/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

Savitribai Fule सावित्रीबाई फुले

 आद्यशिक्षिका,महान समाजसेविका सावित्रीबाई फुले 

    सावित्रीबाई फुले ह्या थोर समाजक्रांतिकारक महात्मा जोतिराव फुले यांच्या पत्नी होत्या.जोतिबा फुलेंनी सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाची ज्योत प्रज्वलित केली;आणि स्त्रीसुध्दा पुरुषांच्या बरोबरीने युगप्रवर्तक कार्य करू शकते, हे जगाला सिध्द करून दाखविले.
सावित्रीबाई फुले या शिक्षण आणि स्त्रियांच्या हक्कासाठी लढल्या.1831 मध्ये जन्मलेल्या सावित्रीबाईंनी सर्वांसाठी,विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी जास्त कष्ट करून समाजाचे पारंपारिक नियम मोडून काढले.19व्या शतकात स्त्रिया आणि शूद्र यांची स्थिती पशूपेक्षाही हीनदीन होती.अशा काळात स्वतः निरक्षर असलेल्या सावित्रीबाईंनी विवाहानंतर प्रथम स्वतः आवश्यक तेवढे शिक्षण घेतले व स्वतःच्या कार्याने त्या आद्यशिक्षिका,मुख्याध्यापिका, समाजसेविका,दीनदलितांच्या उध्दारक बनल्या.
त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासमवेत त्यांनी 1848 मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.त्यांच्या प्रयत्नांमुळे असंख्य मुलींना शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आणि मुलींचे भविष्य उज्ज्वल झाले.
    ज्या काळात स्त्रीने शिकणे हे महापाप समजले जाई,स्त्रीचा जन्मच अशुभ मानला जाई अशा काळात स्त्री उद्धारक कार्य करून स्त्रियांचे उज्ज्वल भविष्य निर्माण करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना मानाचा मुजरा...
➖➖➖➖🌀🌀➖➖➖➖➖➖➖🌀🌀➖➖➖➖➖➖➖🌀🌀➖
🟥3 जानेवारी -बालिका दिन
🔰मराठी,हिंदी,इंग्रजी भाषणे व सुत्रसंचालन
➖➖➖➖🌀🌀➖➖➖
  • Telegram
  • Instagram
  • WhatsApp
  • Youtube

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा