/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

7th SS Textbook Solution Lesson 8. KENDRA SARAKAR (पाठ 8 – केंद्र सरकार)

   
 

इयत्ता - सातवी

विषय - समाज विज्ञान 

माध्यम - मराठी 

अभ्यासक्रम - २०२२ सुधारित 

विषय - स्वाध्याय 

पाठ 8 – केंद्र सरकार


गटात चर्चा करुन उत्तरे द्या :
1. केंद्र सरकारची तीन अंगे कोणती? त्यांची कार्ये कोणती ?
उत्तर - शासकांग, कार्यांग, न्यायांग ही केंद्र सरकारची तीन अंगे आहेत.
त्यांची कार्ये थोडक्यात खालीलप्रमाणे -
शासकांग : शासन अथवा कायद्यांची रचना करणे हे त्याचे प्रमुख कार्य होय. त्याच प्रमाणे कार्यांगाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते.
कार्यांग : हे शासकांगाने तयार केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करते.
न्यायांग : न्याय निवाडा करुन निर्णय देते.
2. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी कोणती पात्रता असावी लागते ?
उत्तर - लोकसभेचा सदस्य होण्यासाठी खालील पात्रता आवश्यक असतात..
(1) लोकसभेचा सदस्य होऊ इच्छिणारी व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
(2) किमान वय 25 वर्षे असावे.
(3) न्यायालयाकडून तुरुंगवासाची शिक्षा झालेली नसावी.
(4) ती व्यक्ती दिवाळखोर असू नये म्हणजेच आर्थिक दृष्टया सर्व गमावलेली असू नये.
3. संविधान दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
उत्तर - संविधान दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे
4. भारतीय गणराज्याचा सर्वोच्च अधिकारी कोण ?
उत्तर - राष्ट्रपती हे भारतीय गणराज्याचे सर्वोच्च अधिकारी आहेत.
5. पंतप्रधानांचे महत्व काय ?
उत्तर - संसदीय राज्यकारभार व्यवस्था पाहणे, देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडणे या कार्यात पंतप्रधानांचे पात्र फार महत्वाचे असते.
6. केंद्रीय मंत्रीमंडळाची स्थापना कशी होते ?
उत्तर - सार्वत्रिक निवडणूकामध्ये बहुमताने निवडून आलेल्या पक्षाच्या किंवा गटाच्या नायकास सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपती आवाहन करतात व त्या नायकास पंतप्रधान म्हणून निवड करतात.त्यानंतर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार मंत्रीमंडळाची रचना करतात.पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ याना मिळून केंद्रीय मंत्रीमंडळ (कॅबिनेट पद्धत) असे म्हणतात. मंत्र्यांचे खातेवाटप पंतप्रधानच करतात.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा