4th Grade Math Evaluation SA-2

📚 इयत्ता 4थी – गणित संकलित मूल्यमापन – 2 (2025-2026)

LBA आधारित नमूना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि तोंडी परीक्षा संच

इयत्ता ४थीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयातील संकलित मूल्यमापन – २ (2025-2026) या LBA (Lesson Based Assessment) आधारित नमुना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि तोंडी परीक्षा संच येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही प्रश्नपत्रिका कर्नाटक राज्य अभ्यासक्रमाच्या नियोजनानुसार तयार करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समज, गणन कौशल्य, तर्कशक्ती आणि समस्यासोली क्षमता यांचे मूल्यमापन करण्यासाठी उपयुक्त आहे.

या संचामध्ये लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका, सविस्तर उत्तरसूची (Answer Key), तसेच १ गुणांच्या तोंडी परीक्षेसाठी स्वतंत्र प्रश्नसंच समाविष्ट आहे. प्रश्नपत्रिका तयार करताना ब्लूप्रिंटनुसार विविध प्रकारचे प्रश्न—उदा. रिकाम्या जागा भरा, योग्य पर्याय निवडा (MCQ), जुळवा, उदाहरणे सोडवा, शब्दसमस्या सोडवा—यांचा समतोल राखण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व घटकांचा सराव करता येईल.

ही नमुना प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वार्षिक मूल्यमापनाची तयारी करण्यासाठी, तसेच शिक्षकांना मूल्यमापन नियोजनासाठी मार्गदर्शक ठरेल. उत्तरपत्रिका स्पष्ट, सोप्या आणि टप्प्याटप्प्याने मांडलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे मूल्यमापन (Self-Assessment) करण्यास मदत होईल. तोंडी परीक्षा संचामुळे विद्यार्थ्यांच्या गणितीय संकल्पना स्पष्ट आहेत का, हे पडताळता येईल.

📘 इयत्ता: ४थी | 📗 विषय: गणित | 📝 एकूण गुण: ४० | ⏳ वेळ: ९० मिनिटे

विद्यार्थ्यांनी प्रश्न नीट वाचून, स्वच्छ व स्पष्ट हस्ताक्षरात उत्तरे लिहावीत. सर्व उदाहरणे पूर्ण पद्धतीने सोडवावीत. शिक्षकांनी आवश्यकतेनुसार या नमुना प्रश्नपत्रिकेत बदल करून वापर करू शकतात. ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.

संकलित मूल्यमापन – 2 (2025 – 2026)

