KSEEB 8TH SS 2: भारत वर्ष भारताची भौगोलिक वैशीष्ट्ये आणि इतिहास पूर्वकाळ
"- भारत हा द्वीपकल्प आणि उपखंड आहे. - भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये हिमालय पर्वतरांग, गंगेचे मैदान, दख्खन पठार आणि किनारपट्ट्या यांचा समावेश होतो."
CLASS - 8
MEDIUM - MARATHI
SUBJECT - SOCIAL SCIENCE
SYLLABUS - KARNATAKA STATE
IMP NOTES AND MODEL ANSWERS
नमुना प्रश्नोत्तरे
इतिहास –
प्रकरण 2: भारत वर्ष भारताची भौगोलिक वैशीष्ट्ये आणि इतिहास पूर्वकाळ
(Class 8, KSEEB, मराठी माध्यम)
IMP NOTES -
- भारत हा द्वीपकल्प आणि उपखंड आहे.
- भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये
हिमालय पर्वतरांग, गंगेचे
मैदान,
दख्खन पठार आणि किनारपट्ट्या यांचा समावेश होतो.
- भारताच्या शेजारी देश: पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार.
- इतिहासपूर्व काळ म्हणजे लेखनकलेच्या
शोधापूर्वीचा काळ, ज्यात
मानवाने दगडी हत्यारांचा वापर केला.
- इतिहासपूर्व काळातील मानव शिकारी आणि
अन्न गोळा करणारा होता.
- अग्निचा वापर अन्न शिजविण्यासाठी, प्रकाशासाठी आणि संरक्षणासाठी केला गेला.
- पाषाणयुगाचे तीन कालखंड: प्राचीन
पाषाणयुग,
मध्य पाषाणयुग, नवीन पाषाणयुग.
- पशुपालन आणि शेतीची सुरुवात
वातावरणातील बदलांमुळे झाली.
- भारताचा इतिहास आणि संस्कृती
विविधतेतून एकात्मतेचा संदेश देतो.
1. योग्य शब्द वापरून
गाळलेल्या जागा भरा :
1.
भारत एक ______ द्वीप आहे.
उत्तर: उपखंड
2. राखेचे अंश ______
या गुहेत आढळले आहेत.
उत्तर: कर्नूल
3. मध्यपाषाणयुगातील शस्त्रांना _______
म्हटले जात असे.
उत्तर: नाजूक दगडी शस्त्रे
II. खालील प्रश्नांची
थोडक्यात उत्तरे लिहा
4. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर: हिमालय पर्वतरांग, गंगेचे मैदान, दख्खन पठार, आणि किनारपट्ट्या.
5. कोणत्या खिंडीतून भारतावर आक्रमणे झालेली आहेत?
उत्तर: खैबर आणि बोलन खिंडीतून.
6. इतिहासपूर्व काळ म्हणजे काय?
उत्तर: लेखनकलेच्या शोधापूर्वीचा काळ ज्यात मानवाने दगडी हत्यारांचा वापर
केला.
7. पशुपालन आणि दुग्धोत्पादनाची कशी सुरुवात झाली?
उत्तर: वातावरण बदलल्यामुळे मानवाने प्राण्यांचे पालन करायला सुरुवात केली.
8. इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडाला पुरातत्त्व संशोधकानी वेगवेगळी नावे दिली
आहेत, ती कोणती?
उत्तर: प्राचीन पाषाणयुग, मध्य पाषाणयुग, नवीन पाषाणयुग.
पाठावर आधारित 10 बहुपर्यायी प्रश्नांची (MCQ) सराव चाचणी दिली आहे. प्रत्येक प्रश्नास चार पर्याय दिले असून बरोबर उत्तर चिन्हांकित केले आहे.
बहुपर्यायी प्रश्नांची (MCQ) सराव चाचणी