KSEEB 10TH SS 8 – सामाजिक स्तर

"इयत्ता 10 वी समाज विज्ञान - प्रकरण 8 'सामाजिक स्तर' या घटकावर आधारित महत्त्वाचे मुद्दे,नमूना उत्तरे आणि 15 बहुपर्यायी प्रश्नांचा सराव संच.परीक्षेसाठी."

9 min read

 CLASS - 10  

MEDIUM  - MARATHI 

SUBJECT - SOCIAL SCIENCE

SYLLABUS - KARNATAKA STATE 

IMP NOTES AND MODEL ANSWERS

प्रकरण 8 – सामाजिक स्तर

8.  Social Level



महत्त्वाचे मुद्दे आणि स्पष्टीकरणे (Important Points and Explanations) 📝

📚 सामाजिक स्तर म्हणजे काय?
- सामाजिक स्तर म्हणजे लोकांचे उत्पन्न, शिक्षण, जात, रंग, लिंग, व्यवसाय, बुद्धीमत्ता इत्यादींच्या आधारावर समाजात उच्च-नीच असे भेद निर्माण होणे. हे भेद समाजाने निर्माण केले आहेत, व्यक्तींच्या जन्मामुळे नव्हे.

📚 सामाजिक स्तराची निर्मिती कशी झाली?
- समाजानेच श्रीमंत-गरीब, उच्च-नीच असे स्तर निर्माण केले आहेत. श्रीमंत मुलांना जास्त संधी मिळतात, तर गरीब मुलांना संधी मर्यादित असतात. ही असमानता समाजाच्या रचनेमुळे येत.

📚 सामाजिक असमानता
- सामाजिक स्तरामुळे समाजात असमानता निर्माण होते. काही लोकांना जास्त अधिकार, संधी मिळतात, तर काहींना नाही. उदा. जातीपद्धती, वर्णव्यवस्था, आर्थिक भेद.

 
📚 पूर्वग्रह (Prejudice)
- पूर्वग्रह म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा समूहाबद्दल आधीच तयार झालेली सकारात्मक किंवा नकारात्मक भावना. हे भेदभावामुळे निर्माण होतात आणि समाजात तणाव, द्वेष वाढवतात.

📚 अस्पृश्यता – एक सामाजिक कलंक
- अस्पृश्यता ही भारतातील अमानवी प्रथा आहे. महात्मा गांधींनी तिला 'हिंदू समाजाला लागलेला कलंक' म्हटले आहे. अस्पृश्यतेमुळे काही जातींना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक संधींपासून वंचित ठेवले गेले

📚 अस्पृश्यता निर्मूलनासाठी कायदेशीर उपाययोजना
- भारतीय संविधानाच्या 17व्या कलमानुसार अस्पृश्यता निषिद्ध आहे.
- 1955: अस्पृश्यता अपराध कायदा लागू.
- 1976: नागरिक हक्क संरक्षण कायदा.
- अनुसूचित जाती-जमातींसाठी शिक्षण, नोकरी, राजकारणात आरक्षण.
- 1989: राज्य सरकारला विशेष जबाबदाऱ्या

📚 सामाजिक सलोखा आणि सकारात्मक पूर्वग्रह
- सर्व मानव एक आहेत, ही भावना समाजात सलोखा वाढवते. सकारात्मक पूर्वग्रहामुळे समाजात सहकार्य वाढते.

 
Q.NO. I: रिकाम्या जागी योग्य शब्द भरा
1. 'संपूर्ण मानव जात एक आहे' असे पंप यांनी सांगितले.
2. अस्पृश्यता हा हिंदू समाजाला लागलेला कलंक आहे, असे महात्मा गांधी यांनी सांगितले.
3. अस्पृश्यता पाळणे हा दंडनीय गुन्हा आहे असे १७ वे कलम घोषित करते.

  Q.NO. II: गटांमध्ये चर्चा करून खालिल प्रश्नांची उत्तरे लिहा
4. सामाजिक स्तर म्हणजे काय?

4. सामाजिक स्तर म्हणजे काय?
सामाजिक स्तर म्हणजे समाजात उत्पन्न, शिक्षण, जात, रंग, लिंग, व्यवसाय, बुद्धीमत्ता इत्यादींच्या आधारावर लोकांमध्ये निर्माण होणारे उच्च-नीच भेद.