नमूना प्रश्नपत्रिका - 1

विभाग A – (1 गुण x 10 प्रश्न = 10 गुण)
प्रश्न 1. योग्य पर्याय निवडून लिहा:
  1. 1 रुपया म्हणजे किती पैसे?
    • A) 10 पैसे
    • B) 100 पैसे
    • C) 1000 पैसे
    • D) 50 पैसे
  2. चेंडूचा आकार कोणता असतो?
    • A) गोल (Sphere)
    • B) शंकू (Cone)
    • C) दंडगोल (Cylinder)
    • D) घन (Cube)
  3. खालीलपैकी 'शंकू' (Cone) चे उदाहरण कोणते?
    • A) पुस्तक
    • B) चेंडू
    • C) आईस्क्रीम कोन
    • D) पेन्सिल
  4. त्रिमितीय (3D) आकृत्यांना काय म्हणतात?
    • A) समतल आकृती
    • B) घनाकृती
    • C) रेषा
    • D) बिंदू
  5. घनाला (Cube) किती कडा असतात?
    • A) 4
    • B) 8
    • C) 12
    • D) 6
प्रश्न 2. रिकाम्या जागा भरा:
  1. 500 पैसे = _______ रुपये.
  2. विटेचा आकार _______ असतो. (इष्टिकाचिती / गोल)
  3. समतल आकृतींना फक्त लांबी आणि _______ असते.
  4. घनाकृती वस्तू _______ असतात. (पोकळ / भरीव)
  5. ट्रॅफिक कोन हा _______ आकाराचे उदाहरण आहे.
विभाग B – (2 गुण x 10 प्रश्न = 20 गुण)
प्रश्न 3. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा:
  1. 6.25 रुपये हे पैशांमध्ये रूपांतरित करा.
  2. 450 पैसे म्हणजे किती रुपये आणि किती पैसे?
  3. 'दंडगोल' (Cylinder) आकाराच्या कोणत्याही दोन वस्तूंची नावे लिहा.
  4. समतल आकृती आणि घनाकृती यांमधील कोणताही एक सोपा फरक लिहा.
  5. घनाला (Cube) किती पृष्ठभाग असतात?
  6. 'गोल' (Sphere) आकाराची दोन उदाहरणे द्या.
  7. खालील रक्कम अंकात लिहा: 'पंधरा रुपये पन्नास पैसे'
  8. बेरीज करा: ₹ 20.50 + ₹ 10.00 Shapes for reference
  9. वजाबाकी करा: ₹ 50.00 - ₹ 20.00
  10. त्रिमितीय (3D) आकृती म्हणजे काय? (सोपी व्याख्या लिहा).
विभाग C – (शाब्दिक उदाहरणे व आकृती - 10 गुण)
प्रश्न 4. शाब्दिक उदाहरण सोडवा:
  1. राजूकडे 15 बिस्किटे होती. त्यातील 6 बिस्किटे त्याने रामला दिली. तर रामला दिलेली बिस्किटे अपूर्णांकात लिहा आणि अंश व छेद ओळखा.
  2. एका पिशवीत 12 kg तांदूळ आहेत आणि दुसऱ्या पिशवीत 8 kg तांदूळ आहेत. तर दोन्ही पिशव्यांचे मिळून एकूण वजन किती?
  3. आकृती काढा (2 गुण):
    कोणतीही एक 'सममिती' (Symmetry) असलेली आकृती काढा (उदा. पान, फूल किंवा त्रिकोण) आणि त्याला मध्यभागी रेष मारा. Symmetry/Clock Reference

उत्तरपत्रिका (Model Answer Sheet)

विभाग A

1. B) 100 पैसे

2. A) गोल (Sphere)

3. C) आईस्क्रीम कोन

4. B) घनाकृती

5. C) 12

6. 5 रुपये

7. इष्टिकाचिती

8. रुंदी

9. भरीव

10. शंकू

विभाग B

11. 6.25 रुपये = 625 पैसे

12. 450 पैसे = 4 रुपये 50 पैसे

13. पाण्याचा पाईप, गॅस सिलेंडर, पेन्सिल (कोणतेही दोन).

14. समतल आकृतीला जाडी नसते, घनाकृतीला जाडी/उंची असते.

15. 6 पृष्ठभाग

16. चेंडू, लाडू, पृथ्वीचा गोल.

17. ₹ 15.50

18. ₹ 20.50 + ₹ 10.00 = ₹ 30.50

19. ₹ 50.00 - ₹ 20.00 = ₹ 30.00

20. ज्या आकृतीला लांबी, रुंदी आणि उंची (किंवा जाडी) असते, तिला त्रिमितीय आकृती म्हणतात.

विभाग C

21. अपूर्णांक: 6/15. अंश: 6, छेद: 15.

22. एकूण वजन = 12 + 8 = 20 kg

23. (विद्यार्थ्याने काढलेली योग्य सममितीय आकृती तपासावी).

तोंडी परीक्षा (Oral Test)

प्रश्न (1 गुण प्रत्येकी):

  1. अर्धा लिटर म्हणजे किती मिलीलिटर? (500 मिली)
  2. चौकोनाला किती बाजू असतात? (4 बाजू)
  3. तुझ्या हातातील पुस्तकाचा आकार कोणता आहे? (इष्टिकाचिती)
  4. 10 रुपयांच्या 5 नोटा म्हणजे किती रुपये? (50 रुपये)
  5. पाव किलो म्हणजे किती ग्रॅम? (250 ग्रॅम)
  6. घड्याळात लहान काटा कशाचा असतो? (तास काटा)
  7. एका वर्षात किती महिने असतात? (12 महिने)
  8. शून्याने कोणत्याही संख्येला गुणले तर उत्तर काय येते? (शून्य)
  9. त्रिकोणाला किती कोपरे असतात? (3 कोपरे)
  10. 250 + 250 किती होतात? (500)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने