/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

10.VACH PUSTAKE (१०. वाच पुस्तके )

 

 इयत्ता - सातवी 

विषय - मराठी 

१०. वाच पुस्तके 

                  कवी - अविनाश ओगले

नवीन शब्दार्थ :

जगती -  जगामध्ये

सन्मान - मान

जिंदगी (हिंदी शब्द ) - जीवन

रुक्ष  - कोरडे

सहा रिपू - (षड्रिपू) काम, क्रोध,लोभ, मोह, मत्सर,मद

सन्मान  - मान

रिपू - शत्रू

स्वत्व - स्वाभिमान

स्वाध्याय

खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

1. माणूस कशाने घडतो ?

उत्तर -वाचनाने माणूस घडतो असे कवी म्हणतो.

2. जीवन अर्थहीन केव्हा होते ?

उत्तर -ग्रंथाविना जीवन अर्थहीन होते.

3. माणसाचे सहा शत्रू कोणते ?

उत्तर -काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि मद हे माणसाचे सहा शत्रू आहेत.

4. समाजाचा अभिमान राखण्यासाठी काय केले पाहिजे ?

उत्तर -समाजाचा अभिमान राखण्यासाठी पुस्तके वाचली पाहिजेत.

5. मातीचा अभिमान राखण्यासाठी काय जपले पाहिजे असे कवी म्हणतो?

उत्तर :मातीचा अभिमान राखण्यसाठी स्वत्व, संस्कृती, मायमराठी जपली पाहिजे असे कवी म्हणतो.

6. शेवटी कवी कोणता संदेश देत आहे ?

उत्तर-मातीचा अभिमान जपण्यासाठी पुस्तके वाच असा संदेश शेवटी कवी देतो.

आ. तीन ते चार वाक्यात उत्तर लिही.

1. कवीने या कवितेमध्ये पुस्तकांच्या वाचनाचे महत्त्व कसे वर्णन केले आहे?

उत्तर -या कवितेतून कवीने पुस्तकांच्या वाचनाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे.जगण्याचे भान पाहिजे असेल,जगात जर सन्मान पाहिजे असेल,जीवनात जर प्राण पाहिजे असेल,समाजात मान सन्मान पाहिजे असेल,मनात जर भगवान पाहजे असेल,सहा शत्रूंपासून वाचायचे असेल,आयुष्यात सुख,आनंद पाहिजे असेल आणि स्वत्व,संस्कृती,मायमराठी जपायची असेल तर तर कवी म्हणतात ‘वाच पुस्तके’.

 इ . कशासाठी काय ?

1. जगण्याचे जर भान पाहिजे.

2. जगती जर सन्मान पाहिजे.

3. जिंदगीत जर जान पाहिजे.

वाच पुस्तके

4. मानाचे जर पान पाहिजे.

5. हृदयी जर भगवान पाहिजे. 

6. हिरवे जर तुज रान पाहिजे.

7. मातीचा अभिमान पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा