वारंवार विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे कर्नाटक राज्य अनुसूचित जाती गणती 2025

58 min read

 कर्नाटक राज्य अनुसूचित जाती गणती 2025 वारंवार विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे -

 

   सर्व स्तरांतील लोकांना सर्व काळात समानता आणि सामाजिक न्याय देणे हे शासनाचे सर्वात मोठे उद्दिष्ट आहे. समानतेची ही कल्पना अनेक थोर विचारवंत आणि दूरदृष्टींच्या लोकांकडून प्रेरणा घेतलेली आहे. त्यांनी मांडलेल्या "समानतेच्या सिद्धांतानुसार" सर्व नागरिकांना समान दर्जा आणि संधी मिळायला हव्यात. भारताच्या संविधानाच्या कलम 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या आधारावर कोणताही भेदभाव करण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे, कलम 16 मध्ये सर्वांना सार्वजनिक नोकरी क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.

         विविध ठिकाणी राहणारे किंवा विविध व्यवसायात गुंतलेले लोक आणि जनसमूहांमधील सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आणि दर्जा, सुविधा आणि संधींमधील भेदभाव दूर करण्यासाठी कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी सामाजिक स्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

           या दृष्टीने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींना अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे असा निर्णय दिला आहे. अनुसूचित जातीच्या यादीतील जातींचे उप-वर्गीकरण करून अंतर्गत आरक्षण दिले जाऊ शकते, असा निर्णय दिनांक ०१-०८-२०२४ रोजी दिला आहे. कर्नाटक सरकारने अंतर्गत आरक्षण लागू करण्यासाठी माननीय न्यायमूर्ती एच. एन. नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोगाची नेमणूक केली असून अंतर्गत आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर, उप-वर्गीकरण करण्यासाठी आवश्यक असलेला डेटा गोळा करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा उद्देश आहे.

         अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट असलेल्या लोकांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक प्रतिनिधित्व इत्यादी स्थितीची पाहणी करणे हे आयोगाचे उद्दिष्ट आहे. अनुसूचित जातींच्या स्थितीबद्दल वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ माहिती मिळवून अंतर्गत आरक्षणाचे वर्गीकरण करून सरकारला शिफारस करणे हा उद्देश आहे. अनुसूचित जातींची नेमकी संख्या कोणत्याही सर्वेक्षण नोंदीतून किंवा जातीनुसार लोकसंख्येच्या आकडेवारीतून निश्चितपणे उपलब्ध होत नाही. जातीनुसार सर्वेक्षण आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे अंतर्गत आरक्षणाचे उप-वर्गीकरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार वैज्ञानिक विश्लेषण करून वर्गीकरण करणे आवश्यक आहे.

     सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारावर अशा समुदायांची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती अभ्यासून अंतर्गत आरक्षण वर्गीकरण करण्यासाठी राज्यभरात सर्व अनुसूचित जातींच्या सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा उद्देश आहे.

परिशिष्ट-4

दिनांक: 28-04-2025 रोजी जिल्हा स्तरावर झालेल्या प्रशिक्षणात विचारलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण.

(TRANSLATED ONLY FOR INFORMATION)

1. गणतीदारांजवळ Android 8.0 Version नसेल, तर मोबाईल घेण्याची काय तरतूद आहे?
उत्तर: किमान Android मोबाईल 8.0 Version आवश्यक आहे.
2.
विवाह करून इतर राज्यांतून आलेल्या मुलींची आधार कार्ड माहिती मोबाईल ॲपमध्ये नोंदवता येईल का?
उत्तर: कर्नाटक राज्यात नोंदणीकृत असलेले आधार कार्ड तपशील राज्यात वापरण्याची परवानगी आहे.
3.
सर्वेक्षण करताना एका घराचे सर्वेक्षण ३ वेळा अपूर्ण राहिल्यास, पुढील घराचे सर्वेक्षण हाती घ्यावे का?
उत्तर: एका कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावरच पुढील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याची परवानगी आहे.
4.
मास्टर ट्रेनरची सेवा सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत मिळू शकते का?
उत्तर: होय.
5.
मास्टर ट्रेनर, गणतीदार आणि पर्यवेक्षकांच्या मानधनाबाबत.
उत्तर: शासनाच्या स्तरावर निर्णय घेतला जाईल.
6.
पृष्ठ क्रमांक 35: आपले कुटुंब खालीलपैकी कोणती संस्था/संघटनेची स्थापना केली आहे/अथवा मालकी आहे? ‘कोणतीही नाही’ हा पर्याय समाविष्ट करावा.
उत्तर: ‘कोणतीही नाही’ संकेत क्रमांक 99 हा पर्याय ॲपमध्ये समाविष्ट केला आहे.
7.
आपले कुटुंब सामाजिक भेदभावाला बळी पडले आहे का? ‘नाही’ हा पर्याय (Option) समाविष्ट करावा.
उत्तर: ‘कोणतीही नाही’ संकेत क्रमांक 99 हा पर्याय ॲपमध्ये समाविष्ट केला आहे.
8.
घराचा क्रमांक नसेल तर काय करावे?
उत्तर: सर्वेक्षकांना दिलेल्या मतदार यादीत घरांचा क्रमांक नमूद केला आहे. तो पाहून नोंदवावा. जर घराचा क्रमांक नसेल, तर शेजारच्या घराच्या क्रमांकासोबत उपक्रमांक जोडावा. उदाहरण: शेजारच्या घराचा क्रमांक 50 असल्यास, उपक्रमांक 50/1 असा नोंदवावा.
9.
आंतरजातीय विवाह झाल्यास, अनुसूचित जातीची स्त्री/ मुलगी/ सून असल्यास कोणत्या प्रकारे गणतीत सामील करायचे? एका कुटुंबात सर्वजण इतर जातीचे असून, केवळ सून अनुसूचित जातीची असल्यास, कोणत्या प्रकारे गणनेत सामील करायचे?
उत्तर: अशा प्रकरणांमध्ये कुटुंबाचे प्रमुख गैर-अनुसूचित जातीचे असल्यामुळे, सदर कुटुंब सर्वेक्षणास पात्र नाही. तरीही, सून अनुसूचित जातीची असल्यास, त्यांना सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात दिनांक: 19-05-2025 ते 21-05-2025 पर्यंत आयोजित विशेष शिबिरात कागदपत्रांसह माहिती देण्याची संधी दिली जाईल.
10.
आधार कार्डमध्ये नवीन नाव जोडल्यास अपडेट करावे का?
उत्तर: सर्वेक्षणाच्या वेळी दिलेले आधार कार्ड नोंदवावे.
11.
बीपीएल / आधार कार्ड उपलब्ध नसल्यास काय करावे?
उत्तर: बीपीएल / आधार कार्ड / जात प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक देणे अनिवार्य आहे.
12.
विमुक्त जाती जमातीमध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार यादी नसते. कोणतेही कागदपत्र नसेल तर?
उत्तर: बीपीएल / आधार कार्ड / जात प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक देणे अनिवार्य आहे.
13.
प्रत्येक गणनदारास सर्वेक्षण पुस्तिका 2025 देणे?
उत्तर: दिली जात आहे.
14.
प्रत्येक घराचे सर्वेक्षण करायचे आहे की, केवळ अनुसूचित जाती समुदायाच्या घरांनाच भेट द्यायची आहे?
उत्तर: प्रत्येक घराला भेट देऊन अनुसूचित जाती कुटुंबांना ओळखायचे आहे. पुस्तिकेच्या भाग-2 मधील पृष्ठ क्रमांक: 15 मध्ये दिलेली पद्धत अनुसरायची आहे.
15.
आंतरजातीय विवाहित दांपत्यात पती अनुसूचित जातीचा आणि पत्नी इतर जातीची असल्यास पत्नीची जात काय नोंदवायची?
उत्तर: पत्नीची जात नमूद करण्याची तरतूद नाही.
16.
घराची मालकीण महिला/ विधवा असल्यास काय करावे?
उत्तर: कुटुंबाची प्रमुख म्हणून विचार करून सर्वेक्षण पुढे चालू ठेवावे. पुस्तिकेच्या भाग-2 मधील पृष्ठ क्रमांक: 16 मध्ये दिलेली पद्धत अनुसरायची आहे.
17.
सर्वेक्षणास गेल्यावर रेशन कार्ड किंवा आधार कार्ड न दिल्यास काय करावे?
उत्तर: बीपीएल / आधार कार्ड / जात प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक देणे अनिवार्य आहे.
18.
जास्तीत जास्त 2 सदस्य नवीन समाविष्ट करण्याची तरतूद आहे असे सांगितले आहे, पण जास्त सदस्य असल्यास काय करावे?
उत्तर: 2 पेक्षा जास्त सदस्य असल्यास, पडताळणी करून समाविष्ट करू शकता.
19.
एका वार्डात एकही अनुसूचित जातीचे कुटुंब नसेल, तर त्या वार्डात सर्वेक्षण करायचे की नाही?
उत्तर: अनुसूचित जाती कुटुंबांना ओळखण्यासाठी सर्वेक्षण ब्लॉक मधील सर्व घरांना भेट देणे आवश्यक आहे. जर ते कुटुंब गैर-अनुसूचित जातीचे असतील, तर सर्वेक्षण पुढे करण्याची आवश्यकता नाही. पुस्तिकेच्या भाग-2 मधील पृष्ठ क्रमांक: 15 मध्ये दिलेली पद्धत अनुसरायची आहे.
20.
आंतरजातीय विवाह झालेल्या घराचा मालक पत्नीने आपल्या मुलांची जात स्वतःचीच नोंदवावी, असा आग्रह धरत असेल, तर काय करावे?
उत्तर: मुलांची जात वडिलांच्या जातीवर अवलंबून असते. त्यामुळे पत्नीच्या जातीवर आधारित मुलांची जात विचारात घेण्याची तरतूद नाही.
21.
देवदासी कुटुंबातील देवदासींच्या मुलांच्या शाळेतील नोंदीमध्ये वडिलांचे नाव नमूद केले असल्यास, गणनेच्या वेळी वडिलांचे नाव नोंदवता येईल काय?
उत्तर: माहिती देणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोंदवावे.
22.
कुटुंबाचा प्रमुख माहिती देताना आपला मोबाईल क्रमांक देण्यास नकार देत असेल, तर काय करावे? (आधार प्रमाणीकरण)
उत्तर: क्रमांक देण्यासाठी मन वळवावे. तरीही नकार दिल्यास, पुस्तिकेच्या पृष्ठ क्रमांक: 81 वर दिलेला संमती अर्ज भरून Upload करून Submit करावे.
23.
गणनेच्या वेळी कुटुंबाचा प्रमुख आणि सदस्यांजवळ कोणताही मोबाईल नसेल, तर काय करावे?
उत्तर: अशा कुटुंबाच्या ओळखीच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक घेऊन नोंदवावा.
24.
गणनेच्या वेळी काही भागांमध्ये मोबाईल नेटवर्क नसेल, तर सर्वेक्षण करण्यास अडचण येत असल्यास काय करावे?
उत्तर: नेटवर्क नसेल तरी, सर्वेक्षण करून माहिती App मध्ये नोंदवता येते. नेटवर्क आल्यावर ती माहिती आपोआप Upload होते.
25.
गणनेच्या वेळी माहिती नोंदवून Submit केल्यानंतर, कुटुंबाच्या प्रमुखाने माहिती बदलण्यास सांगितल्यास किंवा चुकीची माहिती Submit झाल्यास, Edit करण्याचा पर्याय आहे का?
उत्तर: Submit करण्यापूर्वी बदल करू शकता. Submit केल्यानंतर बदलण्याचा पर्याय नाही.
26.
गणतीच्या वेळी मोबाईल App मध्ये वय Edit करता येते का? बीपीएल/एपीएल मधील वयानुसार असावे का?
उत्तर: नाही.
27.
बीपीएल/एपीएल चा वापर केल्यास गणती करणे सोपे होते.
उत्तर: होय.
28.
जिल्ह्याबाहेरील मतदारांचे सर्वेक्षण.
उत्तर: जिल्ह्याबाहेर असलेल्या कुटुंबांची माहिती देण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यात सोय उपलब्ध आहे.
29.
अनुसूचित जातीची मुलगी नुकतीच विवाह करून नवऱ्याच्या घरी आली असल्यास, तिचे माहेर धरायचे की सासर?
उत्तर: नवऱ्याच्या घरी होणाऱ्या सर्वेक्षणात तिची माहिती नोंदवायची आहे.
30.
एका कुटुंबातील सदस्य एकच रेशन कार्ड वापरत असतील, पण ते सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील, तर काय करावे?
उत्तर: कुटुंब एकच असल्यास, रेशन कार्डानुसार एकाच ठिकाणी माहिती नोंदवावी.
31.
गणतीदार माहिती घेताना माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या जातीचा पुरावा मागायला हवा का?
उत्तर: सर्वेक्षण करणाऱ्यांनी माहिती घेताना माहिती देणाऱ्यांकडून जातीचा पुरावा घेणे आवश्यक नाही.
32.
सर्वेक्षण झाल्यावर माहिती देणाऱ्याच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येतो, तो टाकून Submit करायचे आहे की, संमतीपत्रावर सही घेऊन Upload करायचे आहे? की दोन्ही करायचे आहेत?
उत्तर: दोन्हीपैकी एक करायचे आहे.
33.
एका कुटुंबात 10 सदस्य असून 9 जण अनुसूचित जातीचे आहेत आणि एकाची माहिती नाही, तर ‘माहित नाही’ हा पर्याय निवडता येतो का?
उत्तर: होय.
34. Offline Mode
मध्ये ओटीपी येतो का?
उत्तर: नाही.
35.
सदर मोबाईल App काही मोबाईलमध्ये Download होत नाही.
उत्तर: त्या जिल्ह्याच्या DPMC कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
36.
कुटुंबात दिव्यांग सदस्य असल्यास, त्यांना समाविष्ट करण्याची तरतूद आहे का?
उत्तर: आहे.
37.
जन्मतारीख लवचिक करून वय नोंदवण्याची सोय करावी.
उत्तर: अशी परिस्थिती उद्भवणार नाही.
38.
सर्वेक्षण अर्ज भरल्यावर Delete चा पर्याय देऊन अर्ज भरण्याची सोय करावी, तसेच सर्वेक्षण झालेल्या कुटुंबाच्या मालकास संदेश/भरलेला अर्ज Download करून Print घेण्याची सोय द्यावी.
उत्तर: Submit करण्यापूर्वी बदल करू शकता. Submit झाल्यावर Delete करण्याचा पर्याय नाही. Print देण्याची सोय नाही.
39.
ओळखपत्र देण्यात येणार आहे का?
उत्तर: दिले जाईल.
40.
जात सर्वेक्षण पुस्तिकेत नोंदवलेल्या जातीच्या यादीत एस.सी. कोड क्रमांक 015 मध्ये ‘बळगे’ ऐवजी ‘डावी’ असे नमूद केले आहे.
उत्तर: केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या यादीतील जातीच फक्त नमूद करायच्या आहेत.
41.
एका घराची माहिती भरून Submit केले, पण Submit झाले नाही, तर पुढील कुटुंबाचे सर्वेक्षण करायला जावे का?
उत्तर: Submit झाल्यावरच पुढील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याची तरतूद आहे.
42.
जिल्हा, तालुका, आणि गावांचा Code हवा आहे.
उत्तर: App मध्ये दिला आहे. (Drop-down मध्ये उपलब्ध आहे.)
43.
कुटुंबातील मुलगी विवाहित असल्यास, तिला Delete करण्याची सोय आहे का?
उत्तर: आहे.
44.
एका गावात Booth (Block) असल्यास, पहिल्या Booth मध्ये 100% गैर-अनुसूचित जातीची कुटुंबे असतील, तर दुसऱ्या Booth मधील गणनदाराचे काम जास्त असल्याने, पहिल्या Block मधील व्यक्ती दुसऱ्या Block मधील काही घरांचे सर्वेक्षण करू शकतात का?
उत्तर: संबंधित अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातच सर्वेक्षण करावे.
45.
सर्वेक्षणाच्या वेळी ‘भोई’ असून ‘भोवी’ आणि ‘किल्लिकातर’ असून ‘शिल्लेक्यातर’ असे नमूद करण्यास सांगितले आणि भविष्यात हेच गृहीत धरून जात प्रमाणपत्र देण्यास दबाव आणल्यास काय करावे?
उत्तर: यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही.
46. Voter List
मधील सदस्यांची संख्या आणि Ration Card मधील सदस्यांची संख्या यात फरक आढळल्यास काय नोंदवावे?
उत्तर: Ration Card ग्राह्य धरून सर्वेक्षण करावे.
47.
घरोघरी सर्वेक्षण झाल्यावर, ज्या घरांचे सर्वेक्षण झाले आहे, त्यावर खूण कशी करावी?
उत्तर: आवश्यकता नाही.
48. ‘
आपले कुटुंब कोणत्याही सामाजिक भेदभावाला बळी पडले आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर तीन-चार पर्यायांवर Tick’ करता येते का?
उत्तर: अनेक पर्याय निवडण्याची सोय App मध्ये आहे.
49.
अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र नसलेल्या काही वादग्रस्त जातींचे सर्वेक्षण करताना, माहिती देणाऱ्याने स्वतःची जात अनुसूचित जाती सांगितल्यास, तीच अंतिम मानायची का?
उत्तर: 101 जातींची यादी दिली आहे. यादीत असलेल्या जातीचा उल्लेख माहिती देणाऱ्याने केल्यासच नोंदवावी.
50.
कुटुंबात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती नसेल, तर माहिती कोणाकडून घ्यावी?
उत्तर: 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती नसेल, तर त्यापैकी सर्वात मोठ्या सदस्याकडून माहिती घ्यावी. पण बीपीएल / आधार कार्ड / जात प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक देणे अनिवार्य आहे.
51.
दोन-तीन वेळा घरी जाऊनही कुटुंब सदस्य उपलब्ध नसल्यास, अशा कुटुंबांचे सर्वेक्षण कसे करावे?
उत्तर: 19-05-2025 ते 21-05-2025 पर्यंत चालणाऱ्या विशेष शिबिरात सोय आहे.
52.
मोबाईल App मध्ये Village Code, Ward Number विचारले जात आहे, ते कसे नोंदवायचे?
उत्तर: Dropdown मध्ये उपलब्ध आहे.
53.
कुटुंबात वडील वारले असून, फक्त आई आणि मुलगा असल्यास कुटुंबाची प्रमुख म्हणून आईला ग्राह्य धरावे का?
उत्तर: होय.
54.
कुटुंबातील सदस्याचे नाव मतदार यादीत नसेल, तर त्याला कसे गृहीत धरायचे?
उत्तर: रेशन कार्ड, आधार कार्ड या आधारावर.
55.
रेशन कार्ड नसेल, तर आधार क्रमांक नोंदवल्यावर तपशील दिसत नाही, याबाबत काय करावे?
उत्तर: आधार क्रमांक नोंदवल्यावर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे नोंदवावी.
56.
शैक्षणिक संस्थांच्या यादीत अनुदानित शाळांची माहिती नाही.
उत्तर: अनुदानित शाळांना खाजगी शाळा म्हणून गृहीत धरावे.
57.
मुलांच्या बँक खात्याची माहिती नोंदवण्याचा पर्याय नाही.
उत्तर: होय.
58.
सायंकाळी 6.30 नंतर सर्वेक्षण करू शकतो का?
उत्तर: नाही.
59.
पर्यवेक्षकांनी गणनदाराच्या 100% सर्वेक्षणाची तपासणी (Cross Check) करायची तरतूद आहे का?
उत्तर: पुस्तिकेच्या पृष्ठ क्रमांक: 8 आणि 9 मधील परिच्छेद क्रमांक: 1.11 मध्ये सांगितल्याप्रमाणे पर्यवेक्षण करावे.
60.
जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीचा भाग खूप माहितीपूर्ण आहे, तो सोपा करता येईल का?
उत्तर: सोप्या पद्धतीनेच माहिती घेतली जात आहे.
61. 100
पेक्षा जास्त अनुसूचित जातीची घरे असल्यास, अधिक सर्वेक्षणकर्ते नेमू शकतो का?
उत्तर: नाही.
62.
सर्वेक्षण करणारे, पर्यवेक्षक, तालुका स्तरावरील मास्टर ट्रेनर आणि जिल्हा स्तरावरील मास्टर ट्रेनर यांना मानधन देण्याबाबत.
उत्तर: शासनाच्या स्तरावर निर्णय घेतला जाईल.
63.
एका घरात एकापेक्षा जास्त रेशन कार्ड असल्यास, अशा कुटुंबातील सदस्यांचे सर्वेक्षण कसे करावे?
उत्तर: प्रत्येक रेशन कार्डानुसार कुटुंबांना ग्राह्य धरून सर्वेक्षण करावे.
64.
एका कुटुंबातील सदस्याचे नाव निवडणूक यादीत दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांच्या यादीत असल्यास काय करावे?
उत्तर: मतदार यादी फक्त ओळख पटवण्यासाठी आहे.
65.
इतर राज्यातील अनुसूचित जातीची व्यक्ती आपल्या राज्यात राहत असल्यास, त्याला अनुसूचित जातीचा सदस्य मानायचे का?
उत्तर: नाही. ज्या कुटुंबाचा पत्ता कर्नाटक राज्यात आहे, त्यांनाच अनुसूचित जातीचे सदस्य मानावे.
66.
अनुसूचित जातीमध्ये पोटजात माहीत नसल्यास, App मध्ये काय नोंदवावे?
उत्तर: यादीतील 101 पैकी एक जात नोंदवणे अनिवार्य आहे.
67. Demo Mobile App Update
करायला हवे.
उत्तर: Update केले आहे.
68.
आंतरजातीय विवाह झाल्यास, पती/पत्नीची जात दिसत नाही.
उत्तर: आंतरजातीय विवाह झाला असे सांगितल्यास, दोघांची जात वेगवेगळी नोंदवण्याची गरज नाही.
69.
रेशन कार्ड नसेल, तर आधार क्रमांक नोंदवल्यावर तपशील दिसत नाही.
उत्तर: होय. माहिती त्यांच्याकडून घेऊन भरावी लागेल.
70. Offline
मध्ये 42 प्रश्नावली Open करण्याची सोय करावी.
उत्तर: केली आहे.
71.
शाळेचा प्रकार निवडताना किमान तीन प्रकार निवडण्याची सोय असावी.
उत्तर: होय. पुस्तिकेच्या पृष्ठ क्रमांकामध्ये माहिती दिली आहे.
72.
एकापेक्षा जास्त कारणांसाठी कर्ज घेतले असल्यास, कसे नोंदवावे?
उत्तर: अनेक पर्याय निवडण्याची सोय App मध्ये आहे.
73. 17
ते 40 वयोगटातील व्यक्ती शिक्षण का सोडून गेले, याचे कारण नोंदवताना, शिक्षण नेमके कोणत्या स्तरावर थांबले, याची माहिती स्पष्टपणे दिलेली नाही.
उत्तर: 17 वर्षे पूर्ण झाल्यावर शाळा सोडल्यास, त्याचे कारण नमूद करावे.
74.
मोबाईल App मध्ये धर्म नोंदवण्याची सोय नाही. काही कुटुंबांनी इतर धर्म स्वीकारला असल्यास, त्यांना गैर-अनुसूचित जातीचे कुटुंब मानायचे का?
उत्तर: तशी सोय नाही.
75.
कामगार कामासाठी/आजारी किंवा इतर कारणांमुळे सर्वेक्षणाच्या वेळी घरी नसेल, तर त्यांच्या नातेवाईकांकडून माहिती घ्यावी का?
उत्तर: कुटुंबातील सदस्यानेच माहिती देणे आवश्यक आहे.
76.
कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास, त्याचे नाव Delete केल्यावरही App मध्ये पुढील माहिती भरण्यास विचारले जाते, ते दुरुस्त करावे.
उत्तर: App मध्ये दुरुस्त केले आहे.
77. App
मध्ये माहिती भरताना नवीन सदस्य जोडताना आधार कार्ड नसलेल्या सदस्यांची माहिती कशी नोंदवायची?
उत्तर: पडताळणी करून समाविष्ट करू शकता.
78.
घराचे सर्वेक्षण करताना कोणतेही कागदपत्र नसताना घराच्या मालकाने दिलेली माहिती योग्य आहे, हे कशाच्या आधारावर मानायचे, असा प्रश्न/वाद निर्माण झाल्यास काय करावे?
उत्तर: बीपीएल / आधार कार्ड / जात प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक दिल्यावरच सर्वेक्षण पुढे चालू ठेवावे.
79.
घराचा मालक सर्वेक्षणाची पूर्ण माहिती दिल्यावर, खात्री अर्जावर सही करण्यास नकार देत असेल, तर काय करावे?
उत्तर: माहिती देणाऱ्याने सही केली नाही, असे सर्वेक्षण करणाऱ्याने नमूद करून Upload करावे.
80.
क्रम क्रमांक 23 मध्ये, जातीमध्ये Vaddar, Waddar, Voddar, Woddar पैकी कोणती जात नोंदवायची?
उत्तर: 101 जातींची यादी दिली आहे. माहिती देणाऱ्याने सांगितलेली जात नोंदवावी.
81.
एका कुटुंबात 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलेच राहत असल्यास, माहिती कोण देणार?
उत्तर: त्यापैकी सर्वात मोठ्या सदस्याकडून माहिती घ्यावी.
82.
इतर राज्यांतून येऊन येथे स्थायिक झालेल्या आणि येथे रेशन कार्ड/आधार क्रमांक असलेल्या व्यक्तींना सर्वेक्षणात समाविष्ट करायचे का?
उत्तर: कर्नाटक राज्यात नोंदणीकृत असलेले आधार तपशील राज्यात वापरण्याची परवानगी आहे.
83.
कुटुंबाची माहिती पूर्ण करण्यासाठी किमान 30 मिनिटे लागतात, त्यामुळे मिळणाऱ्या कमी वेळेत सर्वेक्षण करणे शक्य आहे का? सर्वेक्षणाची तारीख वाढवता येईल का?
उत्तर: नाही.
84.
फोटो काढण्यास नकार दिल्यास काय करावे?
उत्तर: माहिती देणाऱ्या व्यक्तीला फोटो काढण्यासाठी तयार करावे. तरीही नकार दिल्यास, अनिवार्य असलेले बीपीएल/आधार कार्ड/जात प्रमाणपत्र मिळवून सर्वेक्षण पुढे चालू ठेवावे.
85.
एकदा माहिती घेऊन गणनदारांनी ती App मध्ये Update केल्यावर, कुटुंबातील सदस्य एक दिवसानंतर ती माहिती स्वतः तपासून दुरुस्त करण्यास सांगत असल्यास काय करावे? किंवा Edit करून दुरुस्त करण्याची सोय आहे का?
उत्तर: तशी सोय नाही.
86.
शासनाच्या गृहलक्ष्मी योजनेत गृहिणींना मिळणारे मासिक रु. 2,000/- वार्षिक रु. 24,000/- कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नात मोजायचे आहेत का?
उत्तर: आवश्यकता नाही.
87.
कॉलम क्रमांक 32 मधील "कुटुंबाला शासनाकडून मिळालेले फायदे" मध्ये एका कुटुंबाला 2, 3 फायदे मिळाले असल्यास (वृद्धापकाळ पेन्शन, अपंगत्व पेन्शन, गृहलक्ष्मी योजना) मोबाईल App मध्ये अनेक पर्याय निवडण्याची सोय नाही, याचे स्पष्टीकरण द्यावे.
उत्तर: अनेक पर्याय निवडण्याची सोय App मध्ये आहे.
88. '
इतर (स्पष्ट करा)' असलेल्या कॉलममध्ये माहिती भरताना कन्नड अक्षरे वापरू शकतो का? की इंग्रजीतच भरायला हवी? (सर्व मोबाईलमध्ये Keyboard इंग्रजीत असते.)
उत्तर: कन्नड आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये माहिती भरण्याची सोय आहे.
89.
विवाह झालेल्या व्यक्तीचे नाव Delete करण्याची सोय आहे का?
उत्तर: सोय आहे.
90.
सर्वेक्षणाच्या वेळी 'बेडर जंगम' समुदायाचे लोक स्वतःला अनुसूचित जातीत नोंदवण्याचा आग्रह करत असल्यास काय करावे?
उत्तर: जात प्रमाणपत्राच्या आधारावर सर्वेक्षण करा.

DOWNLOAD CIRCULAR


🌀Government of Karnataka Scheduled Caste Comprehensive Survey 2025

🔰 सर्वेक्षकानी मोबाईल application कसे वापरावे याची सविस्तर माहिती व आवश्यक PDF

🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖

🔰कर्नाटक राज्य अनुसूचित जातींचे व्यापक सर्वेक्षण-2025 

🌀मार्गदर्शक सूचना🌀

🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖

💐2025-26 मध्ये कांही वर्गांची पाठ्यपुस्तके बदलणार

🔖इयत्ता 10वी साठी मराठी (तृतीय भाषा) पाठ्यपुस्तक

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

🔖इयत्ता पहिली प्रवेश  2025-26 वयोमर्यादा

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰


टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share