KSEEB 10TH SS 11. भारताचे हवामान

""SSLC इयत्ता 10 वी साठी समाज विज्ञान प्रकरण 11 'भारताचे हवामान' यावर आधारित महत्त्वाची माहिती, प्रश्नोत्तर, एक गुणी प्रश्न, MCQs आणि संपूर्ण तयारीसाठी"

15 min read

 CLASS - 10  

MEDIUM  - MARATHI 

SUBJECT - SOCIAL SCIENCE

SYLLABUS - KARNATAKA STATE 

IMP NOTES AND MODEL ANSWERS

प्रकरण 11. भारताचे हवामान

11. India’s Climate

महत्त्वाचे मुद्दे आणि स्पष्टीकरणे (Important Points and Explanations) 📝

1️ भारताचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सून प्रकाराचे आहे.
वर्षभर वाऱ्यांच्या दिशेतील बदल आणि ऋतूमानांतील विविधता यामुळे भारताचे हवामान विशेष मानले जाते.

2️ हवामानाचे घटक:
अक्षांश, उंची, सागरी प्रभाव, वारे, पर्वत रांगा, सागरी प्रवाह, वनस्पती इत्यादी घटक हवामानावर परिणाम करतात.

3️ ऋतूंचे वर्गीकरण:

  • उन्हाळा (मार्च–मे)
  • नैऋत्य मान्सून (जून–सप्टेंबर)
  • परतीचा मान्सून (ऑक्टो.–नोव्हेंबर)
  • हिवाळा (डिसें.–फेब्रुवारी)

4️ पावसाचे विभाग:

  • कमी पावसाचा भाग (<50 cm) – थार वाळवंट, कच्छ
  • मध्यम पावसाचा भाग (50–250 cm) – महाराष्ट्र, मध्य प्रदेश
  • अतिपावसाचा भाग (>250 cm) – मेघालय (मौसिनराम), आसाम

5️ मान्सून हवामानाचा कृषीवर परिणाम:
मान्सूनवर अवलंबून असल्यामुळे भारतातील कृषी व्यवसाय 'मान्सूनचा जुगार' मानला जातो.


✍️ I. रिकाम्या जागा भरा.

  1. भारतातील गंगानगर हा अति जास्त उष्णता असलेला प्रदेश आहे.
  2. भारतात मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो.
  3. भारतात अत्यंत कमी पाऊस पडणारा प्रदेश राजस्थान आहे.
  4. भारतातील जास्त पाऊस पडणारा प्रदेश मेघालय आहे.

✍️ II. समूह चर्चा आधारित प्रश्नांची उत्तरे

  1. भारतात कोणकोणत्या प्रकारचे हवामान आहे?
    उत्तर – उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण, मान्सून व उपोष्ण कटिबंधीय हवामान भारतात आढळते.
  2. मान्सूनचे वारे म्हणजे काय?
    उत्तर – ऋतूनुसार दिशा बदलणारे वारे, जे उन्हाळ्यात थंड भागाकडे व हिवाळ्यात गरम भागाकडे वाहतात.
  3. परतीच्या मान्सून काळात चक्रीवादळे का निर्माण होतात?
    उत्तर – या काळात समुद्राची उष्णता जास्त असते व थंड वारे या गरम भागावर आदळल्याने चक्रीवादळे तयार होतात.
  4. भारताच्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते?
    उत्तर – अक्षांश, समुद्रसपाटीपासूनची उंची, सागरी प्रभाव, पर्वत रांगा, वारे इत्यादी.

🔗 III. जोड्या जुळवा

A

B

i) काल बैसाखी

क) पश्चिम बंगाल

ii) आंधिस

अ) उत्तर प्रदेश

iii) कॉपी करंजा

ब) कर्नाटक

iv) मँगो शॉवर्स

क) केरळ


🎯 1 Mark Questions with Answers-

  1. भारतातील सर्वात उष्ण प्रदेश कोणता?

गंगानगर, राजस्थान

  1. भारतातील सर्वात थंड भाग कोणता?

जम्मू काश्मीर

  1. मान्सून वाऱ्यांची दिशा कोणत्या महिन्यात बदलते?

जून

  1. सर्वात कमी पावसाचे ठिकाण कोणते?

रोयली, जैसलमेर

  1. सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण?

मौसिनराम

  1. भारतातील सर्वात कमी पावसाचा हंगाम कोणता?

हिवाळा

  1. भारतात चक्रीवादळे कोणत्या ऋतूत होतात?

परतीच्या मान्सूनमध्ये

  1. भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ऋतूत पडतो?

नैऋत्य मान्सून

  1. "मान्सून" शब्द कोणत्या भाषेतून घेतला?

अरबी

  1. कॉफी करंजा कोणत्या राज्यात येते?

कर्नाटक

  1. कालबैसाखी कोणत्या राज्यात होतो?

पश्चिम बंगाल

  1. Mango showers म्हणजे काय?

आंब्याच्या झाडांना पोषक असणारा पाऊस

  1. भारतातील मान्सूनचे मुख्य दोन शाखा कोणत्या?

अरबी समुद्र व बंगाल उपसागर

  1. मान्सूनच्या परतीचा काल कोणता?

ऑक्टोबर–नोव्हेंबर

  1. हिवाळा कोणत्या महिन्यांत असतो?

डिसेंबर ते फेब्रुवारी

  1. हिवाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?

तामिळनाडू


पाठावर आधारित 15 बहुपर्यायी प्रश्नांची (MCQ) सराव चाचणी दिली आहे. प्रत्येक प्रश्नास चार पर्याय दिले असून बरोबर उत्तर चिन्हांकित केले आहे.

बहुपर्यायी प्रश्नांची (MCQ) सराव चाचणी



टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share