व परीक्षेत चांगली कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा समूह अभ्यास,समवयस्क अभ्यास आणि वैयक्तिक अध्यापनासाठी वापर केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.या टप्प्यावर दोन प्रक्रिया होतात.एक म्हणजे ज्या विद्यार्थ्याने सामर्थ्य प्राप्त केलेले नाही त्याच्यासाठी सामर्थ्याचे पुनर्भरण करणे आणि दुसरे म्हणजे ज्या विद्यार्थ्याने सामर्थ्य प्राप्त केले आहे त्याच्यासाठी सामर्थ्याची उजळणी करणे.ज्यामुळे दोघांनाही पुढे शिकण्यास प्रेरित करणे.
   

  साफल्य परीक्षा (Post Test)


  👉परिहार बोधनाचा विद्यार्थ्याने सामर्थ्य प्राप्त केले आहे की नाही याची नोंद करणे.

  👉सामर्थ्य प्राप्त केलेले/ सामर्थ्य प्राप्त न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करावा.

  👉आधीचे अध्ययन आणि पुढील अध्ययन यांचा सेतू निर्माण कारणे.

  👉नलिकली इयत्तांचा अभ्यासक्रम सतत आणि व्यापक मूल्यमापनासह एकत्रित केलेला आहे,कारण प्रत्येक अध्ययनांशाची दृढीकरण करुन पुरवले जाते आणि शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सराव पुस्तकात सेतुबंध दिलेला असतो,त्यामुळे इयत्ता 2री आणि 3री सेतूबंध कार्यक्रमाची येथे चर्चा केली जाणार नाही.इयत्ता चौथी ते इयत्ता आठवी पर्यंत राबवता येणारा सेतुबंध कार्यक्रम येथे प्रामुख्याने चर्चा केली आहे.

  👉परिहार बोधन हे एकूणच सेतुबंध मधील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.विद्यार्थ्याला काही सामर्थ्य प्राप्त नसू शकतात आणि त्याच्या/तिच्या सामर्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी समावेश केला पाहिजे.विद्यार्थ्याला एखादे सामर्थ्य प्राप्त झाले नसल्यास ते थोडक्यात पुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

  👉सेतुबंध हे मागील सामर्थ्य किंवा अध्यनांश पुढील अध्ययनांशाची जोडण्याच्या दृष्टीने घेतले पाहिजे.याकडे एक परीक्षा म्हणून पाहिले जाऊ नये.ज्यांनी सामर्थ्ये प्राप्त केली आहेत/प्राप्त केलेली नाहीत यांच्यामध्ये कोणताही फरक निर्माण करू नये.त्यांची क्षमता ओळखून त्यांना पुढील शैक्षणिक वर्ष आणि पुढील विषयापर्यंत नेले पाहिजे.

  👉साफल्य परीक्षेनंतरही,ज्या विद्यार्थ्याने सामर्थ्ये प्राप्त केलेली नाहीत त्यांच्या परिहार बोधनासाठी कृती संशोधन किंवा वैयक्तिक अभ्यास करून त्याच्या अध्ययनातील कमतरता समजून घेऊन त्याचे निराकरण करून त्यांना शिकण्यास प्रोत्साहन देणे.
   

  सेतुबंध कार्यक्रमातील माहितीचे एकत्रीकरण -


  👉विषय शिक्षकाने मासिक अहवाल तीन दिवसांत मुख्याध्यापकांना सादर करावा. (दि. 1 ते 3)

  👉मुख्याध्यापकांनी प्रत्येक महिन्याचा अहवाल दोन दिवसांत C.R.P ला सादर करावा. (दि. 4 ते 5)

  👉सीआरपीनी तीन दिवसांत क्षेत्र समन्वय अधिकारी यांच्याकडे माहिती सादर करावी.(दि. 6 ते 8)

  👉क्षेत्र समन्वय अधिकाऱ्यानी तीन दिवसांत माहिती डाएटकडे सादर करायची आहे. (दि.9 ते 12)

  👉डाएट प्राचार्यांनी तीन दिवसांत अतिरिक्त आयुक्तांना माहिती सादर कारणे. (दि. 13 ते 15)
   
      सेतुबंध कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या या मार्गदर्शक पुस्तिकेत सेतुबंध, महत्त्व, सेतुबंध का करावा? सेतुबंध राबविण्यासाठीचे टप्पे, उपाय शिकवण्यासाठी आयोजित करता येणारे उपक्रम, सेतुबंधानंतर उचलता येणारी पावले याविषयी माहिती आहे.

