CLASS - 9 

MEDIUM - MARATHI 

SUBJECT - Social Science 

SYLLABUS - KARNATAKA STATE 

BOARD - KSEAB

QUESTION BANK OF  LESSON BASED ASSESSMENT

इतिहास - प्रकरण 1. पाश्चात्त्य धर्म

पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली 

    कर्नाटक राज्यातील सर्व शाळांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून 'पाठ-आधारित मूल्यमापन परीक्षा' (Lesson Based Assessment - LBA) प्रणाली अंमलात येणार आहे. हा बदल शिक्षण गुणवत्तेत वाढ करेल का, याबद्दल शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे.

काय आहे नवीन प्रणालीचा उद्देश?

सध्या सरकारी शाळांमध्ये रचनात्मक मूल्यमापन (FA – Formative Assessment) आणि संकलनात्मक मूल्यमापन (SA – Summative Assessment) या पद्धती वापरल्या जातात. नव्या LBA प्रणालीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या आकलनाची आणि त्यांच्या शिकण्याच्या गुणवत्तेची सातत्याने खात्री करणे हा आहे. प्रत्येक पाठ किंवा अध्याय शिकवून झाल्यानंतर लगेचच छोटी चाचणी घेतल्याने विद्यार्थ्यांना विषय किती समजला हे स्पष्ट होईल. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षांच्या गुणांसाठी नव्हे, तर खऱ्या अर्थाने ज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. भविष्यात होणाऱ्या बोर्ड परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी ही सुरुवातीपासूनची मूल्यमापन पद्धत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने व्यक्त केली आहे.

अंमलबजावणी आणि स्वरूप:

    ही घटक चाचणी पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (DSERT) या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका तयार करून शाळांना पुरवेल. शाळांना या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मिळालेले गुण 'SATS' पोर्टलवर (Student Achievement Tracking System) अपलोड करावे लागतील, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे सोपे होईल.

प्रत्येक चाचणी ३० गुणांची असेल आणि त्यात २५ प्रश्न असतील. प्रश्नपत्रिकेची रचना विशिष्ट प्रमाणात सोपे, सामान्य आणि कठीण प्रश्नांच्या मिश्रणाने केली जाईल:

६५% सोपे प्रश्न

२५% सामान्य प्रश्न

१०% कठीण प्रश्न

    बहुतेक प्रश्न बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे असतील, जेणेकरून विद्यार्थ्यांचे आकलन तपासणे सोपे होईल. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रिकाम्या जागा भरणे, चित्रांना रंग भरणे, जोड्या जुळवा आणि गटात न बसणारा शब्द ओळखणे असे मनोरंजक प्रश्न असतील.

सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.

अध्ययन निष्पत्ती : विद्यार्थी यहुदी धर्म, झोरोस्ट्रियन धर्म, ख्रिश्चन धर्म आणि इस्लामच्या विकासाविषयी शिकतील. येशू ख्रिस्त आणि प्रेषित मुहम्मद यांच्या जीवनाबद्दल समजून घेतील. यहुदी धर्म, झोरोस्ट्रियन धर्म, ख्रिश्चन धर्म आणि इस्लामच्या शिकवणींची तुलना करतील.

I. पुढील अपूर्ण विधानांसाठी चार पर्याय दिले आहेत. योग्य उत्तर निवडा आणि पूर्ण उत्तर लिहा.

1.    त्याच्या कारकिर्दीत ख्रिश्चन धर्म रोमचा राज्यधर्म बनला (A)

A) कॉन्स्टँटाईन

B) ज्युलियस सीझर

C) ट्रोजन

D) मार्कस ऑरेलियस

2.   प्रेषित मुहम्मद यांच्या वारसांना असे म्हणतात: (E)

A) पोप

B) खलिफ

C) सुलतान

D) बिशप

3.  यहुदी धर्माचे संस्थापक हे होते: (E)

A) अब्राहम

B) पीटर

C) पॉल

D) डेव्हिड

4.  वैदिक विधी आणि पद्धतींशी जवळचा संबंध असलेला धर्म आहे: (D)

A) इस्लाम

B) ख्रिश्चन धर्म

C) यहुदी धर्म

D) झोरोस्ट्रियन धर्म

5.  दुसऱ्या महायुद्धानंतर यहुद्यांसाठी स्थापित केलेला देश आहे (A)

A) इजिप्त

B) रोम

C) इझ्राएल

D) सौदी अरेबिया

6. झोरोस्ट्रियन धर्मग्रंथ “अवेस्ता” मध्ये आढळणाऱ्या काव्यमय साहित्याला असे म्हणतात: (A)

A) गाथा

B) ग्रंथ

C) बराह

D) किताब

II. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे द्या:

7. पाश्चात्त्य जगातील सर्वात प्राचीन धर्म कोणता आहे? (A)

8. येशूला कोठे क्रूसावर खिळण्यात आले? (E)

9. झोरोस्ट्रियन धर्माच्या मुख्य प्रथा काय आहेत? (A)

10. दुसऱ्या महायुद्धात 60 लाख यहुदिना मारणारा जर्मन हुकूमशहा कोण होता? (E)

11. येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांना काय म्हणतात? (E)

12. प्रेषित मुहम्मद ध्यानात असताना देवदूताने काय घोषित केले? (D)

III. पुढील प्रश्नांची दोन ते चार वाक्यांत उत्तरे द्या:

13. पाश्चात्त्य प्रदेशात कोणत्या धर्मांचा उगम झाला? (E)

14. पाश्चात्त्य धर्मांमध्ये ओळखता येणारे सामान्य घटक कोणते आहेत? (D)

15. ख्रिश्चन धर्म कसा पसरला? (A)

16. इस्लामच्या पाच प्रमुख प्रथा कोणत्या आहेत? (E)

17. इस्लामच्या तीन शिकवणी लिहा. (E)

IV. पुढील प्रश्नांची प्रत्येकी सहा वाक्यांत/मुद्द्यांत उत्तरे द्या

18. यहुदी धर्माच्या दहा आज्ञा सूचीबद्ध करा. (A)

19. येशू ख्रिस्ताच्या शिकवणी स्पष्ट करा. (A)

V. पुढील प्रश्नांची प्रत्येकी आठ वाक्यांत/मुद्द्यांत उत्तरे द्या

20. प्रेषित मुहम्मद यांच्या जीवनावर एक लहान टिप लिहा. (A)

21. यहुदींचा इतिहास वर्णन करा. (D)

22. येशू ख्रिस्ताचे जीवन स्पष्ट करा. (A) 


CLICK HERE TO DOWNLOAD LBA QUESTION BANK FROM DSERT 

Post a Comment

أحدث أقدم