5. सामाजिक स्तर कसे निर्माण झाले आहे?
समाजानेच विविध घटकांच्या (उदा. उत्पन्न, शिक्षण, जात, व्यवसाय) आधारावर स्तर निर्माण केले आहेत. हे जन्मावर आधारित नसून समाजाच्या रचनेवर आधारित आहे.

6. पूर्वग्रह म्हणजे काय?
पूर्वग्रह म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा समुदायाबद्दल आधीच तयार झालेली सकारात्मक किंवा नकारात्मक भावना, जी प्रत्यक्ष अनुभवाआधीच तयार होते.

7. अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठीच्या घटनात्मक आणि कायदेशीर उपाययोजनांचे विवरण करा.
- संविधानाच्या 17व्या कलमानुसार अस्पृश्यता निषिद्ध.
- 1955: अस्पृश्यता अपराध कायदा.
- 1976: नागरिक हक्क संरक्षण कायदा.
- अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षण.
- 1989: राज्य सरकारला जबाबदाऱ्या.

8. अस्पृश्यते सारख्या सामाजिक कलंकाला दूर करण्यासाठी तुमच्या सूचना काय आहेत?
- सर्व स्तरातील लोकांनी एकमेकांचा सन्मान करावा.
- शिक्षण व सामाजिक जागरूकता वाढवावी.
- कायद्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी.
- सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी कार्यक्रम राबवावेत.


 📝 1 Mark Questions with Answers.

1. सामाजिक स्तर म्हणजे काय?
उत्तर:
उत्पन्न
, शिक्षण, जात, रंग, लिंग, व्यवसाय इत्यादींवर आधारित समाजातील भेद.

2. अस्पृश्यता हा कोणत्या समाजाला लागलेला कलंक आहे?
उत्तर:
हिंदू समाजाला.

3. 'संपूर्ण मानव जात एक आहे' असे कोणी सांगितले?
उत्तर:
पंप.

4. अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे असे कोणत्या कलमाने सांगितले?
उत्तर: १७ वे कलम.

5. अस्पृश्यता निर्मूलनासाठी 1955 मध्ये कोणता कायदा करण्यात आला?
उत्तर: अस्पृश्यता अपराध कायदा.

6. 1976 मध्ये कोणता कायदा तयार झाला?
उत्तर:
नागरिक हक्क संरक्षण कायदा.

7. अस्पृश्यता निर्मूलनासाठी कोणते नेते प्रसिद्ध आहेत?
उत्तर:
महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, स्वामी विवेकानंद.

8. सामाजिक स्तराची निर्मिती कोणामुळे झाली?
उत्तर:
समाजामुळे.

9. पूर्वग्रह म्हणजे काय?
उत्तर:
एखाद्या व्यक्ती किंवा समूहाबद्दल आधीच तयार झालेली भावना.

10. सामाजिक असमानता म्हणजे काय?
उत्तर:
समाजातील संधी, अधिकार, संसाधनांचे असमान वितरण.

11. अनुसूचित जाती-जमातींना कोणत्या क्षेत्रात आरक्षण आहे?
उत्तर:
शिक्षण, नोकरी, राजकारण.

12. अस्पृश्यता निर्मूलनासाठी कोणत्या वर्षी कायदा करण्यात आला?
उत्तर:
1955.

13. अस्पृश्यता कोणत्या कलमाने निषिद्ध आहे?
उत्तर:
१७ वे कलम.

14. सामाजिक स्तराचा समाजावर काय परिणाम होतो?
उत्तर:
असमानता आणि भेदभाव वाढतो.

15. अस्पृश्यतेचा समाजावर काय परिणाम होतो?
उत्तर:
काही वर्गांना संधींपासून वंचित ठेवले जाते.

16. सकारात्मक पूर्वग्रहाचा समाजावर काय परिणाम होतो?
उत्तर:
सलोखा वाढतो.



पाठावर आधारित 15 बहुपर्यायी प्रश्नांची (MCQ) सराव चाचणी दिली आहे. प्रत्येक प्रश्नास चार पर्याय दिले असून बरोबर उत्तर चिन्हांकित केले आहे.

बहुपर्यायी प्रश्नांची (MCQ) सराव चाचणी

टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share