      राज्यभरात आधीच अनेक मॉडेल्स आहेत, ज्यात अनेक कल्पना आहेत.सेतुबंधाची अंमलबजावणी राज्यभरात स्पष्ट आणि एकसमान पध्दतीने होणे अत्यावश्यक आहे आणि ते या सेतूबंध मार्गदर्शिकेतून शक्य होईल अशी आमची अपेक्षा आहे.

  महत्वाच्या सुचना -  


  या मार्गदर्शीकाचे अनुसरण करण्यापूर्वी या सूचना लक्षात घ्या.

  👉सेतुबंध ही मूल्यमापन प्रक्रिया नाही,ती अध्ययन सामर्थ्याचे परीक्षण आहे.

  👉सेतुबंधातील प्रत्येक घटक पुढील शिक्षणाच्या सोयीसाठी योग्य असावा.

  👉येथे माहितीसाठी नमुना प्रश्नपत्रिका दिल्या आहेत.मागील इयत्तेतील अध्ययन मानकांनुसार किंवा निर्दिष्ट सामर्थ्यानुसार स्वत: च्या स्तरावर या प्रश्नपत्रिका तयार केल्या जाऊ शकतात.

  👉येथे नमुना म्हणून प्रत्येक वर्गात प्रत्येक विषयासाठी फक्त 20 मानके तयार केली आहेत.ते अध्ययनाच्या सोयीसाठी कितीही मानके ठरवू शकता.

  👉सेतुबंधमध्ये प्रश्नपत्रिका ही अध्ययनाचे साधन म्हणून देखील मानले जात असल्याने,ती शक्य तितकी वैविध्यपूर्ण आणि मनोरंजक असावी.

  👉विद्यार्थी आताच शाळेत आले आहेत. आल्याबरोबरच त्यांना त्यांची आणखी एक परीक्षा असे वाटू देऊ नये

  👉परिहार बोधनासाठी नमूना स्वरुपात काही उपक्रम सुचवले आहेत.तरी शिक्षकांनी आपल्या स्तरावर नवीन उपक्रमांची आखणी करावी.नवीन अध्यापन साहित्य तयार करून अध्यापन करावे.

  👉साफल्य परीक्षेनंतर अध्ययनात मागास विद्यार्थ्यांवर कृती संशोधन किंवा वैयक्तिक अभ्यास केल्यास विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही फायदा होऊ शकतो.

  👉(कन्नड माध्यम) दुसरी आणि तिसरी इयत्ताच्या नलीकली पध्दतीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात सेतुबंधाचा समावेश होतो,स्वतंत्रपणे सेतुबंध करण्याची आवश्यकता नाही,म्हणून आम्ही येथे फक्त चौथी ते सातवी वर्गापर्यंत सेतुबंधाची माहिती देत ​​आहोत.

  👉साफल्य परीक्षेत सामर्थ्य प्राप्त न केलेला विद्यार्थी असल्यास निरंतर परिहार बोधनाचे नियोजन केले पाहिजे.

     

  BRIDGE COURSE LEARNING COMPETENCIES,MODEL QUESTION PAPERS

  सेतुबंध नमुना सामर्थ्य यादी,प्रश्नपत्रिका,उत्तरपत्रिका -:

  💢इयत्ता - तिसरी 👉येथे स्पर्श करा.


  💢इयत्ता - चौथी  👉येथे स्पर्श करा.


  💢इयत्ता - पाचवी  👉येथे स्पर्श करा.


  💢इयत्ता - सहावी  👉येथे स्पर्श करा.


  💢इयत्ता - सातवी 👉येथे स्पर्श करा.


  💢इयत्ता - आठवी   👉येथे स्पर्श करा.

   

  Please Visit Our YouTube Channel SmartGuruji 

  https://youtube.com/@smartguruji2022

   ●═══════〇═══════●

  अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या

  👉https://www.smartguruji.in

  👉https://www.smartguruji.net

  ●═══════〇═══════●

   

  ➡️2023-24 शैक्षणिक मार्गदर्शिका

  🔶अधिक माहितीसाठी खालील लिंकवर स्पर्श करा

  https://www.smartguruji.in/2023/04/annual-lesson-plan-school-time-table.html

  🌈🏌️‍♀️🤽‍♂️🎨🎤🤹‍♀️🎲♟️🎮

  🔶उन्हाळी सुट्टी अभ्यास

  🔵इयत्ता - 2री ते 7वी

  👇👇👇👇👇👇👇👇👇👇

  https://bit.ly/उन्हाळी-सुट्टी-अभ्यास-2रीते7वी

  🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷🔶🔷

  🟡ENGLISH SPECIAL HOMEWORK

  👇👇👇👇👇👇👇👇👇👇

  https://www.smartguruji.in/2023/04/write-correct-pronunciation-for.html

   


  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा